: युवक-युवतींना रोजगाराच्या विविध संधी उपलब्ध करून देण्यासाठी ठाणे महानगरपालिकेच्या वतीने भव्य रोजगार मेळावा व प्लेसमेंट ड्राईव्हचे आयोजन करण्यात आले आहे. मंगळवार, दि. २९ सप्टेंबर रोजी सकाळी १० ते सायंकाळी ४ वाजेपर्यंत कोपरी इंडस्ट्रीयल ट्रेनिंग इन्स्टिट्यूट, साधू वासवानी नगर, कोपरी, ठाणे (पूर्व) येथे हा रोजगार मेळावा आयोजित करण्यात आला आहे.
‘युवाशक्ती हीच राष्ट्रशक्ती’ या संकल्पनेतून आयोजित करण्यात येणाऱ्या या रोजगार मेळाव्यात विविध नामांकित कंपन्यांमध्ये थेट मुलाखतीची संधी उपलब्ध होणार आहे. आयटीआय, पदवी तसेच विविध शैक्षणिक पात्रता असलेल्या युवक-युवतींना या मेळाव्यात सहभागी होता येणार आहे. अभियांत्रिकी, लॉजिस्टिक्स, आयटी, रिटेल, हॉस्पिटॅलिटी, बँकिंग आदी विविध क्षेत्रांतील रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देण्यात येणार आहेत.इच्छुक उमेदवारांनी मेळाव्यास उपस्थित राहताना बायोडाटा (Resume), शैक्षणिक कागदपत्रे व आवश्यक प्रमाणपत्रे सोबत आणावीत. तसेच दिलेल्या क्यूआर कोडद्वारे ऑनलाइन नोंदणी करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.युवक-युवतींनी मोठ्या संख्येने सहभागी होऊन रोजगाराच्या उपलब्ध संधींचा लाभ घ्यावा, असे आवाहन ठाणे महानगरपालिकेच्या वतीने करण्यात आले आहे.

0 टिप्पण्या