थोरात परिवाराकडून तिसऱ्या दिवसाला गोड जेवणासाठी जमा झालेल्या पैशातून करुणा बुद्ध विहाराला संपूर्ण साऊंड सिस्टिम दान
समाजात अनेक चालीरीती आहेत ह्या चालीरीती पूर्वपार चालत आलेल्या आहेत या चालीरीती बंद करून समाजात दान पारमिता वाढविण्याच्या उद्देशाने यवतमाळ येथील थोरात परिवाराने तिसऱ्या दिवसाला गोड जेवणासाठी जमा झालेल्या पैशातून करुणा बुद्ध विहाराला संपूर्ण साऊंड सिस्टिम दान दिली या कार्यक्रमाचे अध्यक्ष करुणा बुद्ध विहार समितीचे अध्यक्ष अनंतराव अघम होते प्रमुख अतिथी म्हणून सेवानिवृत्त उपसंचालक सुधाकरराव तलवारे प्रा.वाल्मीक डवले सेवानिवृत्त वन अधिकारी सिद्धार्थ देवरे होते याप्रसंगी सहकार विभागातून नुकतेच सेवानिवृत्त झालेले राजेश अंबादास गुर्जर यांचा सेवानिवृत्ती निमित्त सहपत्नी सत्कार करण्यात आला यावेळी भन्ते धम्मवंश प्रामुख्याने उपस्थित होते सदर कार्यक्रम नेर जवळच असलेल्या शिरजगाव पांढरी येथील करणा बुद्ध विहारात दिनांक सात सप्टेंबर रोजी संपन्न झाला
समाजात अनेक चालीरीती आहेत ह्या चालीरीती पूर्वपार चालत आलेल्या आहेत शिक्षणाने झालेल्या जागृतीने किंवा महामानवाने घालून दिलेल्या काही समीक्षात्मक कसोट्यांवर या चालीरीतींवर अनेकदा चर्चा केल्या जात आहे चर्चांमधून काही चालीरीतींवर प्रश्नचिन्ह निर्माण होऊन त्या चालीरीती बंद करणे सामाजिक फायद्याचे असल्याचे दिसून येते अशीच एक चालरीत आहे परिवारात झालेल्या मृत्यूनंतर परिवाराने तिसरा दिवस करणे किंवा तेरवी करणे आणि त्यानंतर त्यांच्या नातेवाईकांनी वर्गणी पैसे जमा करणे व त्या पैशांमध्ये मृत्यूचे संकट ओढवलेल्या परिवाराला गोड तिखट जाणून बुजून जेवू घालणे यवतमाळ येथील दामोदर डोमाजी थोरात यांचा नुकताच काही दिवसापूर्वी मृत्यू झाला परिवारात झालेला मृत्यू आणि त्या मृत्यूनंतर लगेच गोड तिकट खाणे हे योग्य नसल्याचे मत थोरात परिवारांचे बनले त्यामुळे ही प्रथा बंद करावे असा विचार परिवाराने केला आणिमृत्यूनंतर तिसऱ्या दिवशी नातेवाईकांनी जमा केलेल्या गोड जेवणासाठी च्या पैशात आणखी काही पैसे टाकून संपूर्ण साऊंड सिस्टिम विकत घेऊन शिरसगाव (पांढरी ) येथील करुणा बुद्ध विहार ला दान दिलीहे दान करण्यासाठी वेनूबाई दामोदर थोरात रत्नरक्षित दामोदर थोरात शितलताई रत्नरक्षित थोरात सचिन दामोदर थोरात जयश्री गौतम इंगोले /थोरात वैशाली छगन भगत /थोरात तुळशीराम डोमाजी थोरात सुवर्णा तुळशीराम थोरात गौरव तुळशीराम थोरात प्रामुख्याने उपस्थित होते याप्रसंगी शिरसगाव येथील सामाजिक कार्यकर्त्यांनी थोरात परिवार व नातेवाईक आणि स्थानिक उपासक उपासकांसाठी भोजनाची व्यवस्था केली याप्रसंगी कारंजा येथील भूमिका सनातन इंगोले यवतमाळ येथील स्वाती व शोभा पाटील आंबेजोगाई येथील प्रा.डॉ.कीर्तीराज लोणारे डॉ. शरद मोरे वनिता मोरे माजी समाज कल्याण सभापती वनिताताई देवरे राहुल देवरे मिलिंद देवरे सविता तलवारे डॉ. घनश्याम खडसे रेखा इंगोले सिताराम मोहोड दामोदर खडसे प्रकाश गवई मनवर धवने संघप्रिय सोनोने सदानंद इंगोले सुशीला भिमदास कांबळे आत्माराम खडसे अण्णा शिरसाठ भीमदास वरठी अमरावती येथील प्रवीणा उमेश चिंचोळे यमुना हंसदास चिंचोळे प्राचार्य योगिता चिंचोळे नागोराव सोनोने राहुल खडसे रमेश खडसे चंद्रकांत गुर्जर वैशाली गुर्जर राणी भगत अभयकीर्ती अघम सुलोचना अघम आरती अघम आणि शिरसगाव व पांढरी येथील संपूर्ण अघम परिवार यांच्यासह करुणा बुद्ध विहार समितीच्या महिला व पुरुष कार्यकर्ते तसेच परिसरातील गणमान्य गावकरी मंडळी उपस्थित होते कार्यक्रमाचे प्रास्ताविक रत्नरक्षित थोरात संचालन केशव धनराज अघम व आभार प्रदर्शन नंदकिशोर चिंचोळे यांनी केले

0 टिप्पण्या