कोपरखैरणे पोलीस ठाण्याला स्वातंत्र्य आणि मालकीचे पोलीस स्टेशन सिडकोच्या जागेवर मिळालेले आहे. मात्र,या पोलीस ठाण्याला नागरिकांच्या तक्रारी मांडण्यासाठी अथवा मिटवण्यासाठी बांधल्या गेलेल्या सुसज्ज पोलीस ठाण्यात जाण्यासाठी पोलीस अधिकारी व नागरिकांना कधी मुहूर्त मिळणार अशा प्रकारची चर्चा होऊ लागली आहे.सध्याचे पोलीस स्टेशन हे वादग्रस्त इमारतीच्या जागेवरती आहे.त्या इमारतीचे जागेवर न्यायालयात खटला प्रलंबित असल्याचे समजते.यापूर्वी कोपरखैरणे सेक्टर सहा या ठिकाणी भाडेतत्त्वावर पोलीस ठाणे होते.मात्र, सदरच्या जागेवर बांधलेल्या बांधकाम हे जीर्ण झाल्याने पावसाळ्याच्या दरम्यान त्या पोलीस ठाण्यात पावसाचे पाणी स्लॅपमधून टपकत असल्याने त्या ठिकाणाहून पोलीस स्टेशन स्थलांतरित करून घणसोली यांनी कोपरखैरण्याच्या मध्यभागी वादग्रस्त इमारतीमध्ये हलविण्यात आले.त्यानंतर कोपरखैरणे येथील पोलीस वाहतूक शाखा असलेल्या ठिकाणी सिडको विभागाने पोलीस ठाण्याला जागा उपलब्ध करून दिली.त्याच जागेवर गेल्या चार वर्षापासून बांधकाम सुरू असून आतापर्यंत सिडकोने अथवा संबंधित विभागाने सदरचे बांधकाम आलेल्या पोलीस ठाणे हे नागरिकांच्या हितासाठी कोपरखैरणे पोलीसांच्याकडे हस्तांतरित केलेले नाही.बांधकाम पूर्ण होऊन देखील सिडको विभाग नागरिकांसाठी बांधण्यात आलेले पोलीस ठाणे कोपरखैरणे पोलीसांच्याकडे हस्तांतरित करण्यासाठी विलंब का लावते अशा प्रकारचा सूर नागरिकांकडून ऐकण्यास मिळत आहे.

0 टिप्पण्या