सुप्रसिद्ध नाटककार, कलावंत शहिद सफदर हाश्मी, यांनी स्थापन केलेल्या , " जन नाट्य मंच" या संस्थेची संशोधक कलावंत कोमिता व सह कलाकार ब्रिजेश यांनी संयुक्तपणे लेखन केलेले व मल्लिका तनेजा यांनी दिग्दर्शित केलेल्या, " कभी न खत्म होता काम !" या हिंदी सडक नाटकाचे सुमारे ११ प्रयोग, मुंबई व नवी मुंबईतील विविध कामगार वस्तीत व काही हॉल मध्ये होणार आहेत. हे नाटक घरकाम, कंत्राटी काम करणाऱ्या कामगार, कष्टकरी स्त्रियांच्या शोषणाचे,दु:ख, वेदननां वाचा फोडणारे, त्यांच्या दैनंदिन, संघर्षाचे,जगण्याचे चित्रण करणारे व भविष्यातील आशादायी स्वप्नाची नवी वाट निर्माण करणारे आहे.
आंतरराष्ट्रीय महिला वर्षाला यंदा ५० वर्षे पूर्ण होत असल्याने, महाराष्ट्रातील विविध महिला संस्था, संघटना विविध सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करीत आहेत .त्या कार्यक्रमाचा भाग म्हणून स्त्री मुक्ती संघटना,आ.भा.जनवादी महिला संघटना,सीटू कामगार संघटना,एस एफ आय व डि.वाय.एफ.आय या विद्यार्थी, युवा संघटना दि १५- १९ ऑक्टोबर दरम्यान, भांडूप,पवई,मानखूर्द,मरोळ, कांदिवली, गोरेगाव, प्रभादेवी, अंधेरी,नवी मुंबईतील कोपरखैरणे, बेलापूर आदी ठिकाणी व तमाशा स्टुडिओ अंधेरी येथे नाट्य प्रयोग होणार आहेत, सामाजिक, सांस्कृतिक चळवळीतील कार्यकर्त्यांनी , नाट्यप्रेमी लोकांनी लाभ घ्यावा.
अधिक माहितीसाठी संपर्क:
सुबोध मोरे: ९८१९९९६०२९.

0 टिप्पण्या