Top Post Ad

पात्रता नसलेल्यांना ठाणे महानगरपालिकेची उपायुक्तपदाची खिरापत

पात्रता नसलेल्या आणि भ्रष्टाचाराच्या गंभीर आरोपांना सामोरे जाणाऱ्या शंकर पाटोळे यांना ठाणे महापालिकेत उपायुक्तपदी बसवणे म्हणजे ठाणेकर जनतेच्या विश्वासाशी केलेला विश्वासघात आहे. आयुक्तांनी राजकीय दबावाखाली घेतलेला हा निर्णय महापालिकेच्या प्रतिमेवर काळा डाग आहे,” असा स्फोटक आरोप ठाणे शहर काँग्रेसचे मुख्य प्रवक्ते राहुल पिंगळे यांनी केला.  2004 मध्ये उप समाजविकास अधिकारी म्हणून लागलेले पाटोळे, 2010 मध्ये समाजविकास अधिकारी झाले. त्यानंतर सहाय्यक आयुक्त पदाचा अतिरिक्त पदभार म्हणून संवेदनशील प्रभाग समित्यांमध्ये काम करत त्यांनी पूर्ण वेळ सहाय्यक आयुक्त पदाच्या पदोन्नतीचा मार्ग मोकळा केला.सहाय्यक आयुक्त पदावरील नियुक्तीस मान्यता  मिळण्याबाबतच्या पालिकेच्या पत्राच्या अनुषंगाने शासनाने माहिती सादर करण्यास सांगितले असता प्रस्तावात नमूद केलेल्या अधिकाऱ्यांचे विभागीय चौकशी चालू अथवा प्रस्तावित नसल्याचा प्रथम अहवाल महापालिकेने दिला आणि याबाबतच्या दुसऱ्या अहवालात मात्र शंकर पाटोळे यांचेबाबत बीएसयुपी अनियमितता, अँटी करप्शन ब्युरोतील तक्रार, अनधिकृत बांधकामांना दिलेले संरक्षण, तसेच नागरिकांकडून आलेल्या तक्रारी प्रलंबित असल्या बाबत सदर केले.परंतु शासनाने आजवर पाटोळे यांच्या सहाय्यक आयुक्त पदालाच मान्यता दिलेली नाही, हे धक्कादायक वास्तव असून, अशा स्थितीत त्यांची पदोन्नती ही पूर्णपणे बोगस व बेकायदेशीर असल्याचा काँग्रेसचा दावा आहे.

याचबरोबर, पाटोळे यांची  2018 ते 2021 कालावधीत झालेल्या अनधिकृत बांधकामाबाबत चौकशी चालू असताना व सहाय्यक आयुक्त पदाची शासन मान्यता नसताना  उपायुक्तपदी नेमल्याने महापालिकेच्या कारभारातील ‘भ्रष्टाचाराचा गड’ उघड झाला. आम्ही अनेकदा पुराव्यानिशी आयुक्तांकडे तक्रारी दाखल केल्या. तत्कालीन काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पाटोळे यांनीसुद्धा या अधिकाऱ्याची कारकीर्द भ्रष्टाचाराने बरबटलेली असल्याचे लेखी पत्राद्वारे स्पष्ट केले. पण तरीही या अधिकाऱ्याला राजकीय आशीर्वादाने अभय देण्यात आले. ठाणेकरांची ही थेट फसवणूक आहे, आम्ही आता सार्वजनिक बांधकाम,स्थावर मालमत्ता, घनकचरा व शहर विकास विभागातील भ्रष्टाचाराचे पुरावे जनतेसमोर आणणार आहोत. आयुक्तांनी राजकीय दबावाला बळी न पडता कारवाईची भूमिका घेतली नाही, तर काँग्रेस रस्त्यावर उतरून ठाणेकरांसाठी लढेल. दरम्यान, न्यायालयीन चौकशी सुरू होताच, शंकर पाटोळे यांच्या ‘गेम ओव्हर’ची चर्चा ठाण्यातील राजकीय वर्तुळात सुरू झाली आहे. ठाणेकर नागरिकांचा सवाल आता एकच  “भ्रष्टाचाराला अभय देणाऱ्या ‘सूत्रधारां’वरही कारवाई होणार का ?”

पिंगळे यांनी केलेल्या आरोपांची चर्चा आता ठाण्यात रंगली आहे. क्रिडा अधिक्षक म्हणून रुजू झालेल्या इतकेच नव्हे तर जकात नाक्यावर काम करणारा कर्मचारी देखील ठाणे पालिकेत उपायुक्त, सहा.आयुक्त पदी पोहोचतात. याबाबत माहिती मागितल्यास कोणतेही उत्तर देण्यात येत नाही. तेव्हा या अधिकाऱ्याच्या एकूणच कारकिर्दीची श्वेत पत्रिका जाहिर करावी. आणि या मागचा खरा सूत्रधार कोण आहे याची चौकशी व्हावी अशी मागणी आता ठाणेकर करीत आहेत. 


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

 READ / SHARE  / FORWARD 
JANATA  NEWS  xPRESS

निरंतर सेवेच्या आर्थिक मदतीकरिता 
for Donation
G pay 8108658970 

संपादक: सुबोध शाक्यरत्न  
M : 8108658970

Email- pr.janata@gmail.com