Top Post Ad

देशात चोर पावलांनी येत असलेल्या हुकूमशाहीचा प्रतिकार करा- अशोक सरस्वती बौद्ध

 राष्ट्रीय अध्यक्ष बौद्ध विहार समन्वय समिती यवतमाळ( प्रतिनिधी) देशात वर्तमान परिस्थितीमध्ये शासन सत्तेच्या माध्यमातून बनवण्यात येत असलेले वेगवेगळे  कायदे आणि घडत असलेल्या अनेक घटनांचा सविस्तर विचार केला असता लोकशाहीच्या आडून चोर पावलाने हुकूमशाही येत असल्याचे दिसून येते या हुकुमशाहीचा जनतेने प्रतिकार करावा असे आवाहन अशोक सरस्वती बौद्ध राष्ट्रीय अध्यक्ष अखिल भारतीय बौद्ध विहार समन्वय समिती  यांनी केले ते प्रबोधन यात्रा च्या निमित्ताने आयोजित 22व्या सभेत बोलत होते कार्यक्रमाचे अध्यक्ष  दशरथ मडावी राष्ट्रीय अध्यक्ष बिरसा क्रांती दल व प्रमुख पाहुणे डॉ. शरद मोरे संस्थापक प्रज्ञाशोध: आंबेडकरी विचार मंच होते.


स्थानिक संविधान चौकातील लॉर्ड बुद्ध विहार  येथे महात्मा ज्योतिबा फुले डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर संत जगनाडे महाराज संत गाडगेबाबा यांच्या संयुक्त  स्मृति दिनानिमित्ताने सुरू असलेल्या प्रबोधन यात्रेची सभा घेण्यात आली यावेळी  अशोक सरस्वती बौद्ध बोलत होते ही प्रबोधन यात्रा गेल्या 31वर्षा पासून संत गाडगेबाबा बहुउद्देशीय आश्रमाचे वतीने सुरु आहे यावर्षी २८ नोव्हेंबर ला शेंडगाव पासून सुरू झालेली असून  २५ डिसेंबर रोजी जरुड येथे मानसिक गुलामी विरुध्द परिषदेचे आयोजन करून समाप्त होईल. याप्रसंगी दशरथ मडावी यांनी आपल्या अध्यक्षीय भाषणातून हुकूमशाही उलथून टाकण्यासाठी सर्व समाजाने संघठित लढा देण्याचे आवाहन केले.

यावेळी नेर परसोपंत येथील डॉ.शरद मोरे,वनिताताई मोरे यांनी विचार व्यक्त केले.या प्रसंगी बुध्द विहार समन्वय समितीचे वतीने जी पालि भाषा परीक्षा संपन्न झाली त्यात पाली भाषा भाग 1 मध्ये कीरण ताई मेश्राम यांना जिल्हास्तरीय प्रथम पुरस्कार  .तर भाग 2 मध्ये प्रियाताई वासनिक यांना प्रथम व जयश्री भगत यांना द्वितीय पुरस्कार देण्यात आला .कार्यक्रमाचे प्रास्ताविक गोकुलदास आठवले व अशोक दिघाडे यांनी सूत्र संचालन  तर डॉ.प्रा.राजू इंगोले यांनी आभार प्रदर्शन केले.  कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी विनायक वानखडे अरूणा इंगोले विजय कांनदे निलध्वज कांबळे ठेकेदार सर संघमिञा चहांदे विठ्ठल राऊत लता राऊत शिलाताई मेश्राम  अर्चना ढोकणे संगीता शंभरकर भोयर सर पिंपळकर सर प्रज्ञा रामटेके सविता इंगळे शिशिकला इंगोले शारदा अघम रंजना रामटेके अरुणा दि इंगोले यांनी विशेष प्रयत्न  केले.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

 READ / SHARE  / FORWARD 
JANATA  NEWS  xPRESS

निरंतर सेवेच्या आर्थिक मदतीकरिता 
for Donation
G pay 8108658970 

संपादक: सुबोध शाक्यरत्न  
M : 8108658970

Email- pr.janata@gmail.com