Top Post Ad

नवी मुंबईत 20 हजार उपस्थितांची आसनक्षमता असलेला मल्टीपर्पज इनडोअर लाईव्ह एन्टरटेन्मेंट अरिना

नवी मुंबईत अमेरिकेतील न्यूयॉर्क इथं असणाऱ्या विश्वविख्यात मॅडिसन स्क्वेअर गार्डन आणि लंडनमधी O2 अरिना यांच्या धर्तीवर एक मल्टीपर्पज इनडोअर लाईव्ह एन्टरटेन्मेंट अरिना उभारण्यात येणार आहे.  या महत्त्वाकांक्षी प्रकल्पामध्ये 20 हजार उपस्थितांची आसनक्षमता आणि 25 हजार प्रेक्षकांना उभं राहता येईल अशी क्षमता असेल. विविध स्तरांवरील संगीत कार्यक्रम, कॉन्सर्ट, आंतरराष्ट्रीय स्तरावरील क्रीडा स्पर्धा, सांस्कृतिक कार्यक्रम, महोत्सव अशा कार्यक्रमांसाठी हा अरिना उपलब्ध असेल. मुख्य म्हणजे भारतातील मनोरंजन विश्वाला या अरिनामुळं एक नवं आणि तितकंच भव्य असं जागतिक स्तरावरील कलामंच मिळणार आहे. 

हा प्रकल्प पूर्णत्वास गेल्यानंतर नेमका कसा दिसेल याचीच उत्सुकता आतापासून पाहायला मिळत आहे.  नवी मुंबईत विमानतळामुळं भूखंडांपासून तयार घरांचे दरही गगनाला भिडलेले असतानाच आता या शहराला नवी ओळख देणारा हा प्रकल्प सिडकोच्या दृष्टीक्षेपात असून, त्यासाठी प्राथमिक स्तरावरील कार्यवाहीसुद्धा सुरू करण्यात आल्य़ाची माहिती समोर आली आहे.  जागतिक स्तरावरील या अरिनासाठी सिडकोनं निविदा मागवल्या असून, 9 ते 31 डिसेंबर सायंकाळी 5 वाजेपर्यंत ऑनलाईन निविदा प्रक्रियेसाठीची मुदत ठरवण्यात आली आहे. यामध्ये उद्योग क्षेत्रातील प्रतिष्ठीत संस्थांचं योगदान मिळवण्याचा मानस सिडकोनं बाळगला आहे. ही वास्तू उभी राहताना आणि बांधकाम पूर्ण झाल्यानंतर प्रत्यक्षात वापरात आल्यानंतर मोठ्या प्रमाणात रोजगार निर्मिती होणार असल्याची शक्यता असून, मनोरंजन क्षेत्रात काम करु इच्छिणाऱ्यांसाठीसुद्धा ही एक नवी संधी असेल असेही सिडकोच्या वतीने स्पष्ट करण्यात आले आहे.  

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

 READ / SHARE  / FORWARD 
JANATA  NEWS  xPRESS

निरंतर सेवेच्या आर्थिक मदतीकरिता 
for Donation
G pay 8108658970 

संपादक: सुबोध शाक्यरत्न  
M : 8108658970

Email- pr.janata@gmail.com