अध्यक्षीय भाषणात प्रा. आनंद देवडेकर यांनी पुस्तकाच्या अनेक पैलूंवर प्रकाश टाकत, बाबासाहेबांच्या चळवळीचा आढावा घेत विश्वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी क्रांतीज्योती महात्मा फुले यांना गुरू मानलं तरी बाबासाहेबांनी सत्यशोधक चळवळ किंवा सत्यशोधक समाज यांचे ते सभासद झाले नाही तरी स्वतच्या मानवमुक्ती चळवळीतून आपले कार्य सुरू ठेवले व ती जनमानसात रुजवण्याचा प्रयत्न केला व आपल्या बांधवांना अंधारातून प्रकाशात आणण्याचा प्रयत्न केला, बाबासाहेबांनी अनेक ग्रंथांचे वाचन, चिंतन, मनन केले परंतु त्यांचे मन बुद्ध विचारधारेकडेच वळले व शेवटी त्यांनी बुद्धधम्माचा मार्ग स्वीकारला आणि आपल्या लाखों बांधवांना त्या मार्गावर मार्गस्थ केले, बाबासाहेबांनी आपल्या प्रत्येक सभेत परिवर्तनाचे जे जे विचार मांडले त्याचे संकलन करून त्याला ग्रंथरूपात संपादन करण्याचे महान कार्य अशोक जाधव यांनी केले आहे, हे पुस्तक केवळ पुस्तक नसून एक दस्तऐवज स्वरूपातील प्रत्येक माणसाला दिशा देणारा मार्गदर्शक ग्रंथ आहे असे नमूद केले लेखकाचे कौतुक करून त्यांच्या पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.
शेवटी सर्वांच्या प्रशंसाची पोचपावती स्वीकारत लेखक अशोक जाधव यांनी मी सूची दिली नाही परंतु घटनांच्या तारखा, ठिकाण आणि वेळ हे दिल आहे. कारण लोकांनी त्याचे वाचन, पठण, चिंतन, मनन करून त्यातून शिकवण घेऊन पुढील वाटचाल करावी या उद्देशाने मी सूची देण्याचे टाळले आहे असे नमूद केले तसेच सदर ग्रंथ संपादन कार्यात ज्या ज्या लोकांनी मला अमूल्य अशी मदत केली, योगदान दिले त्यांच्या मी कायम ऋणात राहील असे सांगून त्या सर्वांचे तसेच पाहुणे, आभार मानले.

0 टिप्पण्या