Top Post Ad

मुंबईतील काळाचौकी येथे 10 व 11 जानेवारी रोजी रोटरी क्वीन सिटी मेगा मेडिकल कॅम्पचे आयोजन

 रोटरी क्लब ऑफ बॉम्बे क्वीन सिटी त्यांच्या प्रमुख उपक्रमांतर्गत 'रोटरी क्वीन सिटी मेगा मेडिकल कॅम्प' चे आयोजन शिवाजी विद्यालय, काळाचौकी, काळाचौकी पोलीस स्टेशनजवळ, इमारत क्र. 3 समोर, मुंबई येथे दि. 10 व 11 जानेवारी रोजी सकाळी 10.00 ते सायंकाळी 4.00 या वेळेत (दोन्ही दिवस) करत आहेत. हा या उपक्रमाचा 17 वा वर्षाचा कॅम्प असून, मागील सोळा कॅम्पमध्ये प्रत्येकी 3,000 पेक्षा अधिक रुग्णांची मोफत तपासणी करण्यात आली आहे.या कॅम्पसाठी पी. डी. हिंदुजा हॉस्पिटल, सर एच. एन. रिलायन्स हॉस्पिटल, कमलादेवी गौरीदत्त मित्तल आयुर्वेदिक हॉस्पिटल, कॅन्सर पेशंट्स एड असोसिएशन, व्हिजन फाउंडेशन ऑफ इंडिया आणि कैवल्यधाम यांसारख्या नामांकित वैद्यकीय संस्थांतील तज्ज्ञ डॉक्टरांची उपस्थिती असणार आहे.या कॅम्पदरम्यान खालील सुविधा मोफत पुरविण्यात येणार आहेतः

डोळे, दंत, दमा, अस्थिरोग, ई.एन.टी., हृदयरोग, कॅन्सर इत्यादींची मोफत तपासणी रक्त व मधुमेह तपासणी मोफत मोतीबिंदू शस्त्रक्रिया मोफत आयुर्वेदिक तपासणी, सल्ला व औषधांचे वितरण चष्मे अत्यंत सवलतीच्या दरात उपलब्ध योग व फिजिओथेरपीचे प्रात्यक्षिक व सल्ला मोफत ईसीजी व मोफत श्रवणयंत्रे .हा उपक्रम रोटरी जिल्हा 3141 च्या गव्हर्निंग बॉडीकडून उत्कृष्ट सामुदायिक सेवा कार्यक्रम म्हणून मान्यता प्राप्त असून, स्थानिक महानगरपालिका विभाग, नगरसेवक, आमदार तसेच पोलीस स्टेशन यांचे सहकार्य लाभले असल्याची माहिती मुंबई मराठी पत्रकार भवन येथे डॉ अरूनकुमार गुप्ता यांनी दिली.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

 READ / SHARE  / FORWARD 
JANATA  NEWS  xPRESS

निरंतर सेवेच्या आर्थिक मदतीकरिता 
for Donation
G pay 8108658970 

संपादक: सुबोध शाक्यरत्न  
M : 8108658970

Email- pr.janata@gmail.com