Top Post Ad

भाजपसमोर वंचित–काँग्रेसचे तगडे आव्हान... वॉर्ड क्रमांक २०७ मध्ये चंद्रशेखर कानडे यांची प्रचारात आघाडी

येत्या १५ जानेवारी रोजी मुंबईसह राज्यातील २९ महानगरपालिकांसाठी होणाऱ्या निवडणुकांसाठी सर्वच राजकीय पक्षांनी जोरदार तयारी सुरू केली आहे. मुंबईतील २२७ प्रभागांमध्ये ठाकरे बंधूंची युती आणि भाजप महायुती यांच्यात मुख्य लढत पाहायला मिळत असली, तरी काँग्रेस–वंचित बहुजन आघाडीने सत्ताधाऱ्यांसमोर अनेक ठिकाणी कडवे आव्हान उभे केले आहे. मुंबईच्या भायखळा विधानसभा इ वॉर्ड प्रभाग क्रमांक २०७ मध्ये काँग्रेस–वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार चंद्रशेखर कानडे यांनी प्रचारात आघाडी घेऊन सर्वच उमेदवारासमोर मजबूत आव्हान निर्माण केले आहे. या वॉर्डमधून भाजपचे रोहिदास लोखंडे, शिवसेना–मनसे युतीच्या शलाका हरियाण, माजी आमदार अरुण गवळी यांची कन्या योगिता गवळी यांच्यासह  अपक्ष उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात आहेत.

  जिजामाता भोसले उद्यान (राणीबाग),  संत गाडगेबाबा मंडई, रामनगर,  निर्मल पार्क, साई द्वारका, डॉक्टर कंपाऊंड, दत्ताराम लाड मार्ग, तेली गल्ली, अर्थरोड  नाका, पानसरे चाळ, शिंदे चाळ, चिंचपोकळी, बकरी अड्डा , विनायक वासुदेव , आशीर्वाद, समाधान, ब्रह्मा विष्णू महेश, नीलकंठ, चमेली वाडी, मकबाचाळ, मेहर पाडा, काझी बिल्डिंग, लक्ष्मी बिल्डिंग, कोमल निवास ,  कंजारवाडा, शिवनेरी, हनुमान प्रसाद परिसर समाविष्ट असलेला हा वॉर्ड मराठी बहुसंख्यांक लोकवस्तीचा असून माजी आमदार अरुण गवळी, मधु चव्हाण, यामिनी जाधव यांच्या प्रभावासाठी ओळखला जातो. अरुण गवळी यांच्या कन्येच्या उमेदवारीमुळे परिसरात काही प्रमाणात खळबळ जनक वातावरण चर्चा असल्याचे बोलले जाते. या पार्श्वभूमीवर काँग्रेस–वंचित आघाडीने लोकप्रिय सामाजिक कार्यकर्ते चंद्रशेखर कानडे यांना उमेदवारी देत सत्ताधाऱ्यांसमोर ठोस पर्याय उभा केला आहे. कानडे यांचे या परिसरातील दीर्घकालीन सामाजिक कार्य, सर्वसामान्यांशी असलेला थेट संपर्क आणि प्रभावी जनसंपर्क यामुळे त्यांचे पारडे जड असल्याचे चित्र आहे.      

     उमेदवार चंद्रशेखर कानडे यांनी भाजपचे उमेदवार सुरेखा रोहिदास लोखंडे यांच्या कार्यकाळातील कथित  रस्ते, गटारे, पाणीपुरवठा, दिवाबत्ती यांसारख्या मूलभूत नागरी सुविधांच्या अभावावर थेट बोट ठेवले आहे. सत्तेत असतानाही विकासकामे न झाल्यामुळे वॉर्डातील नागरिकांमध्ये लोखंडे यांच्याविरोधात तीव्र नाराजी असल्याचे कानडे यांनी सांगितले. मराठीच्या मुद्द्यावर एकत्र आलेल्या ठाकरे बंधूंच्या युतीबाबतही या वॉर्डमध्ये नागरिकांमध्ये विशेष उत्साह दिसून येत नाही. त्यामुळे “समाजात प्रत्यक्ष काम करणारा उमेदवार” अशी ओळख असलेले चंद्रशेखर कानडे यांना वाढता पाठिंबा मिळत असून, वॉर्ड क्रमांक २०७ मध्ये लढत अधिक रंगतदार होत असल्याचे चित्र आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

 READ / SHARE  / FORWARD 
JANATA  NEWS  xPRESS

निरंतर सेवेच्या आर्थिक मदतीकरिता 
for Donation
G pay 8108658970 

संपादक: सुबोध शाक्यरत्न  
M : 8108658970

Email- pr.janata@gmail.com