Top Post Ad

अखेर ठाण्याचा महापौर ठरला.... शर्मिला पिंपळोलकर यांच्या नावावर शिक्कामोर्तब

 महापौर आणि उपमहापौर पदासाठी उमेदवारी अर्ज भरण्याचा आज अंतिम दिवस असल्याने, ठाणे महानगरपालिकेतील सत्तास्थापनेबाबतची राजकीय गणिते अंतिम टप्प्यात आली आहेत.   महापौर पदावर शिवसेना शिंदे गटाचा  दावा निश्चित झाल्याचे चित्र आहे. शिवसेनेकडून शर्मिला पिंपळोलकर  यांच्या नावावर शिक्कामोर्तब झाले आहे. आज  ठाणे महापालिकेच्या महापौर केबिनमध्ये शिवसेनेच्या सर्व महिला नगरसेवकांची बैठक पार पडली. यावेळी विमल भोईर, शर्मिला पिंपळोलकर आणि डॉ. दर्शन जानकर हे महापौर पदाचे प्रबळ दावेदार उपस्थित होते. या बैठकीत शिवसेनेने महापौर पदाचा उमेदवार निश्चित केला आहे. शर्मिला पिंपळोलकर यांच्या नावावर शिक्कामोर्तब झाल्याची माहिती समोर येत आहे.  दुसरीकडे, ठाण्यात भाजपने सत्तेत सहभागी होण्याचा निर्णय घेतला असून, उपमहापौर पदावरही भाजपचा प्रतिनिधी बसवण्याची तयारी केली आहे. भाजपकडून कृष्णा पाटील  यांना उपमहापौर पदासाठी उमेदवारी अर्ज भरण्याचे आदेश देण्यात आल्याची माहिती आहे. भाजपची आक्रमक विरोधाची भूमिका आता मावळल्याचे दिसून आल्याची चर्चा मात्र ठाण्यात रंगली आहे.

 शिंदेसेनेने ठाण्यात भाजपला दोन वर्षांसाठी महापौरपद देण्यास स्पष्ट नकार दिला आहे. ठाणे महापालिका निवडणूक युतीत शिंदेसेनेला 75, तर भाजपला 28 जागा मिळाल्या आहेत. संख्याबळाच्या जोरावर शिवसेनेने भाजपला एक वर्षही महापौरपद देणार नसल्याचे स्थानिक पातळीवर स्पष्ट केल्याची माहिती सूत्रांनी दिली. महापौरपद मिळणार नसल्याने भाजपने स्थायी समिती, परिवहन समिती, विषय समित्या, प्रभाग समित्या आणि शिक्षण मंडळावर दावा ठोकला आहे. शिंदेसेनेकडून भाजपला उपमहापौरपद घ्यावे, तसेच विषय आणि प्रभाग समित्या तीन व दोन वर्षे अशा कालावधीत दोन्ही पक्षांकडे राहतील, असा प्रस्ताव देण्यात आल्याची माहिती सूत्रांकडून मिळत आहे. 

ठाणे महानगरपालिकेतील  एकूण जागा -131/ शिवसेना (शिंदे) - 75 / भाजप - 28 /  राष्ट्रवादी (अजित पवार) - 9 / शिवसेना (उद्धव ठाकरे) - 1 / राष्ट्रवादी (शरद पवार) - 12 / एमआयएम - 5 / अपक्ष - 1

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

 READ / SHARE  / FORWARD 
JANATA  NEWS  xPRESS

निरंतर सेवेच्या आर्थिक मदतीकरिता 
for Donation
G pay 8108658970 

संपादक: सुबोध शाक्यरत्न  
M : 8108658970

Email- pr.janata@gmail.com