Top Post Ad

गरीब मुलांना मोफत वाटण्यासाठी असलेली पुस्तके भंगारात विकली!

सरकारी शाळांमध्ये शिकणाऱ्या गरीब मुलांना मोफत वाटण्यासाठी असलेली हजारो नवीन पुस्तके भंगारात विकली गेली. जेव्हा ही पुस्तके मुलांच्या बॅगमध्ये असायला हवी होती, तेव्हा विभागातील काही लोभी सदस्यांनी ती एका भंगार विक्रेत्याच्या दुकानात नेली. पोलिसांनी भंगार विक्रेत्याच्या दुकानावर छापा टाकला तेव्हा त्यांना सुमारे 13 हजार नवीन पुस्तके सापडली. ही धक्कादायक घटना उत्तर प्रदेशातील बहराइच जिल्ह्यातील आहे. या प्रकरणात या घोटाळ्याचा सूत्रधार बीएसए कार्यालयातील कर्मचारी अलोक मिश्रा असल्याचे निष्पन्न झाले, 13 हजारांहून अधिक पुस्तके भंगारात विकणारा मुख्य आरोपी आलोक मिश्रा हा बीएसए कार्यालयात पुस्तक देखभालीचा प्रभारी होता. त्याने आपल्या साथीदारांसह अधिक पैसे कमविण्यासाठी ही योजना आखली. असे तपासात दिसून आले.

संपूर्ण प्रकरणातील सर्वात लज्जास्पद बाब म्हणजे ही मौल्यवान पुस्तके भंगार विक्रेत्याला फक्त 4 रूपये दराने विकण्यात आली. ही पुस्तके बहराइचहून उत्तराखंडला पाठवण्यासाठी पूर्णपणे तयार होती. पुस्तकांनी भरलेला एक ट्रक लखीमपूर खेरी येथे पोहोचला होता, परंतु या गोष्टीची खबर लागताच पोलिसांनी तात्काळ कारवाई केली आणि ट्रक हायवेवर जप्त केला.
या प्रकरणी रामगाव पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यानंतर पोलिसांनी मोठी कारवाई केली आहे. शिक्षण विभागातील शिपाई आलोक मिश्रा, भंगार विक्रेते दिलशाद, शुभंकर गुप्ता आणि अर्जुन यांना अटक करून त्यांची तुरुंगात रवानगी करण्यात आली आहे. तर या प्रकरणी विभागाने आशुतोष सिंग, दीपक कुमार आणि अतुल सिंग या कर्मचाऱ्यांना तात्काळ बडतर्फ केले आहे.
तसेच सहाय्यक वित्त आणि लेखा अधिकारी वीरेश कुमार वर्मा, गट शिक्षण अधिकारी रणजित कुमार आणि शहर शिक्षण अधिकारी डॉली मिश्रा यांना कारणे दाखवा नोटीस बजावण्यात आल्या. त्यांच्याविरुद्ध कठोर विभागीय कारवाईची विनंती करणारे पत्र सरकारला लिहिले आहे, ज्यामुळे शिक्षण विभागात खळबळ उडाली आहे.
पुस्तक विक्री प्रकरणी जिल्हा दंडाधिकारी बहराईच अक्षय कुमार त्रिपाठी यांच्याकडे त्यांच्या सीयूजीवर तक्रार करण्यात आली. या तक्रारीनंतर, रद्दी विक्रेत्यांना विकल्या गेलेल्या सरकारी शाळांच्या शैक्षणिक सत्र 2026-27ची पुस्तके जप्त करण्यात आली. या प्रकरणात गुन्हा दाखल करून कारवाई सुरू करण्यात आली.

अलिकडेच, सर्व शिक्षा अभियानांतर्गत शाळांना वाटण्यात येणाऱ्या पुस्तकांची भंगार म्हणून विक्री केल्याचा व्हिडिओ व्हायरल झाला होता. ज्यामुळे विभागात खळबळ उडाली. जिल्हाधिकार्यांनी स्थापन केलेल्या समितीने साठ्याची पडताळणी केली असता 10,000 हून अधिक पुस्तके गायब असल्याचे आढळून आले. धक्कादायक म्हणजे, बीएसएने सुरुवातीला साठा पूर्ण असल्याचा दावा करून आरोप फेटाळून लावले, परंतु चौकशी अहवालात भ्रष्टाचार उघडकीस आला.. या संपूर्ण घोटाळ्यात आणि बनावट समितीच्या आरोपांमध्ये, जिल्ह्याचे मूलभूत शिक्षण अधिकार्यांनी पुस्तके गायब होण्यावर आणि व्यापक भ्रष्टाचारावर मौन बाळगले आहे

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

 READ / SHARE  / FORWARD 
JANATA  NEWS  xPRESS

निरंतर सेवेच्या आर्थिक मदतीकरिता 
for Donation
G pay 8108658970 

संपादक: सुबोध शाक्यरत्न  
M : 8108658970

Email- pr.janata@gmail.com