मध्य रेल्वेने आर्थिक वर्ष 2025- 2026 मध्ये गेल्या वर्षाच्या तुलनेत 2.81% वाढ नोंदवत भंगार विक्रीतून 404.72 कोटी रुपये कमावलेले आहेत. मागील आर्थिक वर्ष 2024-2025 मध्ये विकलेल्या भंगारातून 393.65 कोटी रुपये रेल्वेला मिळाले होते. रेल्वेच्या वेगवेगळ्या श्रेणीतील व वापरात नसलेल्या व भंगार असलेल्या साहित्यात रेल्वे रुळाचे भंगार:- 40,117 एमटी, स्लीपर्स :- 2,55,318 नग, फेरस भंगार:- 25,790 एमटी, विना फेरस भंगार:- 3,325 एमटी, रोलिंग स्टॉक:- 47 लोकोमोटिव्ह (रेल्वे इंजिन), 70 कोचेस (रेल्वेचे डबे) आणि 110 मालवाहू व्हॅगन इत्यादी गोष्टी भंगाराच्या स्वरूपात विकल्या गेल्या.
मध्य रेल्वेच्या पुढील पाचही स्टोअर्स विभागातील कुर्ला कटिंग यार्ड, नाशिक येथील ट्रॅक्शन मशीन वर्कशॉप, मुंबईतील परळ वर्कशॉप, मनमाड वर्कशॉप, भुसावळ वर्कशॉप येथील आगारात असलेले भंगार शोधून शून्य स्क्रॅप मिशन योजनेची अंमलबजावणी करत रेल्वेच्या आर्थिक उत्पन्नात वाढ करण्याच्या उद्देशाने तसेच कार्यक्षमता व पर्यावरणीय शाश्वतता वाढविण्याची सातत्यपूर्ण वचनबद्धता राखत त्याचप्रमाणे संकल्पाची पूर्तता करत ही कामगिरी मध्य रेल्वे कडून यशस्वीरित्या पार पाडण्यात आली. या पाचही विभागातुन भुसावळ विभाग दिनांक 11/02/2026 रोजी पर्यंत 97.72 कोटी रुपयांची सर्वाधिक भंगार विक्री नोंदवत आघाडीवर होता. सदरहू माहिती एका प्रसिद्धी पत्र क्रमांक 2026/02/23 द्वारे मध्य रेल्वेचे मुख्य जनसंपर्क अधिकारी डॉक्टर स्वप्निल नीला यांनी दिली आहे.
0 टिप्पण्या