Top Post Ad

टिपू सुलतान नावाचा विरोध .... ध्रुवीकरणाच्या अजेंड्याकरिता विकृत धर्मांधतेचे राजकारण .

 टिपू सुलतान नावाचा विरोध करणाऱ्या भाजपाचा दुटप्पीपणा... ध्रुवीकरणाच्या अजेंड्याकरिता विकृत धर्मांधतेचे राजकारण .
२०१२ – अकोला महानगरपालिका स्थायी समिती सभागृहाचे नाव “शहीदे वतन शेरे म्हैसूर टिपू सुलतान” ठेवण्याचा ठराव भाजपानेच मांडला. सूचक: माजी महापौर व सध्याचे भाजपाचे अकोला महानगर निवडणूक प्रमुख व माजी महानगर भाजप अध्यक्ष विजय अग्रवाल.
२०१३ – मुंबईच्या एम/पूर्व वॉर्डातील रस्त्याला “शहीद टिपू सुलतान मार्ग” नाव देण्याच्या भाजपा नगरसेवकाच्या प्रस्तावासाठी भाजपाचे नगरसेवक दुथडी भरून उपस्थित तर होते पण सध्याच्या महापौर रितू तावडे यांचे नाव वर दिसेल बरं!

२००१ – अंधेरी (प) येथे “शेरे म्हैसूर टिपू सुलतान” मार्ग नामकरण.  भाजपाचे माजी खासदार गोपाळ शेट्टी यांच्या उपस्थितीत आणि भाजपा नगरसेवकांच्या मांदियाळीत ठराव एकमताने मंजूर.
भाजपा नेते व कर्नाटकचे माजी मुख्यमंत्री बी. एस. येडीयुरप्पा यांनी टिपू सुलतान यांच्या कबरीवर जाऊन अभ्यागत वहीत गौरवोद्गार नोंदवले.
२०१७ – कर्नाटक विधानसभेत राष्ट्रपती राम नाथ कोविंद यांनीही टिपू सुलतानाकरिता गौरवोद्गार काढले होते. 
भाजपाला आधी प्रेम होते पण ध्रुवीकरणाच्या अजेंड्याकरिता आज टिपू सुलतान वाईट झाला या दुटप्पीपणाला काय म्हणावे? 


टिपू सुलतान हे खरेच राष्ट्रवादी, समतावादी, सेक्युलर होते.त्यांना मैसूर चा वाघ म्हणून ओळखले जाते.त्यांच्या काही गोष्टी ज्याचा जास्त प्रसार झालेला नाही.
१) अस्पृश्य स्त्रीयांना स्तन झाकण्याचा अधिकार हा सर्व प्रथम हैदर अली व नंतर टिपू सुलतान यांनीच दिला.
२) समाजातील सर्व लोक समान आहेत, कोणीही उच्च/निच नाही.याचा प्रचार केला.
३) पेशव्यांनी जेव्हा शंकराचार्यांचा मठ लुटला,तेव्हा शंकराचार्यांना संरक्षण देऊन त्यांच्या मठाची उभारणी करून दिली.
४) पेशव्यांनी जेव्हा मंदिर लुटली,त्यांचा विध्वंस केला तेव्हा मंदिरांना संरक्षण देऊन त्यांचा पुनर्विकास केला.
५) ब्रिटिशां बरोबर शेवट पर्यंत लढा दिला.
६) भारतात सर्वप्रथम आधुनिक फ्रेंच बनावटीचे तोकखाणे,बंदुके यांचा वापर केला.
७) ब्रिटिशांच्या विरोधात सर्वांनी एकत्र येऊन लढा द्यावा.यासाठी प्राणपणाने प्रयत्न केले.
असे हे थोर राष्ट्रप्रेमी टिपू सुलतान होते.




टिपू सुलतानच्या फोटोला हिंदुत्ववादी विरोध करून राह्यलेत. खरतर टिपूचा फोटो सगळ्यात आधी हिंदुत्ववादी मंडळींनी घरोघरी लावायला हवा.
का ?
वैदिकांचे आराध्य कोण ?
शंकराचार्य
त्यांचा मठ कुठे ?
कर्नाटकात शृंगेरीला
देवी शारदेची मूर्ती कुठे ?
शृंगेरी मठात.
त्या मठावर हल्ला कधी झाला ?
१७९० मध्ये
हल्ला, जाळपोळ, लुटालूट कुणी केली ?
इंग्रज आणि पेशव्यांच्या संयुक्त फौजांनी.
पेशव्यांचे सरदार कोण होते
परशुरामपंत आणि हरीपंत
मग मठाला संरक्षण कुणी दिले ?
टिपू
मठाची दुरुस्ती कुणी केली ?
टिपू
शारदेची मूर्ती पुन्हा स्थापन करायला आर्थिक मदत कुणी केली
टिपू
आता सांगा शृंगेरी पीठावर हल्ला करून जाळपोळ करणाऱ्याची बाजू वैदिकांनी घ्यावी कि टिपूची बाजू घ्यावी ?
मुस्लिम शासकांना सरसकट बदनाम करण्या साठी RSS ने  मागची शंभर वर्ष मेहनत घेतली आहे आणि वेगवेगळी प्रयोजन करून ते खोलवर रुजवलं आहे, जे अभ्यास करतात ते या जाळ्यातून मुक्त होत आहेत बाकी त्यांचे गिऱ्हाईक आहेत.
- आनंद शितोळे


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

 READ / SHARE  / FORWARD 
JANATA  NEWS  xPRESS

निरंतर सेवेच्या आर्थिक मदतीकरिता 
for Donation
G pay 8108658970 

संपादक: सुबोध शाक्यरत्न  
M : 8108658970

Email- pr.janata@gmail.com