Top Post Ad

पोलिसांनी केले 'स्पा'च्या नावाखाली सुरु असलेले सेक्स रॅकेटचे नेटवर्क उद्धवस्त

 गुजरातच्या सूरत शहरामध्ये पालनपूर गावातील राज वर्ल्ड शॉपिंग सेंटरमध्ये स्पाच्या नावाखाली बेकायदेशीर देहव्यापार आणि सेक्स रॅकेट चालवलं जात असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. या माहितीच्या आधारे डीसीपी झोन 7 च्या एलसीबी टीम आणि पोलिसांच्या अन्य तुकड्यांनी या ठिकाणी छापा मारला. यामुळे एका मोठ्या सेक्स रॅकेटचा भांडाफोड झाला आहे.  स्पाच्या नावाखाली सुरु असलेल्या सेक्स रॅकेटचं नेटवर्क उद्धवस्त करण्यात पोलिसांना यश आलं आहे. ही कारवाई राज वर्ल्ड शॉपिंग सेंटर नावाच्या इमारतीमधील तिसऱ्या मजल्यावरील एका स्पामध्ये करण्यात आली.  पोलिसांनी या प्रकरणामध्ये तीन ग्राहकांसहीत एकूण पाच जणांना अट केली.  अटक करण्यात आलेल्यांमध्ये स्पा मॅनेजर शुभ्रे बाबूराव चक्रवर्ती आणि सहाय्यक विपिन उर्फ रिंकु जगदीश शाहू यांचा समावेश आङे. तर अटक केलेल्या ग्राहकांची नाव दीपकभाई शाह, वीरसिंह शांतिजी कोली, उमेश दिलीप शर्मा असं आहे. स्पाचा मालक आखाश अंकुशभाई धनावडे सध्या फरार आहे.

छापेमारीदरम्यान छोट्या छोट्या आकाराच्या खोल्यांमध्ये महिला नको त्या अवस्थेत आढळून आल्या असून देहविक्रेय व्यवसायात ढकलण्यात आलेल्या चार महिलांना पोलिसांनी वाचवलं आहे. तसेच 8 हजार 500 रुपये रोख रक्कमही तर एका खोलीत न वापरलेल्या कंडोमचा ढीगही सापडला. लाइट बील, इतर कागदपत्रं आणि बऱ्याच गोष्टीसह चार छोट्या आणि एक मोठी डायरीही या छाप्यादरम्यान मिळाली. या डायरीमध्ये महिलांची नाव, ग्राहकांकडून घ्यायचे पैसे याचा हिशोब मांडला होता. पोलिसांना वेगवेगळ्या रंगांचे 39 टोकनही या ठिकाणी सापडले. टोकनच्या माध्यमातून व्यवहार आणि सौदा व्हायचा असं तपासात समोर आलं. पोलिसांच्या चौकशीमध्ये महिलांचे फोटो मोबाईलवरुन पाठवून या स्पामध्ये ग्राहकांना आणलं जायचं. पोलिसांनी या स्पामधून असे 11 मोबाईल जप्त केले ज्यांच्या माध्यमातून ग्राहकांशी संपर्क केला जायचा. यापैकी सात मोबाईल हे स्पा सेंटरमधील होते तर चार मोबाईल ग्राहकांशी संपर्क साधण्यासाठी वापरले जायचे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

 READ / SHARE  / FORWARD 
JANATA  NEWS  xPRESS

निरंतर सेवेच्या आर्थिक मदतीकरिता 
for Donation
G pay 8108658970 

संपादक: सुबोध शाक्यरत्न  
M : 8108658970

Email- pr.janata@gmail.com