पाली भाषा विभागासाठी स्वतंत्र भवन उभारावे या मागणीकरिता आग्रही असलेल्या भंते विमांसा यांचा मुंबई विद्यापीठाकडून होत असलेल्या छळवणूकीच्या विरोधात विद्यापीठ प्रशासनाचा निषेध करण्यासाठी, व सामान्य विद्यार्थ्यांच्या न्याय मागण्यांना पाठिंबा देण्यासाठी शुक्रवार दि.२७ फेब्रुवारी रोजी सायंकाळी ६ वाजता, " पाली भाषा संवर्धन समन्वय समिती व जाती अंत संघर्ष समिती, महाराष्ट्र तर्फे मुंबई शहरातील सामाजिक बांधिलकी मानणाऱ्या व्यक्ती व संघटनांच्या सहभागाने, डॉ बाबासाहेब आंबेडकर भवन, दादर पूर्व येथे जाहीर निषेध सभा आयोजित करण्यात आली आहे.
या निषेध सभेत: डॉ.भीमराव आंबेडकर ( कार्याध्यक्ष, भारतीय बौद्ध महासभा) डॉ भालचंद्र मुणगेकर ( माजी कुलगुरू व खासदार)
अर्जून डांगळे,( जेष्ठ आंबेडकरी नेते व साहित्यिक)
डॉ. प्रज्ञा दया पवार( साहित्यिक)
डॉ.चंद्रशेखर कुलकर्णी ( सेक्रेटरी,बुक्टू व सिनेट सभासद)
कॉ शैलेंद्र कांबळे ( निमंत्रक,जाती अंत संघर्ष समिती),
सुबोध मोरे ( दलित पँथर सुवर्ण महोत्सव समन्वय समिती)
प्रा.सुधा मोहिले ( पाली भाषा,अभ्यासक) हे मान्यवर सहभागी होणार आहेत.
मुंबई विद्यापीठ प्रशासन व शासनाच्या भंते वरील दडपशाहीचा शांततापूर्ण पद्धतीने निषेध करण्यासाठी, लोकशाहीप्रेमी, संविधान मुल्य मानणाऱ्या नागरिकांनी मोठ्या संख्येने सभेला उपस्थित रहावे! असे आवाहन आयोजकांनी केले आहे. मुंबई विद्यापीठात पाली भाषा भवन बांधून,त्या विभागाचा विकास व संवर्धन करण्यासाठी शासनाने अनुदान द्यावे तसेच नवे सुसज्ज कॉ .अण्णा भाऊ साठे यांच्या नावाने विद्यार्थ्यांसाठी वसतिगृह बांधावे.तसेच पी.एच.डी करणार्या भंते भदंत विमांसा यांना पुन्हा सन्मानाने वस्तीगृहातच राहण्याची सोय करावी आदि.मागण्यांसाठी शांततापूर्ण मार्गाने निषेध करणार्या भंते विमांसा यांचा मुंबई विद्यापीठ प्रशासन व शासनाच्या मदतीने जी छळवणूक, मानहानी व सुरक्षा रक्षकांतर्फे जी मारहाण करण्यात आली.
तसेच त्यांना जबरदस्तीने वस्तीगृहाच्या बाहेर काढले, भगवान गौतम बुद्ध, डॉ बाबासाहेब आंबेडकरांच्या प्रतिमांही प्रशासनाने ताब्यात घेऊन त्यांचा उपासना करण्याचाही हक्क डावलला.आणि भंतेंवर विद्यापीठाच्या आवारात रस्त्यावर राहण्याची अमानवी पाळी आणली आहे. तसेच त्यांचा पी एच डी चा प्रवेश, कुठलीही सुचना, नोटीस न देता रद्द केला.तसेच त्यांना भेटण्यासही नागरिकांनाही मनाई केली आहे.एवढेच नव्हे तर, सुरक्षा व्यवस्थेचा बाऊ करुन, विद्यापीठात सामान्य विद्यार्थ्यांच्यासाठी असलेली सार्वजनिक " बेस्ट" ची बस ची सोयही बंद करून विद्यार्थ्यांना त्रास देण्याचे काम प्रशासन करीत आहे.-------------------------------------
- संपर्क:
- 7977780981 --( भंते पूर्ण)
- 9324442126,(इंद्रजित मोहिते)
- 7506692260 , 9789009593.( भंते भदंत विमांसा)

0 टिप्पण्या