इराणमधील राजकीय आणि आर्थिक संकटांच्या काळात, सत्ताधारी वर्ग बहाई समुदायाला नाहक बळी देऊन त्यांच्यावर अत्याचार केल्या जात आहे. बहाईंवर खोटे आरोप, अटक आणि द्वेषपूर्ण भाषणे वाढली असून, देशव्यापी निदर्शनांना जबाबदार धरून त्यांना लक्ष्य केले जात आहे ऐतिहासिकदृष्ट्या इराणमध्ये बहाईंवर पद्धतशीर दडपशाही चालू आहे कारण इराणमध्ये सामाजिक, आर्थिक किंवा राजकीय संकट आल्यावर, सरकार लक्ष वळवण्यासाठी बहाई समुदायाला जबाबदार धरते. सरकारी टेलिव्हिजनवर बहाईंविरुद्ध खोटा प्रचार, जबरदस्तीने कबुली जबाब आणि त्यांच्या मालमत्तेची लूट केली जात आहे इराणमध्ये बहाईंवर अत्याचार आणि अटकेच्या घटनांमध्ये मोठी वाढ झाली आहे. याबाबत बहाई इंटरनॅशनल कम्युनिटीने (BIC) या कृत्यांचा निषेध केला असून, आंतरराष्ट्रीय समुदायाला इराणमधील बहाईंच्या मानवाधिकारांचे रक्षण करण्यासाठी पुढे येण्याचे आवाहन केले आहे. हा छळ केवळ धार्मिक भेदभाव नसून, राजकीय हेतूने प्रेरित असल्याचे मुंबईच्या बहाई से्न्टरमधून सांगितले.
इराणी लोक न्याय आणि राष्ट्रीय पुनर्जागरणाची मागणी करत असताना, त्यांच्या मागण्या हिंसाचार, दडपशाही आणि जीवितहानीद्वारे पूर्ण केल्या जातात. या संकटाच्या काळात, बहाई आंतरराष्ट्रीय समुदाय (BIC) बहाई समुदायाच्या राज्य नेतृत्वाखालील छळात धोकादायक वाढ होण्याची शक्यता निर्माण होत आहे. गेल्या आठवड्यात, इराणच्या चॅनल 2, राज्य टेलिव्हिजनने बहाईंविरुद्ध बनावट आरोप प्रसारित केले आहेत, तसेच वाढत्या अटकेच्या बातम्या प्रसारित केल्या आहेत. सर्वात चिंताजनक म्हणजे, 1 फेब्रुवारी 2026 रोजी, इस्लामिक रिपब्लिक ऑफ इराण ब्रॉडकास्टिंग (IRIB) ने दोन बहाईंनी तथाकथित "कबुलीजबाब" प्रसारित केले - स्पष्टपणे दबाव आणि जबरदस्तीने मिळवलेल्या कबुलीजबाब याबाबत मानवाधिकार संघटनांनी अशा पद्धतींचे दीर्घकाळ दस्तऐवजीकरण केले आहे,जिनिव्हा स्थित संयुक्त राष्ट्रात बहाई समुदायाच्या प्रतिनिधी सुश्री फहांदेन यांनी म्हटले की, "इराण सरकारकडून सत्याला तोडून मोडून सादर करण्याचा आणि स्वतःच्या लोकांसमोर खोटे परीराण्याचा हा आणखी एक प्रयत्न आहे. पण हे सिद्ध झाले आहे की हा एक घिसापिटा आणि निराधार प्रयत्न आहे राष्ट्रीय संकटाच्या प्रत्येक क्षणी सामाजिक, आर्थिक किंवा राजकीय संकट असो-इराणचे अधिकारी सातत्याने आणि सुनियोजितपणे बहाई समुदायखला बळीचा बकरा बनवत आले आहेत. बहाई समुदायावर अनेकदा खोटे आरोप लावले गेले आहेत, त्यांना दोषारोपांचे लक्ष्य बनविण्यात आले आहे आणि सुनियोजित दुष्प्रचार तसेच दवेष पसरविणाऱ्या मोहिमांद्वारे त्यांना लक्ष्य केले गेले आहे. हा सिलसिला वारंवार चालत राहिला आहे आणि हाच प्रकार पुन्हा पाहत आहोत. 'बहाई लोकांनी खोट्या दोषारोपणां आणि निर्दयी अत्याचारानंतरही दृढता आणि आपल्या देशाविषयी सेवाभाव दाखविला आहे आणि त्यांनी कधीही हिंसेचा आधार घेतलेला नाही.
सुश्री फहांदेन पुढे म्हणतात, आपल्या धर्माच्या तत्वांवर आधारित राहून, इराणमधील बहाईनी दशकानुदशके चालत आलेल्या असत्य छळानंतरही हिंसेना नेहमीच पूर्णपणे नाकारले आहे आणि स्वतःवर अत्याचार करणाऱ्याच्या घृणास्पद व अन्यायकारक डावपेचांचा आधार घेण्यास नकार दिला आहे. कोणत्याही संसारिक लाभाच्या बदल्यात आपल्या श्रदधा न सोडण्याचा त्यांचा आग्रह त्यांच्या तत्वाप्रती आणि सर्वांत महत्वाचे म्हणजे सत्यनिष्ठेच्या तत्वाप्रती त्यांच्या बांधिलकीचे दर्शन घडवतो. त्यांच्या अधिकाराबद्दलची त्यांची आस ही फक्त यासाठी आहे की ते आपल्या पवित्र मानल्या जाणाऱ्या भूमीवर आपल्या देशाच्या कल्याणात योगदान देऊ शकतील."बहाई सर्वत्र समाजाच्या भल्यासाठी काम करतात. इराणमध्येही, बहाई त्यांच्या देशाच्या शांततापूर्ण विकासासाठी शक्य तितके योगदान देण्याचा प्रयत्न करतात. मात्र केवळ त्यांच्या धार्मिक श्रद्धेमुळे.इराणी सरकार त्यांना प्रत्येक ठिकाणी रोखत आहे.
इराणमधील सर्वात मोठे गैर-मुस्लिम धार्मिक अल्पसंख्याक असलेल्या बहाईंना नियमितपणे अटक केली जाते, ताब्यात घेतले जाते आणि तुरुंगात टाकले जाते. त्यांना सरकारी नोकऱ्या देण्यापासून रोखले जाते आणि त्यांची दुकाने आणि इतर उद्योग नियमितपणे बंद केले जातात किंवा सर्व स्तरांवरील अधिकाऱ्यांकडून त्यांच्याशी भेदभाव केला जातो. तरुण बहाईंना विद्यापीठात जाण्यापासून रोखले जाते आणि ती पोकळी भरून काढण्यासाठी प्रयत्न करणाऱ्या स्वयंसेवक बहाई शिक्षकांना अटक करून तुरुंगात टाकण्यात आले आहे. इराणी बहाईंना त्यांच्या मातृभूमीवर खूप प्रेम आहे, त्यांनी कितीही दुःख सहन केले असले तरी. त्यांच्यावर लादलेल्या निर्बंधांना न जुमानता, ते त्यांच्या आध्यात्मिक आणि सामाजिक जबाबदाऱ्या पार पाडतात. शेजारी, सहकारी, मित्र आणि ओळखीच्या लोकांसोबत रचनात्मक चर्चेत सहभाग घेऊन, ते तरीही त्यांच्या राष्ट्राच्या आणि लोकांच्या प्रगतीत योगदान देत राहतात."असेही सुश्री फहांदेन यांनी स्पष्ट केले.
१ फेब्रुवारी 2026 राष्ट्रीय आपातीच्या या काळात, जेव्हा इराणचे लोक न्याय आणि आपल्या देशाच्या उन्नतीसाठी आवाज उठवत आहेत आणि ज्याचे उत्तर हिंसा, दडपशाही आणि मोठ्या प्रमाणावर जीउ घेऊन दिले जात आहे, तेव्हा बहाई आंतरराष्ट्रीय समुदाय हराण सरकारकडून बहाई समुदायाला दोषारोपांचे लक्ष्य बनविण्याच्या नितीबाबत बहाई समाजात चिंता व्यक्त केली जात आहे. १९७९ च्या इस्लामी क्रांतीनंतरपासूनच सामाजिक, आर्थिक किंवा राजकीय-राष्ट्रीय संकटाच्या प्रत्येक टप्प्यात, इराणच्या अधिकाऱ्यांनी सातत्याने आणि सुनियोजितपणे खोटे आरोप, योजनाबद्ध दुष्प्रचार आणि द्वेष मोहिमाच्या माध्यमातून बहाना दोषारोपांचे मध्य बनविण्याची परंपरा चालू ठेवली आहे, जी आजही तशीच सुरु आहे. इराणचे अधिकारी गेल्या अनेक दशकापासून दवेषपूर्ण भाषणे आणि बहाईना दोषारोपांचे लक्ष्य बनविण्याच्या माध्यमातून बहाई समुदायावर चालू असलेल्या अत्याचारांना न्याय्य ठरविण्याचा प्रयत्न करत आले आहेत.
परंतु इराणी आणि आंतरराष्ट्रीय समुदाय हे बेबुनियादी आरोप पूर्वीपेक्षा अधिक स्पष्टपणे करू लागले आहेत, मात्र या अधिका-यांनी आपल्या दाव्याच्या समर्थनार्थ कधीही किंचित्ही पुरावा सादर केलेला नाही. १९७९ च्या इराणी क्रांतीपासून सुरू असलेला हा पद्धतशीर छळ, अधिकृत वृत्त माध्यमांमध्ये बहाईंविरुद्ध द्वेष निर्माण करण्याच्या मोहिमेमुळे आणखी भडकला आहे. जरी बहुतेक इराणी लोक या मोहिमेमुळे फसले नाहीत, तरी ते बहाई आणि त्यांच्या मालमत्तेवर झालेल्या हिंसक हल्ल्यांच्या मालिकेशी संबंधित आहे - ज्यामध्ये बहाई स्मशानभूमींची तोडफोड किंवा नाश करण्याची व्यापक मोहीम समाविष्ट आहे. इराणी बहाई आंतरराष्ट्रीय स्तरावर बोलू शकत नसल्यामुळे, आमचे कार्यालय इराणी बहाईंच्या परिस्थितीबद्दल माहितीसाठी अधिकृत आउटलेट म्हणून काम करते. आम्ही त्यांच्या दुर्दशेकडे लक्ष वेधण्यासाठी सर्व उपलब्ध आंतरराष्ट्रीय यंत्रणांचा वापर करण्याचा प्रयत्न करतो. अशा प्रयत्नांमध्ये संयुक्त राष्ट्र मानवाधिकार परिषदेत आणि महासभेत ठरावांचे समर्थन आणि इतर मानवाधिकार स्वयंसेवी संस्थांशी सहकार्य आणि आंतरराष्ट्रीय वृत्त माध्यमांपर्यंत पोहोचणे, तसेच इराणच्या शांतताप्रिय आणि अहिंसक बहाई समुदायाविरुद्ध सुरू असलेल्या मानवी हक्कांच्या उल्लंघनांबद्दल जागरूकता निर्माण करण्यासाठी विविध मोहिमांचे समन्वय यांचा समावेश असल्याची माहिती मुंबईच्या बहाई सेन्टरमधून देण्यात आली.

0 टिप्पण्या