Top Post Ad

लेडीज बारला टाळे ! पनवेल तालुक्यातील कोनगाव ते कळंबोली लेडीज कम ऑर्केष्ट्रा बार बंद !

आमदार भास्कर जाधव यांच्या अधिवेशनातील मुद्द्याने सेक्शन टाईट ! 

   नवी मुंबई पोलीस आयुक्तालय हद्दीतील तालुका पोलीस ठाणे हद्दीतील कोन गाव, खांदेश्वर, कळंबोली, तळोजे याठिकाणी रात्रीच्या झगमगाटात अनेक लेडीज कम ऑर्केष्ट्रा बार नियमांचे उल्लंघन करून सुरु असतात. याआधी अनेकदा या लेडीज कम ऑर्केष्ट्रा बारवर स्थानिक पोलिसांमार्फत दिखाव्यासाठी कारवाई करण्यात आलेली आहे. मात्र त्यामधून काहीही साध्य होत नसल्याचे दिसून येते. नुकतेच ठाकरे गटाचे आमदार भास्कर जाधव यांनी विधानसभेत पनवेलमधील ऑर्केस्ट्रा बारच्या नावाखाली चालणाऱ्या बेकायदेशीर डान्स बारचा मुद्दा उपस्थित केला. दिवसा आणि रात्रीच्या वेळी अशा बारमध्ये 'लेडीज बार' चालत असल्याचा आरोप त्यांनी केला, 

त्यानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नियमांचे उल्लंघन करणाऱ्या बारवर परवाना रद्द करण्याची कठोर कारवाई केली जाईल, असे स्पष्ट केले त्यानुसार याची दखल घेत पनवेल तालुक्यातील कोन गाव ते कळंबोली पर्यंत जोमाने सुरु असणाऱ्या लेडीज कम ऑर्केष्ट्रा बारला टाळे लागण्याचे दिसून आले मात्र भास्कर जाधव यांनी घेतलेला मुद्दा याआधी पोलीस आयुक्तांच्या का नाही लक्षात आला ? तसेच जर बार नियमात सुरु असतील तर मग अचानक लेडीज ऑर्केष्ट्रा बारला टाळे का लावावे लागले असा सवालही यानिमित्ताने उपस्थित होत आहे. सेक्शन टाईट  सेक्शन असेच टाईट राहणार कीं अधिवेशन संपल्यानंतर पुन्हा लेडीज कम ऑर्केष्ट्रा बारचा झगमगाट सुरु होणार असा प्रश्न निर्माण होत आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

 READ / SHARE  / FORWARD 
JANATA  NEWS  xPRESS

निरंतर सेवेच्या आर्थिक मदतीकरिता 
for Donation
G pay 8108658970 

संपादक: सुबोध शाक्यरत्न  
M : 8108658970

Email- pr.janata@gmail.com