भारतीय प्रशासकीय सेवेसाठी (IAS) अर्ज करणाऱ्या उमेदवारांकडे भारतातील मान्यताप्राप्त विद्यापीठातून कोणत्याही विषयात पदवी असणे आवश्यक आहे. भारतीय वन सेवा (IFS) उमेदवारांकडे पशुसंवर्धन, पशुवैद्यकीय विज्ञान, वनस्पतिशास्त्र, रसायनशास्त्र, भूगर्भशास्त्र, गणित, भौतिकशास्त्र, सांख्यिकी, प्राणीशास्त्र आणि कृषी यासारख्या विषयांमध्ये पदवी असणे आवश्यक आहे.संघ लोकसेवा आयोगाने (UPSC) नागरी सेवा परीक्षा २०२६ साठी अधिसूचना जारी केली आहे. त्यांनी आधीच सेवेत असलेल्या उमेदवारांसाठी नियमांमध्ये देखील महत्त्वपूर्ण बदल केले आहेत. ज्यांची आधीच कोणत्याही सेवेत निवड झाली आहे ते CSE पदांसाठी अर्ज करू शकत नाहीत. शिवाय, जर एखाद्या उमेदवाराची पूर्वपरीक्षा नंतर आणि मुख्य परीक्षेपूर्वी या सेवांसाठी निवड झाली तर त्यांना मुख्य परीक्षेला बसण्याची परवानगी दिली जाणार नाही. IPS साठी देखील एक नवीन नियम आहे. जर एखाद्या उमेदवाराची मागील परीक्षांच्या आधारे IPS साठी निवड झाली असेल, तर तो २०२६ च्या निकालांच्या आधारे IPS कॅडरसाठी पुन्हा निवड करू शकणार नाही, असेही आयोगाने म्हटले आहे.
निवड झाल्यानंतर २०२६ मध्ये ग्रुप अ सेवेसाठी पुन्हा उपस्थित राहू इच्छिणाऱ्या उमेदवारांसाठी यूपीएससीने नियम बदलले आहेत. अशा उमेदवारांना संबंधित विभागाकडून प्रशिक्षणातून सूट मिळाल्यासच ते परीक्षेला बसण्यास पात्र असतील. जर त्यांनी प्रशिक्षणाला उपस्थित राहून सूट मागितली नाही, तर त्यांचा २०२६ चा अर्ज रद्द केला जाईल. शिवाय, जर ते २०२७ मध्ये पुन्हा यशस्वी झाले तर त्यांना दोन्ही सेवांपैकी एकाची निवड करावी लागेल आणि दुसरी रद्द मानली जाणार आहे.
२०२५ किंवा त्यापूर्वी सीएसईमध्ये सेवेत रुजू झालेल्या उमेदवारांना २०२६ किंवा २०२७ मध्ये त्यांच्या उर्वरित प्रयत्नांचा वापर करण्यासाठी शेवटची संधी दिली जाते. जर उमेदवार २०२८ किंवा त्यानंतरच्या नागरी सेवा परीक्षेला बसू इच्छित असेल तर त्यांना त्यांच्या सध्याच्या पदावरून राजीनामा द्यावा लागेल
0 टिप्पण्या