Top Post Ad

ऑल इंडिया भिक्खू संघाचे 22, 23 मार्च रोजी चेंबूर मुंबई येथे ऐतिहासिक महाधम्म अधिवेशन

ऑल इंडिया भिक्खू संघाचे ऐतिहासिक महाधम्म अधिवेशन येत्या रविवारी 22 आणि 23 मार्च 2026 रोजी आयोजित करण्यात आले असून या भिक्खू संघाला जगभरातील बौद्ध धर्मगुरू उपासक, श्रामनेर मोठ्या संख्येने उपस्थित राहणार असल्याची माहिती भिक्खू संघाचे अध्यक्ष राहुलबोधी महाथेरो यांनी पत्रकारांशी बोलताना दिली आहे. हे अधिवेशन ग्रँड नालंदा बँक्वेट हॉल, पी एल लोखंडे मार्ग, चेंबूर मुंबई 89 येथे आयोजित करण्यात आले आहे. सकाळी सात ते रात्री साडेअकरा वाजेपर्यंत हे महाअधिवेशन सुरू राहणार आहे. मुंबई महाराष्ट्रासह देशभरातील भिक्खू या अधिवेशनास उपस्थित राहणार आहेत.  संघनायक भदंत करुणानिधी महाथेरो यांच्या हस्ते दोन दिवशीय कार्यक्रमाचे उद्घाटन आणि पंचशील ध्वज फडकविला जाणार आहे. भदंत राहुलबोधी महाथेरो यांच्यातर्फे  उपस्थित भिक्खूंचे स्वागत केले जाणार आहे.  बोधगया येथील महाबोधी महाविहार येथील बी टी ॲक्ट 1950 कायदा रद्द करण्यासंदर्भात चर्चा करण्यात येणार आहे. तसेच संघाच्या ओळखपत्राचे नुतनीकरण करण्याबाबत देखील चर्चा केली जाणार आहे, ऑल इंडिया भिक्खू संघामध्ये अनेक बदल करण्यात येणार आहेत, त्याचे अधिक सभासद वाढवले जाणार आहेत, याबाबत विचारविनिमय या अधिवेशनात होणार असल्याचे आयोजकांकडून सांगण्यात आले. 

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

 READ / SHARE  / FORWARD 
JANATA  NEWS  xPRESS

निरंतर सेवेच्या आर्थिक मदतीकरिता 
for Donation
G pay 8108658970 

संपादक: सुबोध शाक्यरत्न  
M : 8108658970

Email- pr.janata@gmail.com