Top Post Ad

23 मार्चला आरएसएस मुख्यालयावर मोर्चा काढण्याची बाळासाहेब आंबेडकरांची घोषणा!

देशाच्या सार्वभौमत्व, स्वायत्तता आणि स्वातंत्र्याशी तडजोड केल्याचा आरोप करत पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि आरएसएस यांच्या भूमिकेविरोधात मोठे आंदोलन उभारण्याची तयारी वंचित बहुजन आघाडीने सुरू केली आहे. या पार्श्वभूमीवर नागपूर येथील आरएसएस मुख्यालयासमोर निषेध आंदोलन आयोजित करण्याबाबत चर्चा करण्यासाठी वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष अॅड. प्रकाश आंबेडकर यांनी विरोधी पक्ष, संघटनांना बैठकीचे निमंत्रण दिले होते. आज 10 मार्च रोजी नियोजित बैठक वंचित बहुजन आघाडीच्या केंद्रीय कार्यालय मुंबई येथे सदरील महत्त्वपूर्ण बैठक पार पडली.

ॅड. प्रकाश आंबेडकर यांनी नमूद केले आहे की, अलीकडेच अमेरिकेच्या ऑफिस ऑफ फॉरेन ॲसेट्स कंट्रोल(OFAC) या संस्थेने सामान्य परवानगी क्रमांक १३३ जारी केली आहे. या परवानगीनुसार भारताला रशियाकडून कच्चे तेल आणि पेट्रोलियम उत्पादने खरेदी करण्याची मुभा देण्यात आली आहे. अमेरिकेच्या या निर्णयावरून भारताची आर्थिक आणि धोरणात्मक स्वायत्तता धोक्यात आली आहे.या परवानगीमुळे पंतप्रधान नरेंद्र मोदी अमेरिकेच्या इशाऱ्यावर काम करत असल्याचे स्पष्ट होते आणि त्यामुळे देशाच्या सार्वभौमत्वाशी तडजोड होत असल्याची भावना निर्माण झाली आहे.
बैठकीत 23 मार्च रोजी आरएसएसच्या नागपूर येथील मुख्यालयावर मोर्चा काढण्याचे वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष बाळासाहेब आंबेडकर यांनी जाहीर केले. यावेळी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ, वंचित बहुजन आघाडीचे रणनितिकार सुमित आनंद, राज्य प्रवक्ता उत्कर्षाताई रूपवते, सुदेश पटेल प्रवक्ता आम आदमी पार्टी, अमीर अब्दुल काझी भारतीय कम्युनिस्ट पार्टी हे बैठकीस उपस्थित होते.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

 READ / SHARE  / FORWARD 
JANATA  NEWS  xPRESS

निरंतर सेवेच्या आर्थिक मदतीकरिता 
for Donation
G pay 8108658970 

संपादक: सुबोध शाक्यरत्न  
M : 8108658970

Email- pr.janata@gmail.com