: गुढीपाडव्याच्या मुहूर्तावर निघणाऱ्या पारंपरिक स्वागत यात्रांना केवळ धार्मिक स्वरूप न राहता त्या 'भराठी नववर्ष' म्हणून सर्वसमावेशक पद्धतीने साजऱ्या व्हाव्यात, या उद्देशाने मराठी अभ्यास केंद्राने 'मराठी नववर्ष स्वागत यात्रा' आयोजित केली आहेत. गुरुवार दिनांक १९ मार्च रोजी निघणारी ही स्वागत यात्रा केवळ शोभायात्रा नसून मराठी माणसाच्या अस्मितेचे आणि ज्वलंत प्रश्नांचे प्रतिनिधित्व करणारी एक 'अभिव्यक्ती' असेल, अशी माहिती केंद्राचे अध्यक्ष डॉ. दीपक पवार यांनी दिली.
मराठी माणसाच्या ज्वलंत प्रश्नांना प्राधान्य....यंदाच्या स्वागत यात्रेमध्ये मराठी अभ्यास केंद्राने तीन महत्त्वाच्या विषयांवर विशेष भर दिला आहे. त्यामध्ये बंद पडत चाललेल्या मराठी शाळांचा प्रश्न, नोकरी-व्यवसायात मराठी माणसाला मिळणारे दुय्यम स्थान आणि रोजगाराच्या संधी, तसेच मुंबईसारख्या शहरात घरांच्या बाबतीत मराठी माणसाची होत असलेली कोंडी या मुद्यांचा समावेश आहे. या तीनही विषयांचे दर्शन घडवणारा एक विशेष 'चित्ररथ यात्रेचे प्रमुख आकर्षण असणार आहे.
स्वागत यात्रेचा मार्ग....ही स्वागत यात्रा दादर येथील संयुक्त महाराष्ट्र दालन (शिवाजी पार्क) येथून सुरू होणार आहे. त्यानंतर मीनाताई ठाकरे पुतळा, सेना भवन, प्लाझा, दादर टीटी, हिंदमाता आणि आर. एम. भट कॉलेजमार्गे ही यात्रा कामगार मैदानावर विसर्जित होईल. यात्रेच्या शेवटी कामगार मैदानावर ज्येष्ठ विचारवंत डॉ. दीपक पवार यांचे मार्गदर्शनपर भाषण होणार आहे.
नव्या वर्षासाठी 'दहा संकल्प'....मराठी नववर्षाच्या निमित्ताने केवळ पाडव्यापुरते मराठीप्रेम न दाखवता वर्षभर मराठीसाठी काय करता येईल, यासाठी केंद्राने 'दहा संकल्प' तयार केले आहेत. यामध्ये वर्षातून किमान एक मराठी चित्रपट चित्रपटगृहात जाऊन पाहणे, एक मराठी पुस्तक विकत घेणे आणि किमान एक मराठी नाटक पाहणे अशा कृतीशील संकल्पांचा समावेश आहे.
या उपक्रमाला अनेक नामांकित मराठी कलाकारांनी पाठिंबा दर्शवला आहे. चिन्मय सुमित, सुमित राघवन, प्राजक्ता हनमघर, विनायक कोळवणकर आणि वैभव मांगले यांनी व्हिडिओ संदेशाद्वारे या यात्रेला समर्थन दिले आहे, तसेच विविध शाळांमधील विद्यार्थी लेझीम पथक आणि बँड पथकासह यात्रेत सहभागी होणार आहेत.मराठी अभ्यास केंद्राचे कार्यवाह आनंद भंडारे यांनी सांगितले की, "ही यात्रा कोणत्याही एका धर्माची नसून 'मराठी नववर्ष यात्रा' आहे. सर्व जाती-धर्मातील मराठी भाषिकांनी आपापले बॅनर घेऊन यात सहभागी व्हावे आणि आपण मराठी आहोत हे अभिमानाने सांगावे, हेच आमचे आवाहन आहे."
मराठी नववर्ष स्वागतयात्रा पाठिंबा देऊन उपस्थित राहणाऱ्या संस्था व संघटना यादी
महेंद्र गणपुले, अध्यक्ष, महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक मुख्याध्यापक महामंडळ
श्री. रवींद्र फडणवीस, अध्यक्ष, महाराष्ट्र राज्य शिक्षण संस्था महामंडळ
विनय राऊत, महामुबई शिक्षणसंस्था संघटना, मुंबई
जालिंदर सरोदे, कार्यवाह, महाराष्ट्र राज्य शिक्षक सेना.
शिवनाथ दराडे,महाराष्ट्र राज्य शिक्षक परिषद
अनिल बोरनारे, मुंबई मराठी अध्यापक संघ
तानाजी कांबळे, महाराष्ट्र पुरोगामी शिक्षक संघटना
दिगंबर बेंडाळे, महाराष्ट्र राज्य कलाध्यापक संघ महामंडळ
संजय डावरे, महाराष्ट्र राज्य विनाअनुदानित व अनुदानित शाळा कृती समिती मुंबई
संदीप कांबळे, अध्यक्ष, युवा शैक्षणिक व सामाजिक न्याय संघटना महाराष्ट्र
धर्मेंद्र घाग, महाराष्ट्र सरंक्षण संघटना, महाराष्ट्र राज्य
प्रसाद गोखले, मराठी शाळा आपण टिकवल्या पाहिजे फेसबूक समूह
बाळासाहेब माने, मराठी विषय शिक्षक महासंघ, महाराष्ट्र राज्य
संतोष मगर, डी टी एड बी एड स्टुडंट असोसिएशन
भाऊसाहेब घाडगे, छत्र प्रतिष्ठान आणि मराठी गौरव प्रतिष्ठान सांगोला
डॉ. माधव सूर्यवंशी, मुख्य समन्वयक, शिक्षण विकास मंच, यशवंतराव चव्हाण सेंटर
मेधा कुळकर्णी, संपर्क
सिरत सातपुते, महाराष्ट्र समन्वयक, जन आंदोलनांचा राष्ट्रीय समन्वय
राजकुमार तांगडे, नाट्य दिग्दर्शक
हेमंत ढोमे, कलाकार, चित्रपट दिग्दर्शक
विनायक कोळवणकर, नाट्य दिग्दर्शक
शाहीर संभाजी भगत
डॉ. अनघा मांडवकर, अक्षरधर्मी गोधडी
प्राची हातिवलेकर, अखिल भारतीय जनवादी महिला संघटना
गोवर्धन देशमुख, मराठी एकीकरण समिती

0 टिप्पण्या