Top Post Ad

भारतीय रिझर्व्ह बँकेची स्थापना... डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या अर्थशास्त्रीय विचारांची आणि दूरदृष्टीची फलश्रुती

 १ एप्रिल हा दिवस भारतासाठी अतिशय महत्त्वाचा मानला जातो, कारण याच दिवशी भारतीय रिझर्व्ह बँक (RBI) ची स्थापना झाली. त्यामुळे १ एप्रिल हा दिवस “आरबीआय दिवस” म्हणूनही ओळखला जातो.  १ एप्रिल 1935 हा दिवस भारतीय अर्थव्यवस्थेच्या इतिहासातील एक ऐतिहासिक टप्पा मानला जातो. भारतीय रिझर्व्ह बँक ही भारत सरकारने स्थापन केलेली आणि चालवली जाणारी देशाची मध्यवर्ती बँक आहे. चलनविषयक धोरण, बँकांचे नियमन, आर्थिक स्थैर्य राखणे आणि महागाई नियंत्रण ही या बँकेची मुख्य कार्ये आहेत.

 रिझर्व बँकेची स्थापना कशी झाली?...      भारतासाठी मध्यवर्ती बँकेची कल्पना सर्वप्रथम १७७१ मध्ये वॉरेन हेस्टिंग्ज यांनी मांडली होती. त्यानंतर १९२६ मध्ये हिल्टन यंग आयोगाने भारतासाठी स्वतंत्र मध्यवर्ती बँक स्थापन करण्याची शिफारस केली. या शिफारशीच्या आधारे 6 मार्च 1934 रोजी आरबीआय कायदा संसदेत मंजूर करण्यात आला आणि 1 एप्रिल 1935 रोजी भारतीय रिझर्व्ह बँकेची अधिकृत स्थापना झाली. सुरुवातीला या बँकेचे मुख्यालय कोलकाता येथे होते. नंतर १९३७ मध्ये ते कायमस्वरूपी मुंबई येथे हलविण्यात आले.     पहिले गव्हर्नर सर ओसबोर्न स्मिथ हे होते. त्यांचा कार्यकाळ 1 एप्रिल 1935 पासून ते 1 जून 1937 पर्यंत होता. पहिले भारतीय गव्हर्नर म्हणून सी.डी. देशमुख यांनी कार्यभार सांभाळला. भारताच्या स्वातंत्र्यानंतर रिझर्व बँक ऑफ इंडिया ने जून 1948  पर्यंत पाकिस्तानची मध्यवर्ती बँक म्हणून काम केले. रिझर्व बँकेचे 1949 मध्ये भारत सरकार द्वारे राष्ट्रीयीकरण केले गेले.

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे अर्थशास्त्रातील योगदान- डॉ. बाबासाहेब आंबेडकर हे केवळ भारताचे संविधान निर्माते नव्हते, तर ते एक महान अर्थशास्त्रज्ञही होते. त्यांनी भारतातील अर्थव्यवस्था, शेती, चलनप्रणाली आणि कामगार धोरण यांचा सखोल अभ्यास केला होता.     या ग्रंथात त्यांनी भारतीय चलनप्रणालीतील त्रुटी, रुपयाचे अवमूल्यन आणि त्यावर उपाय यांचे सखोल विश्लेषण केले.हिल्टन यंग आयोगाने भारतीय रिझर्व्ह बँकेची रचना करताना या पुस्तकातील विचारांचा आधार घेतला होता. आर्थिक विकासासंदर्भात डॉ.आंबेडकर यांच्या मते, अल्पभूधारक घटकांवर आधारित भारतीय शेतीची उत्पादकता व उत्पन्न कमी असण्याचे मूळ कारण म्हणजे  शेती मधील अल्प भांडवली  गुंतवणूक आहे. फक्त शेतीच नव्हे, तर कामगारांचे आर्थिक धोरण यावर सुद्धा त्यांनी विस्तुत विचार व मांडणी केली आहे.   

     डॉ.आंबेडकरांनी भारतातील संपूर्ण घटकांचा विशलेषणात्मक अभ्यास केला होता. त्यात भारतीय अर्थव्यवस्था व त्यावरील समस्यांचे उपाय यावर त्यांनी जागतिक दर्जाच्या तीन पदव्या संपादन केली होत्या. अर्थशास्रावर 3 प्रबंध कोलंबिया(अमेरिका ) व लंडन विद्यापीठात सादर केले. विशेष म्हणजे तीनही प्रबंध पुस्तक रूपाने प्रकाशित करण्यात आले. ते 3 प्रबंध म्हणजे  ईस्ट इंडिया कंपनी प्रशासन आणि वित्तप्रणाली, ब्रिटिश भारतातील प्रांतिक वित्ताची उत्क्रांती, भारतीय रुपयाचा प्रश्न(दि प्रॉब्लम ऑफ रूपी)  हे होत. त्यापैकी सर्वात महत्त्वाचा प्रबंध होता.

“The Problem of the Rupee: Its Origin and Its Solution” (1923).     डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या ‘दि प्रॉब्लम ऑफ रूपी’ ह्या प्रबंधाचे  पुस्तकात रूपांतर होऊन 1923 साली लंडन मध्ये प्रकाशित झाले. भारतीय रिझर्व बँकेची  रचना आणि दृष्टीकोन डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या ‘दि प्रॉब्लम ऑफ रूपी: इट्स ओरीजीन अँड इट्स सोल्युशन’ या पुस्तकातून घेतले आणि हिल्टन यंग आयोगाकडे सादर केले. या बँकेची स्थापना 1926 च्या रॉयल संस्थेच्या शिफारसीच्या आधारे झाली. या बँकेचा मूळ शिक्का म्हणून ईस्ट इंडिया कंपनीचे चिन्ह - म्हणजेच नारळाचे झाड आणि सिंह असे होत. पण त्या चिन्हात बदल करण्यात आला आणि सिंहाऐवजी भारताचा राष्ट्रीय प्राणी वाघ याचा चिन्हात समावेश करण्यात आला.  सुरुवातीला मुख्य कार्यालय  कोलकाता येथे होते, जे १९३७ मध्ये कायमस्वरूपी मुंबईत हलविण्यात आले. भारतीय रिझर्व बँक ही देशपातळीवर आर्थिक संस्थांना शिस्त आणण्याचे काम करते. रिझर्व बँक वार्षिक ,सहामाही तसेच तिमाही आर्थिक धोरण व पतधोरण (मौद्रिक धोरण व पतधोरण) जाहीर करते. रिझर्व्ह बँकेचे कामकाज पाहण्यासाठी एक पूर्ण वेळ गव्हर्नर, चार डेप्युटी गव्हर्नर, १६ सदस्यांचे संचालक मंडळ यांची नेमणूक १९३४ च्या आरबीआय च्या कायद्यानुसार भारत सरकारकडून चार वर्षांकरिता केली जाते.

     रिझर्व बँकेच्या स्थापनेत आंबेडकरांचे योगदान..     डॉ.आंबेडकरांनी भारतीय अर्थव्यवस्थेचा सखोल अभ्यास करून भारतासाठी स्वतंत्र मध्यवर्ती बँक असणे किती आवश्यक आहे हे स्पष्ट केले. त्यांच्या “The Problem of the Rupee” या पुस्तकातील विचारांवर आधारितच भारतातील चलन आणि बँकिंग व्यवस्था सुधारण्याचा निर्णय घेण्यात आला.भारतीय रिझर्व्ह बँकेच्या स्थापनेच्या मुळाशी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे अर्थशास्त्रीय ज्ञान आणि दूरदृष्टी होती, याचा समस्त भारतीयांना अभिमान आहे.

  रिझर्व बँकेची प्रमुख कार्ये..
भारतीय रिझर्व्ह बँकेची मुख्य कार्ये खालीलप्रमाणे आहेत :
• चलनी नोटा जारी करणे
• केंद्र व राज्य सरकारची बँक म्हणून काम करणे
• व्यावसायिक बँकांचे नियमन व नियंत्रण करणे
• महागाई नियंत्रणासाठी मौद्रिक धोरण जाहीर करणे
• देशातील आर्थिक स्थैर्य राखणे
डॉ. आंबेडकरांनी सुचवलेली मार्गदर्शक तत्वे आणि कार्यप्रणाली यावर आजही ही बँक खंबीरपणे उभी आहे. भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 8 नोव्हेंबर 2016 साली 500 आणि 1000 रुपयांच्या नोटांचे विमुद्रिकरण (नोटा बंदी) केले. ही मूळ संकल्पना डॉ. आंबेडकरांनी लिहिलेल्या "द प्रॉब्लेम ऑफ रुपी" या पुस्तकातून घेण्यात आली होती. 

     रिझर्व बँकेचे पहिले गव्हर्नर..     भारतीय रिझर्व्ह बँकेचे पहिले गव्हर्नर सर ऑसबोर्न स्मिथ होते. त्यानंतर पहिले भारतीय गव्हर्नर म्हणून सी. डी. देशमुख यांनी कार्यभार सांभाळला. 

    डॉ.बाबासाहेब आंबेडकरांबद्दल इतर अर्थशास्त्रज्ञांचे मत...     भारताचे नोबेल पारितोषिक विजेते अर्थशास्त्रज्ञ अमर्त्य सेन हे डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या अर्थशास्त्रीय विचारांचा आदर करतात. ते असे म्हणतात की,"डॉ. आंबेडकर हे माझ्या वडिलांसमान आहेत, त्यांच्या एवढ्या जागतिक कीर्तीचा महान अर्थशास्त्रज्ञ होणे नाही."  लंडनमधील लंडन स्कूल ऑफ इकॉनॉमिक्स येथे डॉ. आंबेडकरांचा पुतळा बसविण्यात आला आहे. त्याचबरोबर डॉ. बाबासाहेब आंबेडकर अध्यासन सुद्धा सुरु करण्यात आले आहे.     थोडक्यात सांगायचे तर, भारतीय रिझर्व्ह बँकेची स्थापना ही केवळ एक प्रशासकीय निर्णय नव्हती, तर ती डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या अर्थशास्त्रीय विचारांची आणि दूरदृष्टीची फलश्रुती होती. म्हणूनच १ एप्रिल हा दिवस केवळ “आरबीआय दिवस” नसून भारताच्या आर्थिक इतिहासातील एक महत्त्वाचा टप्पा आहे.

  • जयश्री कल्पना अशोक साळुंखे 
  • अधिव्याख्याता संगणक अभियांत्रिकी, शासकीय तंत्रनिकेतन, ठाणे
  •  संपर्क:- 8551066975 

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

 READ / SHARE  / FORWARD 
JANATA  NEWS  xPRESS

निरंतर सेवेच्या आर्थिक मदतीकरिता 
for Donation
G pay 8108658970 

संपादक: सुबोध शाक्यरत्न  
M : 8108658970

Email- pr.janata@gmail.com