Top Post Ad

नेर येथे दुसरे वैदर्भीय आंबेडकरी महिला संमेलन

 यवतमाळ : सावित्रीबाई फुले स्मृतिदिन (१० मार्च), जागतिक महिला दिन (८ मार्च) आणि प्रा. सतेश्वर मोरे स्मृतिदिन (२ मार्च) यानिमित्ताने दुसरे वैदर्भीय आंबेडकरी महिला संमेलनाचे आयोजन नेर येथे रविवार, ८ मार्च २०२६ रोजी सकाळी १०.३० वाजता निर्मल बन्सी लॉनमध्ये केले आहे. 


या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी मासिक रमाई च्या संपादिका आंबेडकरी विचारवंत प्रा. डॉ. रेखा मेश्रामऔरंगाबाद तर उद्घाटक म्हणून ज. वि. पवार (संस्थापक सदस्य, दलित पँथर मुबंई ) उपस्थित राहणार आहे. प्रमुख वक्ते वर्धा येथील प्रा. डॉ सुषमा पाखरे, डॉ. कीर्तिराज लोणारेअंबेजोगाई ,अमेरिकेचा डॉ बाबासाहेब आंबेडकर ब्रेव्हारी अवार्ड प्राप्त कांता अहिरेऔरंगाबाद यांचा सत्कार होणारा आहे या कार्यक्रमाच्या स्वागतध्यक्ष इंदिरा पुरुषोत्तम तलवारे,प्रमुखनिमंत्रक वनिता शरद मोरेअतिथी पपिता पाटील, रामदास वीर, प्रा. डॉ. राजू इंगोले वंदना किटके आदि मान्यवर उपस्थित राहणार आहे. संमेलनात विविध क्षेत्रांत उत्कृष्ट कार्य करणाऱ्या महिलांचा सन्मान समारंभ होणार आहे. चित्रकलेतील राष्ट्रीय पुरस्कारप्राप्त प्राचार्य योगिता चिंचोळे, प्रा. डॉ. विक्रींत मेश्राम, डॉ. प्रा. सुजाता वानखडे, डॉ. पूजा गायकवाड, डॉ. किरण गायकवाड, डॉ. स्मिता चौधरी, पल्लवी मेश्राम, दिशा घरडे, चारु नन्नावरे यांचा समावेश आहे. 

परिसंवाद सत्र 'भारतीय स्त्री आणि आजचे वास्तव व उपाय' या विषयावर होईल. अध्यक्षस्थानी संपादक त्रैमासिक सुनंदा बोदिले राहणार आहे. तर अनंत भवरे (छ. संभाजीनगर), प्रा. डॉ. चित्रा म्हात्रे (मुंबई), रमा घरडे (अमरावती), धम्मा कांबळे (यवतमाळ), प्रा. डॉ. सुनंदा वालदे (यवतमाळ) आदि वक्ते सहभागी होतील. त्यानंतर कविसंमेलन होणार असून,संपादक साप्ताहिक वज्जीसंदेश माया वासनिकअध्यक्षा असून प्रा. संजय घरडे, दिगंबर झाडे, पुष्पा बोरकर, विलास थोरात, गिरीष खोब्रागडे यांसह इतर कवी आपल्या कविता सादर करतील.

कार्यक्रमाचे संचालन संजय मोकळे, प्रा. दीपाली गवई करतील. समारोप प्रा. डॉ. रेखा मेश्राम यांच्या अध्यक्षतेखाली होईल, तर ठराव वाचन राजेश पाटील करतील. या ऐतिहासिक संमेलनात मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन मुख्य संयोजक डॉ. शरद मोरे, महादेवराव घरडे आणि आयोजन समितीने केले आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

 READ / SHARE  / FORWARD 
JANATA  NEWS  xPRESS

निरंतर सेवेच्या आर्थिक मदतीकरिता 
for Donation
G pay 8108658970 

संपादक: सुबोध शाक्यरत्न  
M : 8108658970

Email- pr.janata@gmail.com