Top Post Ad

महानगरपालिकेच्या प्रभाग समितीच्या अध्यक्षपदाच्या निवडणुका संपन्न

मुंबई महानगरपालिकेच्या सन २०२६ - २०२७ या वर्षासाठी  प्रभाग  समित्यांच्या अध्यक्षपदांची निवडणूका नुकत्याच संपन्न झाल्या.  ‘सी’ आणि ‘डी’ प्रभाग समिती अध्यक्षपदासाठी झालेल्या निवडणुकीत भारतीय जनता पक्षाचे उमेदवार  आकाश राज पुरोहित यांचा एकमेव अर्ज आल्याने त्यांची बिनविरोध निवड झाली. ‘आर मध्य’ आणि ‘आर उत्तर’ प्रभाग समिती अध्यक्षपदाच्या निवडणुकीसठी भारतीय जनता पक्षाचे  प्रकाश यशवंत दरेकर यांचा एकमेव अर्ज आल्याने त्यांची बिनविरोध निवड झाली. तसेच ‘आर दक्षिण’ प्रभाग समिती अध्यक्षपदासाठी झालेल्या निवडणुकीत भारतीय जनता पक्षाच्या  लीना पटेल - देहेरकर यांची बिनविरोध निवड झाली.

‘ए’, ‘बी’ आणि ‘ई’ प्रभाग समितीच्या अध्यक्षपदासाठी झालेल्या निवडणुकीत भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्षाचे उमेदवार  ज्ञानराज निकम विजयी झाले. निकम यांना ७ तर प्रतिस्पर्धी उमेदवार भारतीय जनता पक्षाचे  रोहिदास लोखंडे यांना ५ मते मिळाली. ‘एफ दक्षिण' व ‘एफ उत्तर’ प्रभाग समिती अध्यक्षपदासाठी झालेल्या निवडणुकीत शिवसेना पक्षाच्या उमेदवार मानसी मंगेश सातमकर या ८ मते मिळवून विजयी झाल्या. त्यांच्या प्रतिस्पर्धी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या उमेदवार श्रद्धा श्रीधर जाधव यांना ७ मते मिळाली. ‘पी पूर्व’ आणि ‘पी पश्चिम’ प्रभाग समिती अध्यक्षपदासाठी झालेल्या निवडणुकीत भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्षाचे उमेदवार  हैदरअली अस्लम शेख हे १० मते मिळवून निवडून आले. तर त्यांचे प्रतिस्पर्धी राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाचे उमेदवार  अजित बाळकृष्ण  रावराणे यांना ८ मते मिळाली. 

पी दक्षिण’ प्रभाग समिती अध्यक्षपदासाठी झालेल्या निवडणुकीत भारतीय जनता पक्षाच्या श्रीकला रामचंद्रन पिल्ले यांचा एकमेव अर्ज प्राप्त झाल्याने त्यांची बिनविरोध निवड झाली. ‘के पश्चिम’ प्रभाग समिती अध्यक्षपदासाठी झालेल्या निवडणुकीत भारतीय जनता पक्षाचे रोहन शशिन्द्र राठोड यांचा एकमेव अर्ज प्राप्त झाल्याने त्यांची बिनविरोध निवड झाली. तसेच ‘के उत्तर आणि के दक्षिण’ प्रभाग समिती अध्यक्षपदासाठी झालेल्या निवडणुकीत भारतीय जनता पक्षाचे  प्रकाश दौलत मुसळे यांचा एकमेव उमेदवारी अर्ज प्राप्त झाल्याने त्यांची बिनविरोध निवड झाली. 

‘एच पूर्व व एच पश्चिम’ प्रभाग समिती अध्यक्षपदासाठी झालेल्या निवडणुकीत शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या  रोहिणी कांबळे यांचा एकमेव अर्ज आल्याने त्यांची बिनविरोध निवड झाली. जी उत्तर प्रभाग समिती अध्यक्षपदासाठी झालेल्या निवडणुकीत महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे यशवंत किल्लेदार यांची बिनविरोध निवड झाली. या प्रभाग समिती अध्यक्षपदासाठी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे . जोसेफ कोळी आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे  यशवंत किल्लेदार या दोन उमेदवारांनी अर्ज दाखल केले होते. अध्यक्ष पद निवडणूक प्रसंगी, अर्ज मागे घेण्याच्या विहित वेळेत  जोसेफ कोळी यांनी अर्ज मागे घेतला. त्यामुळे  यशवंत किल्लेदार यांची प्रभाग समिती अध्यक्षपदी बिनविरोध निवड झाली.

: ‘एस आणि ‘टी' प्रभाग समितीच्या अध्यक्षपदासाठी भारतीय जनता पक्षाच्या उमेदवार  साक्षी दळवी या १० मते मिळवून विजयी झाल्या. त्यांचे प्रतिस्पर्धी उमेदवार शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे  सुरेश शिंदे यांना ८ मते मिळाली. दोन मते अवैध ठरली.  एम पूर्व प्रभाग समिती अध्‍यक्षपदासाठी  एआयएमआयएमच्या  खैरनुसा अकबर हुसेन या ८ मते मिळवून निवडून आल्या. तर त्यांच्या प्रतिस्पर्धी शिवसेनेच्या उमेदवार  प्रज्ञा सदाफुले यांना ५ मते मिळाली. अध्यक्ष पद निवडणूक प्रसंगी, अर्ज मागे घेण्याच्या विहित वेळेत कोणीही अर्ज मागे घेतला नाही. त्यामुळे प्रभाग समिती अध्यक्षपदासाठी निवडणूक घेण्यात आली.

तसेच ‘जी दक्षिण’ प्रभाग समिती अध्यक्षपदासाठी  शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या पद्मजा चेंबूरकर यांचा एकमेव अर्ज आल्याने त्यांची बिनविरोध निवड झाली.  ‘एल’ प्रभाग समिती अध्यक्षपदासाठी  शिवसेनेचे विजयेंद्र शिंदे यांचा एकमेव उमेदवारी अर्ज प्राप्त झाल्याने त्यांची बिनविरोध निवड झाली. एम पश्चिम प्रभाग समिती अध्‍यक्षपदासाठी भारतीय जनता पक्षाच्या आशा मराठे यांचा एकमेव अर्ज आल्याने त्यांची बिनविरोध निवड झाली. एन’ प्रभाग समिती अध्यक्षपदासाठी भारतीय जनता पक्षाच्या  अश्विनी मते यांचा एकमेव उमेदवारी अर्ज प्राप्त झाल्याने त्यांची बिनविरोध निवड झाली.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

 READ / SHARE  / FORWARD 
JANATA  NEWS  xPRESS

निरंतर सेवेच्या आर्थिक मदतीकरिता 
for Donation
G pay 8108658970 

संपादक: सुबोध शाक्यरत्न  
M : 8108658970

Email- pr.janata@gmail.com