Top Post Ad

बुद्धविहारांमध्ये घुसण्याचं मनुवादी षडयंत्र

या देशाची रसातळाला गेलेली लोकशाही आणि भारताची राज्यघटना वाचवण्याची एकमेव आशा आता तुमच्याकडून आहे. कारण तेवढी संवैधानिक प्रगल्भता, जाण, जाणिव, गांभीर्य, विवेक तुमच्यात आहे असे मला वाटते. संपुर्ण ब्राह्मणेतर बहूजन समाज फसव्या संघी हिंदूत्वाच्या नशेत फशी पडलेला असताना या लढ्याला खऱ्या अर्थाने वैचारिक दिशा तुम्हीच देऊ शकता हे लक्षात आल्याने, संघोट्यांनी आता पुराणकथेतील रामाच्या शेजारी छत्रपती शिवाजी महाराजांना उभे करुन बुद्धविहारांमध्येच घुसण्याचं मनुवादी षडयंत्र रचले आहे. जे पोस्टर बनवले गेले आहे त्यात छत्रपती शिवाजी महाराज यांची प्रतिमा जाणूनबुजून रामाच्या प्रतिमेपेक्षा कमी उंचीची दाखवून महाराजांबद्दलची असूया, द्वेष, तिरस्कार व्यक्त केलेला आहे. हे भटकावा करणारं कटकारस्थान वेळीच ओळखून एकजूटीने हाणून पाडणे गरजेचे आहे.

मनुवादी वर्णव्यवस्थेचा पुरस्कर्ता असलेला राम आमच्या स्वराज्यनिर्माते छत्रपती शिवाजी महाराजांच्या जोडीने उभा करण्याचा डाव म्हणजे प्रचंड मोठा विरोधाभास आहे. छत्रपती शिवाजी महाराजांना अभिप्रेत असलेले 'रयतेचे राज्य' म्हणजे भारतीय राज्यघटनेला अभिप्रेत असलेले 'लोकांनी, लोकांच्या हितासाठी चालवलेले लोकांचे राज्य.'
हे लोकांचे राज्य प्रस्थापित करणाऱ्या भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार असलेल्या बाबासाहेबांनी समता, बंधुता, स्वातंत्र्य, न्याय, करुणा, प्रज्ञा, शील, ज्ञान, शांती, अहिंसा, मानवतेचा पुरस्कार केलेल्या तथागत गोतम बुद्धाचा स्विकार केला.

या तथागत बुद्धाची 'बुद्धवंदना' गाईला आई मानणाऱ्या व आईचे मुंडके उडवणाऱ्या अमानवी विचारसरणीबरोबर गोमातापूजन करुन घेणे तसेच भारतमाता म्हणजे खऱ्या अर्थाने भारतातील संपूर्ण जन, जल, जंगल, जमिन असे असताना या सगळ्या गोष्टींचा र्हास करुन देशाला गुलामीच्या गर्तेत ढकलून बेगडी भारतमाता पूजन करणाऱ्या विषमतावादी, वर्णवर्चस्ववादी धर्मांध संघोट्यांबरोबर घेणे म्हणजे त्यांच्या पापात वाटेकरी होण्यासारखे आहे.
वर्णश्रेष्ठत्ववादी ब्राह्मण्यवादाचा पुरस्कार करणाऱ्या रामाबरोबर अठरापगड जातींचे राज्य निर्माण करणाऱ्या स्वराज्यनिर्माते छत्रपती शिवाजी महाराज यांना उभे करण्याचा तसेच ब्राह्मणांच्या तालावर नाचणाऱ्या व हिंसेचा पुरस्कार करणाऱ्या रामाबरोबर जगाला अहिंसा, त्याग, प्रेम, शांती, करुणेचे तत्वज्ञान सांगून आर्यसत्य, पंचशील, अष्टांगिक मार्ग देऊन मानवतेचा पुरस्कार करणाऱ्या बोधिसत्व, तथागत गोतम बुद्धाला बसवण्याचा हा बामनी कावा उधळून लावला पाहिजे.

ज्या बुद्धाने पुजा अर्चना, यज्ञयाग, अभिषेक, आदी कर्मकांडांचा त्याग करुन मानवाला विज्ञानवादी बनण्याचा संदेश दिला त्याच तथागत बुद्धाला पुन्हा अनिष्ट प्रथापरंपरा, जाचक रुढीपरंपरा, भोंदू कर्मकांड आणि भटपुरोहितांच्या जाळ्यात अडकवण्याचे ब्रह्मजाल झिडकारून टाकले पाहिजे. ही सांस्कृतिक घुसखोरी रोखली तरच राजकीय घुसखोरी रोखली जावू शकते, कारण या संघी मनुवादी ब्रह्मसत्तेने सांस्कृतिक घुसखोरीच्या मार्गानेच बहुजनांचे मेंदू नासवून इथपर्यंत आघाडी घेतलेली आहे.सर्व भारतीयांना संविधानाने दिलेल्या समतेला संघोट्यांच्या समरसतेच्या पायदळी तुडवण्याच्या या पाताळयंत्री षडयंत्राला हाणून पाडूया. या सांस्कृतिक भेसळीच्या आणि घुसखोरीच्या विरोधात राष्ट्रहितासाठी शिव-फुले-शाहू-आंबेडकर विचारधारेच्या सर्व पाईकांनी एकजूटीने उभे राहूया. एकजुटीने लढूया. एकजुटीनेच जिंकुया...
- बाळासाहेब कदम

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

 READ / SHARE  / FORWARD 
JANATA  NEWS  xPRESS

निरंतर सेवेच्या आर्थिक मदतीकरिता 
for Donation
G pay 8108658970 

संपादक: सुबोध शाक्यरत्न  
M : 8108658970

Email- pr.janata@gmail.com