Top Post Ad

CDR हा अत्यंत संवेदनशील व गोपनीय डेटा नेमका कोणत्या स्रोतामधून बाहेर आला

1. अलीकडील काळात एका गुन्हेगारी प्रकरणाच्या संदर्भात संबंधित व्यक्तींचे Call Detail Records (CDR) समोर आल्याचा दावा करण्यात आलेला आहे. सदर CDR हा अत्यंत संवेदनशील व गोपनीय डेटा असून, तो केवळ कायदेशीर प्रक्रियेनुसार अधिकृत तपास यंत्रणांनाच उपलब्ध होऊ शकतो.
2. या प्रकरणात सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी संबंधित CDR त्यांच्या कडे अज्ञात (anonymous) स्रोतामार्फत प्राप्त झाल्याचा दावा केला असून, त्या डेटाचे विश्लेषण करून काही माहिती सार्वजनिकरीत्या मांडल्या,
3. या पार्श्वभूमीवर खालील गंभीर, प्रश्न निर्माण झाले आहेतः सदर CDR हा डेटा नेमका कोणत्या स्रोतामधून बाहेर आला?संवेदनशील माहितीचे सार्वजनिक प्रकटन करणे कायदेशीर आहे का? गोपनीयतेचा भंग झाला आहे का?
4. भारताच्या संविधानानुसार गोपनीयता हा मूलभूत अधिकार आहे, तसेच दूरसंचाराशी संबंधित माहितीचे संरक्षण करणे हे राज्याचे कर्तव्य आहे. अशा परिस्थितीत CDR सारखा संवेदनशील डेटा खाजगी व्यक्तीकडे उपलब्ध होणे व त्याचा सार्वजनिक वापर होणे ही अत्यंत गंभीर बाब आहे.

5. सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांच्या संदर्भात माझ्या वैयक्तिक अनुभवावर आधारित काही गंभीर बाबी समोर आणण्याची आवश्यकता निर्माण झाली आहे.
6. सन २०१८ मध्ये, अण्णा हजारे यांच्या आंदोलनाच्या संदर्भात माझ्यावर करण्यात आलेल्या कथित चुकीच्या आरोपांमुळे मी संबंधित व्यक्तीविरुद्ध प्रथम वर्ग न्यायदंडाधिकारी न्यायालय, बेलापूर येथे फौजदारी खटला तमेच मानहानीबाबत उच्च न्यायालयात दिवाणी दावा दाखल केलेला आहे.
7. त्या कालावधीनंतर, माझ्या वैयक्तिक दूरध्वनी माहितीशी संबंधित काही संशयास्पद हालचाली होत असल्याचे मला कळू लागले. विशेषतः, माझ्या ओळखीतील अनेक व्यक्तींना माझ्याबाबत चौकशीसाठी संपर्क करण्यात आल्याची माहिती मला मिळाली.
8. यामध्ये काही शासकीय पदावरील व्यक्तीचाही समावेश असून, माझ्या जवळच्या नात्यातील व्यक्तींनाही संपर्क करण्यात आल्याचे निदर्शनास आले. या पार्श्वभूमीवर, माझ्या वैयक्तिक Call Detail Records (CDR) संदर्भात  

9. अनधिकृत माहितीचा वापर किंवा माहिती संकलन झाले असण्याचा मला गंभीर संशय आहे. १. माझ्या संपर्कातील व्यक्तीची माहिती संबंधित व्यक्तीकडे कशा प्रकारे उपलब्ध झाली, तसेच ती कोणत्या स्रोतांद्वारे प्राप्त झाली, याबाबत आजपर्यंत कोणताही स्पष्ट खुलासा होत नव्हता.
10. अलीकडील काळात CDR प्रकरण सार्वजनिकरित्या चर्चेत आल्यानंतर, या सर्व बाबींकडे दुर्लक्ष करणे योग्य नसून, या संदर्भात सखोल चौकशी होणे अत्यावश्यक आहे, असे मला वाटले.
11. माझ्या मते, या प्रकरणात केवळ वैयक्तिक बाब नसून, व्यापक स्वरूपात नागरिकांच्या गोपनीयतेचा, डेटा सुरक्षेचा व कायदेशीर प्रक्रियेचा प्रश्न उपस्थित होतो.
12. त्या दिवसापासून अंजली दमानिया या महिलेने माझे Call Detail Records (CDR) काढत आहे असा मला संशय होता. तो संशय आता माझा स्पष्ट झाला की अंजली दमानिया या CDR काढतात आणि माझी इन्फॉर्मेशन माझ्या ओळखीच्या अनेक लोकांना फोन करून घेत आहे.
13. ती अशा लोकांना फोन करत आहे की ते शासकीय पदावरती आहेत. त्या पैकी माझ्या मामाचा मुलगा क्लास वन अधिकारी आहे. तो माझा भाऊ आहे हे तिला माहित नव्हते, अशा माझ्या अनेक ओळखीच्या लोकांना तिने फोन केला श्रोता

1.4. त्यांच्याकडे माझ्या ओळखीच्या लोकांचे फोन कसे आले, कुठून आले, या बाबत आजपर्यंत खुलासा होत नव्हता, 15. आता जसे की अंजली दमानिया यांनी CDR प्रकरण बाहेर काढले, तेव्हा मी विचार केला की शांत बसणे योग्य नाही, अंजली दमानिया यांच्या वरती कारवाई झालीच पाहिजे.
16. त्या खोटे बोलतात की कोणी तरी डिटेक्टिवने त्यांना CDR दिला. परंतु अश्याप्रकारे CDR काढणे हे बेकायदेशीर आहे. तरीही खरी परिस्थिती अशी आहे की ती CDR नेहमी काढतात. ज्या व्यक्तींबरोबर आपण बोलतो, त्यांच्या बरोबर आपले व्यवहारिक संबंध आहेत की नाही, प्रॉपर्टी कुठे आहेत, या बाबत माहिती गोळा करण्याचा प्रयत्न करतात जे कि The Digital Personal Data Protection (DPDP) Act. 2023 अंतर्गत गुन्हा आहे.
17. भारतात कॉल डेटा रेकॉर्ड (सीडीआर) मिळवणे ही एक कायदेशीर प्रक्रिया आहे, जी सामान्यतः भारतीय तार कायदा, १८८५ अंतर्गत, न्यायालयाच्या आदेशाद्वारे केवळ कायद्याची अंमलबजावणी करणाऱ्या संस्था किंवा अधिकृत व्यक्तीपुरतीच मर्यादित आहे. कायदेशीर परवानगीशिवाय, व्यक्ती कायदेशीररित्या दुसन्या व्यक्तीच्या सीडीआरमध्ये प्रवेश करू शकत नाही, यासाठी अनेकदा वैवाहिक किंवा फौजदारी प्रकरणांमध्ये एफआयआर किंवा न्यायालयातील अर्जाची आवश्यकता असते.

भारतात सीडीआर मिळवण्यासाठीच्या प्रमुख प्रक्रिया आणि आवश्यकताः.    कायदेशीर परवानगी आवश्यकः केवळ कायद्याची अंमलबजावणी करणाऱ्या संस्था (सामान्यतः पोलीस अधीक्षक किंवा त्यावरील दर्जाचे अधिकारी) तपासादरम्यान सेवा पुरवठादारांकडून सीडीआरची विनंती करू शकतात.न्यायालयाचे आदेशः कायदेशीर कार्यवाजीसाठी आवश्यक असल्यास (उदा, छज किंवा फसवणुकीच्या प्रकरणांमध्ये), एखादा खाजगी नागरिक दूरसंचार ऑपरेटरला नोंदी सादर करण्याचे निर्देश देणारा न्यायालयाचा आदेश मिळवू शकतो सेवा प्रदात्यांकडे अर्ज:स्वतःचे कॉल रेकॉर्ड मिळवण्यासाठी एखादी व्यक्ती स्थानिक आउटलेट, ग्राहक सेवा केंद्र किया ईमेलद्वारे थेट त्यांच्या दुरसंचार सेवा प्रदात्याकडे अर्ज करू शकते, ज्यासोबत अनेकदा फोटो ओळखपत्र आणि लेखी विनंती जोडलेली असते.  माझा आरोप खोटा नाही. माझा पण तिने CDR काढला होता आणि वारंवार ती CDR काढते. हे मी ठामपणे सागते,  अंजली दमानिया यांना पहिले आरोपी बनवले पाहिजे आणि त्याच्यावरती गुन्हा दाखल केला पाहिजे, ही मागणी केवळ कायद्याचे पालन, नागरिकांच्या गोपनीयतेचे संरक्षण आणि पारदर्शक चौकशी करावी यासाठी मी हुतात्मा चौका समोर उपोषणाला बसेल.

  • मागण्या (Demands)
  • 19. या संपूर्ण प्रकरणाची स्वतंत्र व निष्पक्ष चौकशी करण्यात आली पाहिजे,
  • 20. CDR लीक कसा झाला याचा तपास करण्यात आला पाहिजे. 
  • २१ जर कोणत्याही व्यक्तीकडून कायद्याचे उल्लंघन झाले असेल, तर त्यांच्यावर कायद्यानुसार योग्य ती फौजदारी कारवाई (गुन्हा नोंद करणे सहित) करण्यात आली पाहिजे.
  • 22. भविष्यात अशा प्रकारच्या घटनांना प्रतिबंध करण्यासाठी कडक उपाययोजना करण्यात आल्या पाहिजेत.
  • 23. अंजली दमानिया या महिलेला पहिले आरोपी बनवले पाहिजे आणि त्यांच्यावरती गुन्हा दाखल केला पाहिजे.
  • २४. माझी मागणी पूर्ण झाली नाही तर मी हुतात्मा चौका समोर उपोषणाला बसेल,
  • "कायद्यापुढे सर्व समान आहेत. म्हणूनच सत्य समोर येणे आवश्यक आहे."

कल्पना इनामदार

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

 READ / SHARE  / FORWARD 
JANATA  NEWS  xPRESS

निरंतर सेवेच्या आर्थिक मदतीकरिता 
for Donation
G pay 8108658970 

संपादक: सुबोध शाक्यरत्न  
M : 8108658970

Email- pr.janata@gmail.com