सर्वसामान्य नागरिकांची फसवणूक झाल्याची भावना...स्वप्नातले घर मिळण्यासाठी अनेक पोलिस कुटुंबीय हवालदिल..
:- गरीब गरजूंना त्यांचे हक्काचे घर देण्यासाठी राज्य शासनाचे प्रयत्न प्रामाणिक प्रयत्न सुरू असताना विविध कारणास्तव राज्यातील अनेक SRA योजना विविध कारणास्तव काही ठिकाणी संकटात आहेत त्यातलीच 2022 ला तत्कालीन मंत्र्यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आलेली "शिवानंद"ही झोपडपट्टी पुनर्वसन योजना रखडली असून आज पर्यंत मागील चार वर्षात फक्त पाच RCC बांधकाम जेमतेम करण्यात आहे.22 माळ्याच्या या अत्याधुनिक इमारतीतील जागेवरील काही स्थानिक नागरिक असून इकडे तिकडे भाडेतत्वावर जीव मुठीत घेऊन राहत आहेत. विशेष म्हणजे या अधिकृत योजनेत,विश्वासाने अनेक, दिवस रात्र नागरिकांच्या संरक्षणासाठी कार्यरत असणाऱ्या, सद्या राहत पोलिस असणाऱ्या पोलिस वसाहतील सदनिका अतिशय धोकादायक स्थितीत असल्याने पोलिसांनी आपल्या घराचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी घर कर्ज काढून घेतले आहेत.
विशेष म्हणजे काही महिला पोलिसांनी आपल्या घराचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी कर्ज काढून १००% रक्कम अदा केली असून बँकेचे कर्ज,हप्ते त्यामुळे पोलिस कुटुंबीय कर्जाच्या डोंगरा खाली मानसिक तणावाखाली आल्याचे कळते.विकासक यांच्याकडे मेहनतीच्या गुनंतवणुकीची परतावा मागत आहेत.मात्र पैसे देण्यास विकासक टाळाटाळ करत असल्याचे पोलिसांचे म्हणणे पोलिस कुटुंबीय आपल्या कच्च्या बच्चा सह रस्त्यावर उतरणार असल्याचे दिसून येत आहे. सदर योजनेतील सर्व सदनिका नोंदणीकृत विक्री करण्यात आल्याचे माहिती अधिकारात दिसते.लवकरच सदर विकासकावर गुन्हा दाखल होण्याची शक्यता वर्तवण्यात जात आहे.
आर्थिक स्थिती,सदनिका अस्तित्वात नसताना ही नोंदणीकृत विक्री,शासकीय परवानग्या,अनियमितता, डीपीरोड अस्तिवात आहे का.. काही सदनिका धारक यांनी रेरा लाही आपल्या कष्टाचे पैसे परत मिळण्यासाठी तक्रार केली असून स्थानिक पातळीवर विरोध... त्यामुळे सदर ची SRA योजना पुढे पूर्णत्वाला येणार की नाही अशी चर्चा सुरू झाली आहे. विकासक यांची प्रतिक्रिया घेतली असता लवकरच सदर योजना वेगाने सुरू होणार असल्याचे म्हटले आहे... सदर प्रकरणाची राज्य शासनाने गंभीर दखल घेऊन पोलिस व सर्वसामान्य नागरिकांना घर किंवा कर्ज परतावा मिळण्यासाठी योग्य ती कार्यवाही करून न्याय द्यावा अशी मागणी जोर धरू लागली आहे.

0 टिप्पण्या