Top Post Ad

  बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त संपूर्ण भारतात मिरवणूका निघाल्या होत्या. १) कोणत्या मिरवणुकीत तलवारी नाचवणे बघितल्या का कोणी?

२) बाबासाहेब आंबेडकर यांच्या मिरवणुकीतील लोकांनी मंदिर, मशीद, गुरुद्वारा, चर्च समोर धांगडधिंगा घातलेला बघितला का कोणी?
३) बाबासाहेबांच्या मिरवणुकीत इतर जातीधर्माच्या लोकांना अपमानित करणारे शब्द बोललेले, टोमणे मारलेले बघितले का कोणी?
४) बाबासाहेब आंबेडकरांच्या जयंतीच्या मिरवणुकीत पोलीस प्रशासनावर अतिरिक्त भार आल्याचे देशभरातील पोलिसांनी कुठे सांगितले आहे का?
५) इतर जातीधर्माच्या महिलांना पाहुन हिडीस चाळे करणे, छेड काढणे, अर्वाच्य भाषेत बोलणे हे बाबासाहेब आंबेडकरांच्या जयंतीत कधी पाहिले आहे का कोणी?
६) गावागावात बाबासाहेब आंबेडकरांच्या जयंतीचे बॅनर लावले जातात. कोणत्याही बॅनरवर इतर जातीधर्माच्या लोकांच्या महापुरुषांचा अपमान होईल, इतर जातीधर्माच्या लोकांचा अपमान होईल असे बॅनर बघितले का कोणी?
७) बाबासाहेब आंबेडकर यांची तुलना कोणत्याही महापुरुषांच्यासोबत केलेली किंवा बाबासाहेब इतरांपेक्षा श्रेष्ठ कसे असे दाखवणारे बॅनर पाहिले का कोणी?
८) इतर कोणत्याही समाजाच्या भागात बाबासाहेब आंबेडकर यांची मिरवणूक गेल्यावर त्या विशिष्ट समाजाला उद्देशून कधी द्वेषाच्या घोषणा दिलेल्या ऐकल्या का कोणी?
९) बाबासाहेब आंबेडकर जयंतीच्या बॅनरवर इतर जातीधर्माच्या विरोधातील मजकूर पाहिला का कोणी?
१०) बाबासाहेब आंबेडकरांच्या जयंतीच्या मिरवणुकीला गालबोट लागले आहे हे पाहिले का कोणी?
ही ताकद आहे बाबासाहेब आंबेडकरांच्या विचारांची. बाबासाहेब आंबेडकर यांना मानणारा अनुयायी भारतभर आहे. भारतभरच काय जगभरात बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती साजरी केली जाते. कुठेही अनुचित प्रकार घडू देणार नाही असा अलिखित नियमच बाबासाहेब आंबेडकरांचे अनुयायी पाळतात. अजून काही बदल होणे बाकी आहे. हळूहळू ते चांगले बदलही करण्यात येतील. बाबासाहेब आंबेडकर वाचल्यावर माणूस सभ्य आणि सुसंस्कृत बनतो हे नक्कीच खरे आहे. काही अपवाद असतील पण अपवाद नियम नसतात. आम्ही बाबासाहेबांचे अनुयायी दिवसेंदिवस स्वतःमध्ये बदल घडवून आणत आहोत. बाबासाहेब आंबेडकरांना अभिप्रेत असलेला सुजाण भारतीय नागरिक बनण्यासाठी प्रयत्नशील आहोत. त्रुटी आहेत त्या दूर करण्याचा प्रयत्न करत आहोत. बाबासाहेब आंबेडकरांनी सांगितलेला बुध्दांच्या मार्गावर चालत आहोत. वर्षभर वाचून तर १४ एप्रिलला जल्लोषात जयंती साजरी करतो.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

 READ / SHARE  / FORWARD 
JANATA  NEWS  xPRESS

निरंतर सेवेच्या आर्थिक मदतीकरिता 
for Donation
G pay 8108658970 

संपादक: सुबोध शाक्यरत्न  
M : 8108658970

Email- pr.janata@gmail.com