सेंटर ऑफ इंडियन ट्रेड युनियन्स महाराष्ट्र राज्य समितीच्या वतीने संपूर्ण राज्यभरातील सीटू संलग्न संघटना, फेरीवाले/ हॉकर्स/ पथविक्रेते यांची राज्यस्तरीय परिषद, रविवार दिनांक 26 एप्रिल रोजी सिटू मुंबई च्या आझाद मैदान कार्यालयासमोरील हॉल, सीएसटी येथे 5 जिल्ह्यातून एकूण 90 प्रतिनिधिच्या उपस्थितीत पार पडली. सदर परिषदेत फेरीवाला कायदा ची राज्यात अंमलबजवणीची स्थिति तसेच कायदा अंमलात आणण्यासाठी व फेरीवाल्यांवरील कारवाई थांबविण्यासाठीचा पुढील काळातील राज्यव्यापी संघर्षाचे नियोजन करण्यात आले. परिषेदेचे उद्घाटन मुंबई उच्च न्यायालयाच्या ज्येष्ठ वकील गायत्री सिंह यांनी केले. सिटू चे राज्याध्यक्ष कॉ डी एल कराड, राज्य महासचिव कॉ अॅड एम एच शेख व राष्ट्रीय कार्यकारिणी सदस्य कॉ डॉ विवेक मोण्टेरो हे प्रमुख मार्गदर्शन केले.
उदघाटन भाषणात ऍड गायत्री सिंह यांनी फेरीवाला कायदा 2014 तील फेरीवाला भिमुख दृष्टीने अंमलात आणण्याकरिता न्यायालयीन संघर्षबरोबर रस्त्यावरील संघर्ष देखील मजबूत करण्याचे आवाहन केले . राज्य महासचिव कॉ एम एच शेख यांनी सरकारचे फेरीवाला विरोधी धोरण हे प्रत्यक्षात वर्ग संघर्ष स्पष्ट करत असून धर्म भाषा जात या आधारावर फूट पाडण्याचे धोरण आहे. प्रमुख मार्गदर्शन करताना कॉ डी एल कराड यांनी फेरीवाळ्यांना आपल्या आत्मसन्मान अर्थात माणूस म्हणून जगण्याचा अधिकारासाठीचा हा संघर्ष आहे. हा संघटित संघर्ष उभा करण्याचे आवाहन केले. सिटू राष्ट्रीय कार्यकारिणी सदस्य काँ विवेक मोन्टेरो यांनी रस्त्यावरील आणि न्यायालयीन संघर्षाबरोबर सरकारच्या धोरणमागील राजकारण समझून घेऊन आपला संघर्ष पुढे घेऊन जाण्याचे आवाहन केले
परिषदेचा मसुदा कॉ शैलेंद्र कांबळे यांनी ठेवला. त्यावर एकूण 10 प्रतिनिधिनी चर्चा केली. संगीता कांबळे यांनी अंगणवाडी कर्मचारी संघटना तर मनोज यादव यांनी FSUI च्या वतीने शुभेच्छा दिल्या. कॉ कैलास भगत आणि कॉ. ख्वाजाभाई करजगी, किशोर सामंत, सुभाष पांडे, जय गायकवाड, मयुरी नाडकर, हरिचरण चौहान यांनी आपलापल्या भागातील फेरीवाल्यांचा संघर्ष मांडला. राज्य उपाध्यक्ष कॉ एस के रेगे, कॉ आरमायटी इराणी, कॉ के नारायनण, कॉ शैलेन्द्र चौहान व कॉ शैलेन्द्र कांबळे यांची प्रमुख उपस्थिती होती.

0 टिप्पण्या