Top Post Ad

अखेर तात्यासाहेबांची खरी जन्मतारीख सापडली.

तात्यासाहेब (जोतीराव फुले) यांची जन्म तारखेबाबत खात्रीशीर माहिती नसल्यामुळे अनेक वर्षे त्यांची फक्त २८ नोव्हेंबरला पुण्यतिथी केली जात असे..फुले समग्र वाड्मयाच्या प्रस्तावनेत संपादक धनंजय कीर,स.गं.मालसे यांनी १९६९ साली तात्यासाहेबांच्या जन्माबद्दल एक आठवण लिहून ठेवली होती की त्यांच्या जन्माच्या दिवशी शनिवारवाड्याला आग लागलेली होती. या घटनेच्या आधारे त्यांनी तात्यासाहेबांचा जन्म २० फेब्रुवारी १८२८ ला झाला असावा अशी शक्यता नोंदवून ठेवली. त्याबाबत प्रा.हरी नरके सरांनी दोघांशी प्रत्यक्ष भेटून चर्चा केली. त्याअगोदर म.फुले यांच्या सर्वच चरित्रकारांनी फुले जन्मवर्ष सन १८२७ दिली होती.त्यामुळे ही नोंद चुकीची वाटत होती.

प्रा.हरी नरके सर यांचे महात्मा फुले यांची बदनामी : एक सत्यशोधन हे पुस्तक १९८९ ला प्रकाशित झालं.त्यातून कमलताई विचारे यांचा आणि प्रा.नरके सरांचा परिचय झाला.सत्यशोधक केशवराव विचारे यांच्या त्या सुनबाई. त्यांच्याकडील दुर्मिळ कागदपत्रांमध्ये शोध घेताना १८९१ साली सावित्रीबाई फुले यांच्या हस्ते प्रकाशित झालेले "महात्मा फुले यांचे अमर जीवन" हे चरित्र त्यांना मिळालं.
कॉ.गोविंद पानसरे यांचे पणजोबा नारायण बाबाजी पानसरे यांनी लिहिलेले हे चरित्र अतिशय मौलिक आणि विश्वासार्ह आहे.त्यांच्या हस्ताक्षरातील काही पत्रंही यावेळी मिळाली.या चरित्रात पानसरेंनी दिलेली तात्यासाहेबांची दि.११ एप्रिल १८२७ ही जन्मतारीख सापडली.आणि तात्यासाहेबांच्या जन्माची नेमकी तारीख मिळाली.तो क्षण आनंद देणारा होता.डॉ.य.दि.फडके,डॉ.बाबा आढाव,डॉ.भा.ल.भोळे यांच्याशी प्रा.नरके सर बोलले.खात्री करून झाल्यावर त्यांनी खुद्द मुख्यमंत्र्यांकडे याबाबत पत्रव्यवहार केला.
प्रा.हरी नरके सरांनी तात्यासाहेबांच्या जन्मतारखेबाबत म.टा.आणि इतर वर्तमानपत्रात अनेक लेख लिहिले.तसेच शासकीय समितीच्या मान्यतेची सर्व प्रक्रिया पुर्ण करून सर्व शासकीय पुस्तकं आणि दस्तावेजात दि.११ एप्रिल १८२७ ही तारीख नोंदवली.महत्त्वाचं म्हणजे मुंबईत विधान भवन परिसरातील तात्यासाहेबांच्या पुतळ्याखाली त्यांनी ही नोंद करून घेतली. दि.११ एप्रिल २०२६ तात्यासाहेबांचे द्विजन्मशताब्दी वर्ष साजरे करताना त्यांची खरी जन्मतारीख शोध कामातील प्रा.हरी नरके सर यांचे मौलिक योगदान आपल्याला विसरता येणार नाही.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

 READ / SHARE  / FORWARD 
JANATA  NEWS  xPRESS

निरंतर सेवेच्या आर्थिक मदतीकरिता 
for Donation
G pay 8108658970 

संपादक: सुबोध शाक्यरत्न  
M : 8108658970

Email- pr.janata@gmail.com