१५ लाख रिक्षाचालक संपावर जाणार असल्याच्या सुरु असलेल्या चर्चांवर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे नेते अविनाश जाधव यांनी सडकून टीका केली आहे. मुंबई, ठाणे आणि रायगडमधील रिक्षांच्या खऱ्या आकड्यांचा आणि आरटीओ अहवालाचा हवाला देत त्यांनी संपकऱ्यांवर थेट निशाणा साधला असून, “१ तारखेला संप करा नाहीतर यूपी-बिहारला परत जा,” असा सज्जड दमच भरला आहे.?
अविनाश जाधव यांनी त्यांच्या अधिकृत फेसबुक पेजवर एक पोस्ट आणि आरटीओची आकडेवारी शेअर केली आहे. त्यानुसार: प्रत्यक्षात मुंबई, ठाणे आणि रायगडमध्ये मिळून केवळ ४ लाख रिक्षा आहेत. यापैकी ६० ते ६५% रिक्षाचालक हे भूमिपुत्र (मराठी) आहेत. मग “संपासाठी यूपी-बिहारवरून रिक्षा मागवणार आहात का?” असा थेट प्रश्न त्यांनी संपकऱ्यांना केला आहे
गेल्या ४ दिवसांपासून १५ लाख रिक्षावाले संपावर जाणार असल्याची खोटी माहिती पसरवली जात आहे.खोटे आकडे सांगून महाराष्ट्रातील वातावरण खराब करण्याचा प्रयत्न काही लोक करत असल्याचा आरोप जाधव यांनी केला आहे. जर एकूण रिक्षाच ४ लाख आहेत, तर उर्वरित रिक्षा काय यूपी-बिहारवरून संपासाठी मागवणार आहात का? असा उपरोधिक प्रश्न त्यांनी उपस्थित केला आहे.
“१ तारखेला तुम्ही संप करा नाहीतर यूपी-बिहारला परत जा, आम्हाला काही फरक पडणार नाही,” अशी अत्यंत स्पष्ट आणि आक्रमक भूमिका त्यांनी मांडली आहे. संप झाला तरी एकही माणूस १ तारखेला रिक्षाची वाट बघत थांबणार नाही; वेळप्रसंगी आम्ही आमच्या स्वतःच्या गाड्या काढून लोकांना त्यांच्या घरापर्यंत सुरक्षित पोहोचवू, असा शब्दही त्यांनी सर्वसामान्यांना दिला आहे.
रिक्षा-टॅक्सी चालकांच्या 'मराठी सक्तीला" मराठी माणसांचा जाहीर पाठिंबा दिला आहे राज्य आमचे, शहर आमचे, मग इथे भाषा सुद्धा आमचीच वापरायची... परप्रांतीय भैय्या उत्तर भारतीय लोकांनी फक्त संपावर जाऊ नका तर कायमचं आपापल्या राज्यात जा...१५ लाख मराठी बांधवांना रिक्षा / टॅक्सी चालक म्हणून भरती होण्याची सुवर्ण संधी मिळेल. त्यांना खुशाल संपावर जाऊ द्या. सरकारने त्यांना कायम संपावर ठेवावे. त्यांनी खुशाल जी भाषा येते तिथे जाऊन आपली रिक्शा टैक्सी चालवावी. संपूर्ण महाराष्ट्राच्या तुम्हाला शुभेच्छा आहेत.*असेच अमराठी फेरीवाले, कामगार यांनी पण संपावर जायचे असेल तर जा. पण महाराष्ट्रात राहायचे. तर मराठी बोलावीच लागले. महाराष्ट्रात फक्त मराठीच. अशा शब्दात मुंबईतील मराठी नागरिक आपल्या प्रतिक्रिया व्यक्त करीत आहेत.

0 टिप्पण्या