Top Post Ad

भारतातील पहिली रेल्वे... १६ एप्रिल १८५३.... मुंबईतील बोरी बंदर ते ठाणे

भारतातील पहिली रेल्वे चालवण्याची कल्पना प्रथम 1843 मध्ये मुंबई सरकारचे मुख्य अभियंता जॉर्ज क्लार्क यांना सुचली. क्लार्कच्या लक्षात आले की माल आणि प्रवाशांची वाहतूक करण्यासाठी रेल्वेचा वापर केला जाऊ शकतो. त्यांनी मुंबई ते ठाणे दरम्यान रेल्वेमार्ग बांधण्याचा प्रस्ताव तयार केला, त्याला ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनीने मान्यता दिली. भारतातील पहिल्या रेल्वेचे उद्घाटन ब्रिटिश भारताचे गव्हर्नर-जनरल लॉर्ड डलहौसी यांनी केले होते.  १६ एप्रिल १८५३ रोजी मुंबईतील बोरी बंदर ते ठाणे ३४ किलोमीटर अंतरावर  दुपारी ३:३५ वाजता बोरी बंदरहून सुटलेली ट्रेन ४:४५ वाजता ठाण्याला पोहोचली. प्रवासाची वेळ अंदाजे एक तास 10 मिनिटे होती   ही ट्रेन ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनी ग्रेट इंडियन पेनिनसुला रेल्वेद्वारे चालवली गेली   ट्रेनला साहिब, सुलतान आणि सिंध अशी तीन इंजिन होती.  ट्रेनला 14 डबे होते आणि सुमारे 400 प्रवासी होते. प्रचंड जनसमुदायाच्या टाळ्या आणि 21 तोफांच्या सलामीने ट्रेनला सुरुवात झाली. भारतातील पहिल्या रेल्वेचे उद्घाटन ही एक ऐतिहासिक घटना होती. यामुळे भारतातील रेल्वेच्या विकासाची सुरुवात झाली, जी आज देशाच्या वाहतूक व्यवस्थेचा एक महत्त्वाचा भाग आहे.

भारताची जीवनरेषा मानल्या जाणार्‍या भारतीय रेल्वेने आज १६४ वर्षे पूर्ण केलीत. भारतात रेल्वे वाहतुकीचा प्रथम आराखडा इ.स. १८३२ सालीच मांडण्यात आला होता, परंतु पुढे एक दशक काहीच हालचाली झाल्या नाहीत. इ.स. १८४४ साली, भारताचे त्यावेळचे गव्हर्नर जनरल लॉर्ड हार्डिंग यांनी खाजगी व्यावसायिक मंडळीना रेल्वे व्यवस्था चालू करण्यासाठी परवानगी दिली. दोन नवीन रेल्वे कंपन्यांची स्थापना करण्यात आली आणि ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनीला त्यांना मदत करण्यासाठी सांगण्यात आले. पुढेल काही वर्षात, इंग्लंडमधील गुंतवणुकदारांनी दाखवलेल्या व्यावसायिक औत्सुक्याचा रेल्वे व्यवस्था वृद्धिंगत होण्यात हातभार लागला. भारतातील पहिली रेल्वेगाडी डिसेंबर २२, इ.स. १८५१ रोजी रूडकी मध्ये बांधकाम साहित्याच्या वहनासाठी चालवण्यात आली. त्यानंतर दीड वर्षांनी, एप्रिल २२, इ.स. १८५३ रोजी भारतातील पहिली प्रवासी रेल्वेगाडी बोरीबंदर (नंतरचे व्हिक्टोरिया टर्मिनस, व आताचे छत्रपती शिवाजी टर्मिनस) मुंबई ते ठाणे अशी ३४ किलोमीटर (२१ मैल) धावली. आणि भारतातील रेल्वे वाहतूकीला औपचारिक सुरुवात झाली. त्यानंतर १८५४ मध्ये बंगाल मध्ये हावडा ते हुगळी हे २४ मैलांचे अंतर कापणारी गाडी सुरू झाली. कोलकाता ते अलाहाबाद दिल्ली असा लोहमार्गही १८६४ मध्ये पूर्ण केला गेला. मुंबई ते कोलकाता हा ६४०० किलोमीटरचा रेल्वेमार्ग पूर्ण झाला १८७० मध्ये त्यावरून गाडी धावली. १८८५ मध्ये भारतीय बनावटीचे इंजिन बनवण्याची सुरुवात झाली. तेव्हापासून भारतीय रेल्वेचा प्रवास अव्याहतपणे सुरू आहे. गेल्या १६४ वर्षांत रेल्वेचा परीघ एवढा प्रचंड विस्तारला आहे की, भारतीय रेल्वे आज दंतकथेचा विषय झाली आहे. 

भारतीय रेल्वेचं नेटवर्क चीननंतर आशियातील दुसर्‍या क्रमांकाचं नेटवर्क मानलं जातं. भारतात एकूण ७,२१६ पेक्षा अधिक रेल्वे स्टेशन आहेत. देशातील रेल्वे रुळांची एकत्रित लांबी पकडली तर ती जवळपास ६६,६८७  किलोमीटरपर्यंत जाते. हे अंतर पृथ्वीच्या एकूण अंतराच्या जवळपास दीडपट आहे. भारतात दररोज १३,३१३ गाड्या रुळावरून धावतात. त्यापैकी ७ हजार प्रवासी गाड्या आहेत. त्यातून अडीच कोटी माणसं दररोज प्रवास करतात. ऑस्ट्रेलिया, न्यूझीलंडच्या एकत्रित आणि युरोपातील ऑस्ट्रिया, हॉलंड, स्पेन अशा अनेक छोट्या-मोठय़ा देशांच्या लोकसंख्येपेक्षा ही संख्या कितीतरी अधिक आहे. भारतीय रेल्वेत काम करणार्‍या कर्मचार्‍यांची संख्या तब्बल १३.३१ लाख आहे. जगात एकमेव भारतीय रेल्वे अशी आहे की, जिचा वेगळा अर्थसंकल्प सादर होतो (यावर्षीपासून ही प्रथा बंद झाली आहे.) कुठल्याही कारणाने या रेल्वेची चाकं थांबलीत, तर संपूर्ण देश ठप्प होईल, एवढं महत्त्वपूर्ण स्थान आज तिने मिळविलं आहे. भारतीय रेल्वेच्या स्थापनेपासून आतापर्यंत एवढय़ा अद्भुत कहाण्या आहेत की, त्या संपूर्ण सांगायच्या म्हटल्यास दोन-चार ग्रंथ कमी पडतील. 

मुंबई ते कोलकाता ७ मार्च १८७० लॉर्ड मेरोच्या कार्यकाळात तिसरी रेल्वे धावली आणि ती सर्वात जास्त लांबीची (पल्ल्याची) होती आणि त्या वेळेस लॉर्ड मेयो म्हणाले की भारताला एकसंध करण्याचे काम जे मोठमोठे राजे करू शकले नाहीत ते रेल्वेने शहरांना जोडून भारत एकसंध केला. यामध्ये भारतीयपण मागे राहिले नाहीत आणि ‘बाबासाहेब ढ्याल’ यांची खासगी मालकीची बेदी सन्स अँड कं. मार्फत लाहोर ते दिल्ली पहिली खासगी रेल्वे धावली. १८८० पर्यंत १४५०० किमीचे रूळ तयार करून पूर्ण झाले. आजमितीला भारतामध्ये १ लाख १२ हजारपेक्षा जास्त अंतराच्या रूळांचे जाळे आहेत. त्यामध्ये ब्रॉडगेज, मीटर गेज व नॅरोगेजचे प्रमाण अनुक्रमे ८४.८१ टक्के, ११.२२ टक्के व ३.९७ टक्के आहे. जवळपास रेल्वे १३ लाख लोकांचे रोजगाराचे साधन आहे. १९२५ पासून रेल्वे अर्थसंकल्प स्वतंत्र मांडण्यास सुरूवात झाली. तीच परंपरा आजपर्यंत चालू आहे. वीजेवर चालणाऱ्या रेल्वेच्या बाबतीत भारतीय रेल्वेचे जगामध्ये तिसरे स्थान आहे आणि वाहतुकीच्या बाबतीत जगामध्ये दुसऱ्या स्थानावर आहे  रेल्वे विभाग हा भारत सरकारच्या कें‍द्रीय रेल्वे खात्यातील विभाग, भारतातील संपूर्ण रेल्वे जाळ्याचे नियोजन करतो. रेल्वे खात्याचे कामकाज कॅबिनेट दर्ज्याचे रेल्वेमंत्री पाहतात व रेल्वे विभागाचे नियोजन रेल्वे बोर्ड करते. 

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

 READ / SHARE  / FORWARD 
JANATA  NEWS  xPRESS

निरंतर सेवेच्या आर्थिक मदतीकरिता 
for Donation
G pay 8108658970 

संपादक: सुबोध शाक्यरत्न  
M : 8108658970

Email- pr.janata@gmail.com