फेलाइन क्लब ऑफ इंडिया (FCI) 17 मे रोजी नवी मुंबईतील वाशी येथील CIDCO एक्झिबिशन सेंटरमध्ये जगातील सर्वांत मोठ्या कॅट शोपैकी एकाचे आयोजन करणार आहे. या कार्यक्रमात 600 हून अधिक मांजरी, आंतरराष्ट्रीय न्यायाधीश, दत्तक मोहीम, शैक्षणिक उपक्रम आणि पाळीव प्राणी उद्योगातील प्रमुख ब्रँड्सचा सहभाग असणार आहे. संबंधित कार्यक्रम आणि संस्थेच्या देशभरातील मांजरींच्या कल्याणासाठीच्या उपक्रमांची माहिती मुंबईत प्रेस क्लब येथे आयोजित पत्रकार परिषदेत FCI चे अध्यक्ष साकिब पठान यांनी दिली.
माध्यमांशी बोलताना पठान म्हणाले, मुंबईत FCI तर्फे आयोजित होणारा हा सहावा कॅट शो असून, प्रत्येक आवृत्तीने सहभाग आणि दर्जाच्या बाबतीत मागील विक्रम मोडले आहेत. या चॅम्पियनशिप स्पर्धेत ऑस्ट्रेलिया, इंडोनेशिया, मलेशिया आणि थायलंड येथील न्यायाधीश सहभागी होणार असून ते विविध मान्यताप्राप्त जातींच्या मांजरींचे मूल्यांकन करणार आहेत.
FCI च्या माहितीनुसार, प्रदर्शनाला येणाऱ्या पाहुण्यांना 600 हून अधिक मांजरी पाहण्याची संधी मिळणार आहे. यामध्ये पर्शियन, बंगाल, एक्सोटिक शॉर्ट हेअर, मेन कून आणि इतर आंतरराष्ट्रीय स्तरावर मान्यताप्राप्त जातींच्या मांजरींचा समावेश असेल, पठान यांनी सांगितले की, संस्थेने भारतीय भटक्या मांजरींना 'INDIMAU' या नावाने नोंदणी करून त्यांना मान्यता देण्यासाठी विशेष प्रयत्न केले आहेत. त्यामुळे भारतीय मूळच्या मांजरींचा संघटित कॅट शोमध्ये सहभाग वाढण्यास मदत होईल आणि स्थानिक जातींना राष्ट्रीय तसेच आंतरराष्ट्रीय स्तरावर ओळख मिळेल.
हे प्रदर्शन सर्वसामान्यांसाठी सकाळी 11 ते सायंकाळी 7 या वेळेत खुले राहणार आहे. आयोजकांनी सांगितले की, कार्यक्रमात मुलांसाठी फन झोन, मांजरींच्या देखभालीवरील शैक्षणिक सत्रे, पाळीव प्राणी मालकांसाठी जनजागृती उपक्रम आणि भेट देणाऱ्यांना ब्रीडर्स, पशुवैद्यक तसेच कॅट तज्ज्ञांशी थेट संवाद साधण्याची संधी मिळणार आहे. प्राणी कल्याण आणि कॅट रेस्क्यूशी संबंधित स्वयंसेवी संस्थाही या कार्यक्रमात सहभागी होणार असून, त्यामार्फत लोकांना मांजरी दत्तक घेण्याची संधी उपलब्ध करून दिली जाणार आहे.
FCI ने सांगितले की, सुमारे 5,000 चौरस मीटरमध्ये पसरलेल्या प्रदर्शन हॉलमध्ये 60 हून अधिक स्टॉल्स उभारले जाणार आहेत. यामध्ये पाळीव प्राण्यांचे अन्न, ग्रूमिंग उत्पादने, अॅक्सेसरीज, आरोग्यसेवा आणि इतर कॅट-संबंधित उत्पादनांशी संबंधित कंपन्यांचा समावेश असेल. पाहुण्यांना सवलती, प्रमोशनल ऑफर्स आणि उत्पादनांचे प्रात्यक्षिक पाहण्याची संधीही मिळणार आहे.
पत्रकार परिषदेदरम्यान पठान यांनी सांगितले की, फेलाइन क्लब ऑफ इंडिया ही सध्या देशातील एकमेव सक्रिय संस्था आहे, जी विशेषतः मांजरींच्या कल्याणासाठी आणि कॅट समुदायाच्या प्रोत्साहनासाठी कार्यरत आहे..
FCI च्या प्रतिनिधींनी सांगितले की, संस्था सध्या देशातील प्रमुख शहरांमध्ये प्रादेशिक क्लब्सच्या माध्यमातून कार्यरत आहे आणि नियमितपणे परिषद, नोंदणी मोहिमा तसेच कॅट शो आयोजित करते. संस्था बेंगळुरूस्थित भारतीय विज्ञान संस्थान (IISC) सोबत मिळून जेनेटिक फिंगरप्रिंटिंग प्रणाली आणि प्रमाणपत्र प्रक्रिया सुरू करण्यावरही काम करत आहे. यामुळे वंशावळ ओळख आणि पूर्वजांचा मागोवा घेण्याची प्रणाली अधिक मजबूत होण्यास मदत होईल.
संस्थेने म्हटले की, कॅट नोंदणी आणि ब्रीड प्रमाणपत्र कार्यक्रमांमुळे भारतात दस्तऐवजीकृत वंश प्रणाली तयार करण्यास आणि जातींचे मानदंड जपण्यास मदत होत आहे. FCI ने मांजरींमध्ये मायक्रोचिपिंगला प्रोत्साहन

0 टिप्पण्या