Top Post Ad

माणगाव राष्ट्रीय स्मारक उभारणीच्या चर्चेत सकारात्मक प्रतिसाद

: एप्रिल महिन्यात कोल्हापूर येथे नव्याने रुजू झाल्या चार प्रशासकीय अधिकाऱ्यांपैकी तीन अधिकाऱ्यांची सामाजिक कार्यकर्ता मधुकर माणगावकर यांनी भेट घेतली. यावेळी त्यांनी माणगाव राष्ट्रीय स्मारकाच्या उभारणीसंदर्भात शासकीय अधिकाऱ्यांशी महत्त्वपूर्ण चर्चा केली. यामध्ये जिल्हाधिकारी डॉ. विजय सुंदरबाई चंद्रकांत राठोड, जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. जास्मिन मॅडम तसेच कोल्हापूर महानगरपालिकेचे आयुक्त डॉ. राजेंद्र भारूड यांच्याशी प्रत्यक्ष संवाद साधण्यात आला. मात्र, कोल्हापूरचे पोलीस अधीक्षक निलोत्पल साहेब यांची काही तांत्रिक अडचणीमुळे भेट होऊ शकली नाही.


जिल्हाधिकारी व मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्यासोबत सुमारे दहा मिनिटे सविस्तर चर्चा झाली. यावेळी माणगाव राष्ट्रीय स्मारकाच्या उभारणीबाबत माहिती देत संबंधित कागदपत्रे सादर करण्यात आली. या प्रस्तावाला अधिकाऱ्यांकडून सकारात्मक प्रतिसाद मिळाल्याचे मधुकर माणगावकर यांनी सांगितले.विशेष म्हणजे, जिल्हाधिकारी यांनी “मी तुमच्या गावी येणार आहे,” असे सांगून या विषयात प्रत्यक्ष पाहणी करण्याची तयारी दर्शवली. त्यामुळे माणगाव राष्ट्रीय स्मारकाच्या उभारणीच्या दृष्टीने सकारात्मक हालचाली सुरू झाल्याचे चित्र दिसत आहे.दरम्यान, उर्वरित अधिकाऱ्यांशीही लवकरच बैठक घेऊन या विषयाचा पुढील पाठपुरावा केला जाणार असल्याचे माणगावकर यांनी स्पष्ट केले.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

 READ / SHARE  / FORWARD 
JANATA  NEWS  xPRESS

निरंतर सेवेच्या आर्थिक मदतीकरिता 
for Donation
G pay 8108658970 

संपादक: सुबोध शाक्यरत्न  
M : 8108658970

Email- pr.janata@gmail.com