Top Post Ad

अजितदादांच्या घातपाताचं सायप्रस कनेक्शन?

गेली दहा वर्ष महाराष्ट्राच्या अर्थकारभाराची सूत्रे सांभाळणाऱ्या स्व.अजितदादांच्या अपघाताबाबत आजही सरकार स्पष्ट माहिती देऊ शकलेलं नाही. साधी FIRही दाखल होत नसेल आणि चार महिने उलटूनही सत्य समोर येत नसेल, तर संशय अधिक गडद होणं स्वाभाविक आहे. फोटोतील व्यक्ती हा सायप्रस देशाचा राष्ट्रपती Nikos Christodoulides आहे. सायप्रस हा जगातील मोठे कुप्रसिद्ध उद्योजक, राजकारणी आणि आर्थिक घोटाळ्यांशी संबंधित लोकांना संरक्षण देणारा देश म्हणून ओळखला जातो. गेल्या काही वर्षांत महाराष्ट्रातील राजकीय घडामोडी पाहिल्या तर राज्याच्या साधनसंपत्तीवर बाह्य शक्ती आणि भांडवलदार लॉबीचा डोळा असल्याचं दिसतं. महाविकास आघाडी सरकार पाडण्यापासून ते उद्योगपतींना मोक्याच्या जागा, जंगलं आणि पर्यावरणविघातक प्रकल्प देण्यापर्यंत अनेक निर्णय जनतेच्या विरोधात घेतले गेले आहेत.  

सरकारमध्ये सामील झाल्यानंतर महाराष्ट्राच्या आर्थिक नाड्या ओळखणारे अजितदादा या भांडवलदार लॉबीच्या दबावाला झुकत नसावेत. भाजपसोबत सत्तेत असूनही त्यांनी शाहू-फुले-आंबेडकर विचार आणि महाराष्ट्रधर्म सोडला नाही. त्यामुळे महाराष्ट्राच्या हिताविरोधातील काही प्रकल्प त्यांनी रोखले असावेत. म्हणून तर अजितदादांच्या अपघातानंतरच अनेक वादग्रस्त आणि पर्यावरणविघातक प्रकल्पांना मंजुरी मिळाली. खरंतर अजितदादांच्या नंतर अर्थ खात्यावर राष्ट्रवादी काँग्रेसचा अधिकार असताना ते खात फडणवीसांनी स्वतःजवळ का ठेवलं हीच मोठी शंका आहे.त्यामुळे त्यांच्या मृत्यूमागे आर्थिक हितसंबंध किंवा भांडवलदार लॉबीचा हात होता का, हे सुद्धा महाराष्ट्राच्या समोर आलं पाहिजे. 

चार महिने उलटून देखील सरकारने अजितदादांच्या अपघाताबद्दल कुठलंही ठोस अस स्पष्टीकरण दिलेलं नाही. एक महिन्यात फडणवीस चौकशी अहवाल सादर करणार होते मग नेमकी काय अडचण आली? पुढील पंधरा दिवसात सरकारने ठोस  अहवाल सादर न केल्यास.माझ्याकडे जी माहिती या विषयावर आहे, ती मी लोकांसमोर मांडणार!! मी स्वतः बंगलोर स्थित एका प्राइवेट इन्वेस्टीगेशन कंपनी बरोबर स्पाय एजंट म्हणून काम केलं आहे.ज्या दिवशी अजितदादांचा अपघात झाला त्याच्या एक तासात मुंबई विमानतळ अथॉरिटी कडून संबंधित विमानात असलेल्या प्रवाशांची लिस्ट आणि सीसीटीव्ही मिळवायचा प्रयत्न केला होता.लिस्ट भेटली पण सीसीटीवी मिळवण्यात आम्ही अपयशी ठरलो.

त्यानंतरच्या चौकशीत कमालीची गुप्तता एअरपोर्ट ऑथॉरिटीने बाळगली असल्याचं मला आज पर्यंत दिसत आहे. गेली चार महिने या प्रकरणात केवळ एक उत्सुकता म्हणून मी वयक्तिक लेवल ला इन्व्हेस्टिगेशन करत होतो तर अनेक धाकदायक माहिती आणि पुरावे मिळत आहेत. VSR विमान कंपनी आणि त्याचे संचालक यांचा यामध्ये सहभाग आहेच हे आमदार रोहित पवार यांनी अतिशय चांगल्या प्रकारे पुराव्यानिशी महाराष्ट्राच्या जनतेसमोर जवळपास सिद्ध केले आहे.

अजितदादांच्या घातपातामागे पटेल, तटकरे,चाकणकर व्हाया खरात बाबा  कनेक्शन आहे का? या घातपातामागे आजुन कोणी सरकारमधील अधिकारी आणि अजित दादांच्या जवळील एखादा उद्योजक सामील आहे का? बाबा सिद्धकी यांच्या खुनाबद्दल अजित दादांना अनेक पुरावे सापडले होते का? त्या प्रकरणाचा ही अजितदादांच्या घातपाताशी काही संबंध आहे का?  हेसुध्दा स्पष्ट करू. निश्चित पुरावे मर्यादित आहेत पण माहितीचा स्रोत लोकांना स्पष्ट करून सांगू. स्व.अजितदादांचा घातपातच आहे.हा घातपात झालाय तो फक्त भांडवलदारांना महाराष्ट्राचा सौदा न केल्यामुळे! या भांडवलदारांचा मुख्य सूत्रधार सायप्रस मध्ये बसलाय तो कोण? हे सुद्धा स्पष्ट करू!!

महाराष्ट्राचा हित जोपासत असताना अजितदादांचा जर घातपात झाला असेल,तर एक महाराष्ट्रीयन म्हणून माझ्याकडे जी माहिती आहे ती लोकांपर्यंत पोहोचवणे हे मी मराठी नागरिक म्हणून कर्तव्य समजतो.त्यासाठी मला कुठल्याही सरकारची भीती नाही किंवा पवार घराण्यातील तसेच राष्ट्रवादी पक्षातील कुणाची परवानगी घेण्याची आवश्यकता वाटत नाही!! अजित दादांचा घात झालाय का?हे शोधून काढू आणि जर कोणी केला असेल तर तो पातळात देखील असेल तरी सोडणार नाही !!अस विधानभवनात म्हणणारे फडणवीस काय करतात हे पहायचंय!! का सायप्रस मध्ये बसलेला फडणवीस यांचा आका जसा नाचवतोय तस नाचतायेत हेही पहायचंय!! नाहीतर आम्ही 15 दिवसात जी काही माहिती यासंदर्भात आहे ती जनतेच्या कोर्टात ठेवूच!!परिणामांची भीती नाही!!

अजित मुलाणी!!

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

 READ / SHARE  / FORWARD 
JANATA  NEWS  xPRESS

निरंतर सेवेच्या आर्थिक मदतीकरिता 
for Donation
G pay 8108658970 

संपादक: सुबोध शाक्यरत्न  
M : 8108658970

Email- pr.janata@gmail.com