Top Post Ad

ठाणे महापालिकेकडून सिंगल यूज प्लास्टिकविरोधात कारवाई

  ठाणे महानगरपालिका क्षेत्रात सिंगल यूज प्लास्टिक (SUP) बंदीची प्रभावी अंमलबजावणी करण्यासाठी प्रदूषण नियंत्रण विभागाकडून विशेष मोहीम राबविण्यात आली. दिनांक 01 एप्रिल 2026 ते 15 मे 2026 या कालावधीत प्रभाग समिती निहाय घनकचरा व्यवस्थापन विभाग, अतिक्रमण विभाग व प्रदूषण नियंत्रण विभागामार्फत संयुक्तरित्या करण्यात आलेल्या कारवाईत 79 किलो प्लास्टिक जप्त करुन रुपये 80,500 इतकी दंडात्मक कारवाई करण्यात आली.           या मोहिमेदरम्यान एकूण 157 आस्थापनांची तपासणी करण्यात आली असून सुमारे 79 किलो प्लास्टिक जप्त करण्यात आले. तसेच नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर रु. 80,500 इतकी  दंडात्मक कारवाई करण्यात आल्याचे मुख्य पर्यावरण अधिकारी मनिषा प्रधान यांनी नमूद केले.

      याशिवाय, हवा प्रदूषण नियंत्रण मार्गदर्शक सूचनांच्या अनुषंगाने स्वच्छ दक्षता समितीमार्फत 21 मे रोजी विविध बांधकाम स्थळांची पाहणी करण्यात आली. तसेच कळवा प्रभाग समिती क्षेत्रातील हायवे लगत टाकण्यात आलेल्या राडारोड्याचीही तपासणी करण्यात आली असून संबंधित उपाययोजना सुचविण्यात आल्याचे प्रशासनाकडून सांगण्यात आले.           एकल वापर प्लास्ट‍िक बंदी मोहिमेची प्रभावी अंमलबजवणीच्या अनुषंगाने  केंद्रीय व महाराष्ट्र प्रदुषण नियंत्रण मंडळाने दर महिन्यालाअंमलबजावणी मोहिम राबविण्याचे निर्देश स्थानिक स्वराज्य संस्थांना दिले आहेत. तसेच तपासणीची संवेदनशीलता लक्षात घेवून, अनुचित घटना टाळण्यासाठी तपासणी पथकाला पोलीस संरक्षणासह सर्व प्रशासकीय मदतीचा समावेश करण्याची देखील सूचना केली आहे. 

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

 READ / SHARE  / FORWARD 
JANATA  NEWS  xPRESS

निरंतर सेवेच्या आर्थिक मदतीकरिता 
for Donation
G pay 8108658970 

संपादक: सुबोध शाक्यरत्न  
M : 8108658970

Email- pr.janata@gmail.com