Top Post Ad

मुंबई महानगरपालिकेत जन्म प्रमाणपत्र घोटाळा

 मुबई महानगरपालिकेत मोठ्या प्रमाणात जन्म प्रमाणपत्र घोटाळा झाला असून गेले काही महिने त्याचा पाठपुरावा य कारवाई सुरू आहे. महानगरपालिकेच्या सर्व 26 वॉर्डातून बेकायदेशीररित्या बंद झालेल्या SAP प्रणालीच्या अंतर्गत 87,347 जन्म प्रमाणपत्र देण्यात आले.  वर्ष 2024 व वर्ष 2025 मध्ये एका बाजूला SAP प्रणालीच्या अंतर्गत जन्म नोंदी, सुधारण्याच्या नावाने नवीन जन्म प्रमाणपत्र देण्यात येत होते, त्याच वेळेला नवीन CRS पोर्टलच्या अंतर्गत 33,772 नोंदी ही करण्यात आल्या. एकाच वेळेला जुनी बंद पडलेली SAP प्रणाली तसेच नवीन CRS पोर्टलच्या अंतर्गत नोंदी म्हणजे हा एक मोठा घोटाळा आरोग्य विभागाच्या अधिकाऱ्यांच्या संगनमताने केला आहे. 

राज्य सरकारने जन्म नोंद / प्रमाणपत्र संदर्भात वर्ष 2025 मध्ये 3 GR/ SOP/ परिपत्रक काढले. 12 मार्च 2025 सार्वजनिक आरोग्य विभागाने SOP जारी केली. 16 सप्टेंबर, महाराष्ट्र आरोग्य मंत्रालयाने जन्म नोंदी संदर्भात आरोग्य अधिकारी / निबंधकांसाठी GR जारी केला. 1 डिसेंबर 2025 रोजी गृह मंत्रालयाने अर्जदार/ लाभार्थी यांनी अर्ज करताना शासनाची फसवणूक करण्यासंबंधी गुन्हा/ FIR दाखल करण्यासंदर्भात निर्देश दिले. मुंबई महानगरपालिकेचा आरोग्य विभाग, जन्म-मृत्यू नोंद अधिकाऱ्याने जाणून बुजून भ्रष्ट पद्धतीने या तिन्ही परिपत्रकांकडे पूर्णपणे दुर्लक्ष केले किंबहुना हे माहीत असताना बेकायदेशीररित्या जन्म प्रमाणपत्र देण्यात आले.

 "सुधारणाच्या" नावाने या 87,347 नोंद / प्रमाणपत्र देण्यात आले. त्याचा थोडासा अभ्यास/ सर्वे करताना असे लक्षात येते की, सुधारण्याच्या नावाने मोठ्या प्रमाणात फेरबदल करून जन्म प्रमाणपत्र देण्यात आले. एकदा जन्म नोंद झाल्यानंतर, जन्म प्रमाणपत्र दिल्यानंतर, पुढच्या काही दिवसात त्यात Spelling Correction म्हणजे "i, o, e", रस्व-दीर्घ संबंधित बदल करता येतो. मोठ्या प्रमाणात कोणत्याही प्रकारची सुधारणा, बदल करता येत नाही. कायद्यात हे स्पष्टरित्या सांगण्यात आले आहे याची जाणीव या सर्व वरिष्ठ अधिकाऱ्यांना होती.. या घोटाळ्यात मुंबई महानगरपालिकेचे DHO (Deputy Health Officer) तसेच कार्यकारी आरोग्य अधिकारी (EHO) यांचा मोठ्या प्रमाणात सहभाग / समर्थन आहे, होते.

महापालिकेने हे सर्व जन्मप्रमाणपत्र ताबडतोब रद्द करायला हवे आणि या लाभार्थीकडून ते जन्म प्रमाणपत्र परत घेण्याची जबाबदारी ही महापालिकेची आहे.. हा एक मोठा घोटाळा असून त्यात लाभार्थी, एजंट व महापालिकेचे अधिकारी हे संगनमताने, एकत्रितरित्या सामील झालेले आहेत.. हे जन्मप्रमाणपत्र ताबडतोब रद्द करून त्याची माहिती पासपोर्ट विभाग तसेच केंद्र व राज्य सरकारचे अन्य Investigation Agency ला द्यायला हवी.. महापालिकेचे बहुतांश आरोग्य अधिकारी/ रजिस्ट्रार या पोटाळ्यात सामील असून त्या सगळ्यांची ताबडतोब बदली करायला हवी.. यातील जे मोठे घोटाळेबाज आहेत त्यांना ताबडतोब निलंबित करायला हवे.

 महापालिकेच्या लक्षात हा घोटाळा आल्यानंतरही महापालिकेने अजूनपर्यंत पोलिसांत तक्रार केली नाही ही आश्चर्याची बाब आहे, खेदाची बाब आहे.. महापालिकेचे मुख्य कार्यालय परिसरातील पोलीस स्टेशन म्हणजे आझाद मैदान पोलीस स्टेशनमध्ये ताबडतोब महापालिकेने तक्रार करून गुन्हा नोंदवायला हवा, FIR दाखल करायला हवी. आझाद मैदान पोलीस स्टेशन येथे मी स्वतः 2 मे रोजी तक्रार दाखल केली आहे. या घोटाळ्याची संपूर्ण माहिती मंत्रालय, मुख्यमंत्री कार्यालय तसेच नॅशनल रजिस्ट्रार यांना महापालिका आयुक्तानी कळवायला हवी,. महापालिका आयुक्त किंवा अतिरिक्त महापालिका आयुक्त यांनी ताबडतोब पोलीस आयुक्तांची भेट घेऊन या घोटाळ्यासंबंधी कठोर कारवाई करण्यासाठी सांगायला हवे.. यापूर्वी जन्म प्रमाणपत्र घोटाळ्यासंबंधात ज्या काही FIR झाल्या आहेत, त्यात कोणत्याही प्रकारची पुढची चौकशी. पाठपुरावा, कारवाई महापालिकेने केली नाही, पोलिसांनीही केलेली नाही.

 हे सर्व 87,347 अर्जासाठी आलेले प्रत्येक अर्ज व त्याच्या सोबतचे पुरावे याचे एक्सपर्ट/ प्रोफेशनल व्यक्ती किंवा संस्था करून अभ्यास करायला हवा आणि कारवाई करायला हवी. हा एक मोठा घोटाळा असून यातले काही अर्ज आम्ही तपासलेले असताना बांगलादेशी / घुसखोर/ अपात्र लोकांना अशा पद्धतीने जन्म प्रमाणपत्र देण्यात आल्याचे दिसत आहे. देशाच्या सुरक्षेसाठी हे एक मोठे आव्हान आहे.. मुंबई महापालिकेचे उपनिबंधक, निबंधक, आरोग्य अधिकारी या बांगलादेशींना बेकायदेशीररित्या भारतीयत्व प्रदान करीत आहेत ही खूप मोठी गंभीर बाब आहे. मुंबई महापालिकेने दिलेले सगळे जन्मनोंद/ प्रमाणपत्र, सुधारणा या सर्व बाबींचा तसेच SAP वर अपलोड करणे, CRS पोर्टल वर जुन्या नोंदींच्या अंतर्गत अपलोड करणे या सगळ्या बाबीचे Special Audit करायला हवे.

या घोटाळ्याच्या चौकशीसाठी स्पेशल विशेष तपास पथकाची (Special Investigation Team) रचना करायला हवी त्यात 1. मुंबई महापालिका अतिरिक्त आयुक्त (उपायुक्त आरोग्य) ii. महापालिका दक्षता (vigilance) विभागाचे अधिकारी iii. मुंबई पोलीस अतिरिक्त आयुक्त (गुन्हे) iv. महाराष्ट्र सरकारचे निबंधक, अधिकाऱ्यांचा समावेश असावाः

डॉ. किरीट सोमैया

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

 READ / SHARE  / FORWARD 
JANATA  NEWS  xPRESS

निरंतर सेवेच्या आर्थिक मदतीकरिता 
for Donation
G pay 8108658970 

संपादक: सुबोध शाक्यरत्न  
M : 8108658970

Email- pr.janata@gmail.com