कामगार दिनाच्या पूर्वसंध्येला कळवा येथील छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालय येथे वर्षानुवर्षे काम करणाऱ्या कंत्राटी कामगारांचा केस मध्ये माननीय मुंबई उच्च न्यायालयाने समान काम समान वेतनाबाबत महत्त्वपूर्ण निर्णय दिला. त्याबाबत कर्मचाऱ्यांनी मुन्सिपल लेबर युनियन कार्याध्यक्ष मोहन तिवारी यांचे अभिनंदन केले त्या प्रसंगी सरचिटणीस श्री चेतन आंबोणकर उपाध्यक्ष बीरपाल भाल कोषाध्यक्ष विजय खानविलकर,चिटणीस संदीप बनसोड, हेमंत रोकडे सुमित्रा ताम्हाणे मंगल तोरणे सिंधू तिडोले नंदा मगर अनिता माळी आणि शेकडो कर्मचारी उपस्थित होते.
सन 2007 पासून माननीय लेबर कोर्ट माननीय उच्च न्यायालय माननीय सर्वोच्च न्यायालय येथे जिकिरीची लढाई करून व संघर्ष करून अखेर माननीय उच्च न्यायालयाकडून न्याय मिळाल्याबद्दल विजय उत्सव साजरा करताना छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालय येथील कंत्राटी कर्मचाऱ्यांनी म्युनिसिपल लेबर युनियनचे अध्यक्ष रवी राव , कार्यध्यक्ष मोहन तिवारी यांचे व इतर सर्व पदाधिकाऱ्यांचे पदाधिकाऱ्यांचे आभार मानले.त्या प्रसंगी मोहन तिवारी यांनी उर्वरित सर्व ठेकेदारीत काम करणाऱ्या कामगारांना हाच न्याय मिळवून देणार असल्याचे आश्वासन दिले आहे.मी उपाध्यक्ष असलेल्या *महाराष्ट्र राज्य नगरपालिका नगरपंचायती महानगरपालिका कामगार कर्मचारी संघटना* *फेडरेशनची बैठक घेवून हा निर्णय संपुर्ण महाराष्ट्रात लागू करण्याचे प्रयत्न करणार असल्याचे मोहन तिवारी यांनी सांगितले.

0 टिप्पण्या