Top Post Ad

लोकनेते अजित पवार यांच्या मृत्यूची सखोल चौकशी करून संशयितांची ब्रेन मॅपिंग व 'नार्को टेस्ट' करण्याची मागणी

राज्याचे लाडके नेते अजितदादा पवार यांचे निधन हा केवळ एक अपघात नसून, त्यामागे एक मोठा नियोजित कट (घातपात) असण्याची दाट शक्यता निर्माण झाली आहे. मृत्यूच्या आदल्या रात्री २ वाजेपर्यंत प्रफुल पटेल, सुनील तटकरे आणि नरेश अरोरा यांची अजित दादांसोबत बैठक सुरू होती. प्राथमिक माहितीत ही बैठक शेतकरी प्रश्नावर असल्याचे सांगितले गेले, मात्र तपासात असे समोर येत आहे की, नरेश अरोरा यांच्या संस्थेला करोडो रुपयांचे कंत्राट मिळवून देण्यासाठी दादांवर दबाव टाकला जात होता. सदर बैठकीत वाद झाल्यानंतर दादांनी बारामतीला मोटारीने जाणे निश्चित केले होते. असे असताना ऐनवेळी प्रफुल पटेल यांनी विमानाचा दौरा का निश्चित केला? हा बदल संशयास्पद आहे. सीबीआय नागपूर यांच्याकडे  वारंवार पाठपुरावा केला 6 May 2026 at 16:31 आहे. काही विशिष्ट आर्थिक हितसंबंधांमुळे दादांचा बळी घेतला गेल्याचा संशय,  ज्या लोकांनी दादांच्या काळात त्यांच्यावर दबाव आणला, तेच लोक आज सत्तेच्या जवळ वावरत आहेत. यामुळे भविष्यात सरकार आणि कुटुंबाचाही विश्वासघात होऊ शकतो.

या प्रकरणात प्रत्यक्ष-अप्रत्यक्ष सहभागी असलेले प्रफुल पटेल, सुनील तटकरे आणि नरेश अरोरा यांची तातडीने 'ब्रेन मॅपिंग' आणि 'नार्को टेस्ट' करण्यात यावी.  या प्रकरणाची उच्चस्तरीय चौकशी करून अहवाल सार्वजनिक करावा.  अजित दादांवर प्रेम करणाऱ्या महाराष्ट्रातील तमाम जनतेला सत्य जाणून घेण्याचा अधिकार आहे. तरी याची गंभीर दखल घेऊन त्वरित कारवाईचे आदेश द्यावेत अशी मागणी  बिगर सातबारा शेतकरी संघटनेचे  प्रणेते  भाई जगदीश कुमार इंगळे  यांनी महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांकडे पत्राद्वारे केली आहे.  तसेच सदर प्रकरणात तात्काळ योग्य पध्दतीने न्याय न मिळाल्यास दिनांक १० मे  पासून आझाद मैदान, मुंबई येथे बेमुदत धरणे आंदोलन करण्यात येईल असा इशाराही इंगळे यांनी दिला आहे. 

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

 READ / SHARE  / FORWARD 
JANATA  NEWS  xPRESS

निरंतर सेवेच्या आर्थिक मदतीकरिता 
for Donation
G pay 8108658970 

संपादक: सुबोध शाक्यरत्न  
M : 8108658970

Email- pr.janata@gmail.com