नाशिकच्या TCS प्रकरणातील एफआयआर अद्याप सार्वजनिक केलेला नाही तो सार्वजनिक करावा. कायद्याने त्यांचे काम करावे पण या प्रकरणाच्या माध्यमातून धार्मिक धृवीकरण करण्याचा खेळ भारतीय जनता पक्ष करत असल्याचा आरोप गांधी भवन येथे प्रसार माध्यमांशी बोलताना काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी केला. निदा खानला अटक केल्याच्या प्रश्नावर ते म्हणाले एवढे दिवस पोलीस झोपा काढत होते का, याचे उत्तर द्यावे. या प्रकरणाला हवा देण्यात सरकारचा काही हात आहे का, हे उघड झाले पाहिजे. मी मारल्यासारखे करतो तू रडल्यासारखे करतो हा तमाशा बंद करा, असे खडेबोल सपकाळ यांनी सत्ताधाऱ्यांना सुनावले. तसेच राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते विकास लवंडे यांच्यावरील शाईहल्ला, धक्काबुक्की व शिवीगाळ हा भ्याड हल्ला असून हल्लेखोर वारकरी संप्रदायाच्या विचाराला माननारे नाहीत. या प्रकरणाला भाजपाची चिथावणी असून अशा हल्लेखोरांना भाजपा सरकार संरक्षण देत आले आहे. विकास लवंडे यांच्यावरील हल्ला हा वारकरी संप्रदायाचा अपमान आहे, या हल्लेखोरांवर कठोर कारवाई करा, अशी मागणीही सपकाळ यांनी केली आहे.
विकास लवांडे यांच्यावरील हल्ल्याचा काँग्रेस पक्ष तीव्र शब्दात निषेध करत आहे. विकास लवांडे हे वारकरी संप्रदायाचा समता, बुंधता व सामाजिक न्यायाचा विचार पुढे घेऊन जाणारे आहेत. वारकरी संप्रदायात मनुवादी विचार वाढत आहे, ही चिंता त्यांनी व्यक्त केली होती, ती या हल्ल्याने खरी करून दाखवली आहे. मूठभर लोकांच्या हाती धर्मसत्ता व राजसत्ता असावी या विचाराचा मोठा फटका छत्रपती शिवाजी महाराज, शाहू महाराज, महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर व अनेक साधू संतांनाही बसला आहे. संत तुकाराम महाराजांच्या गाथा बुडवणारे, संत ज्ञानेश्वर यांना छळणारे, सावित्रिबाई फुले यांना छळणारा विचार हाच आहे. या मनुवादी विचाराला कंटाळून गौतम बुद्धांनी बौद्ध धर्माची स्थापना केली, महाविरांनी जैन धर्माची स्थापना केली,हीच परंपरा महात्मा बसवेश्वर पुढे घेऊन गेले. हा मनुवादी विचार भाजपा व RSSचा आहे, याच विचाराने दाभोळकर, पानसरे, कलबुर्गी यांनाही छळले असल्याचे स्पष्ट मत सपकाळ यांनी व्यक्त केले.
विधान परिषद निवडणुकीत बिनविरोध निवडून आलेले महाविकास आघाडीचे उमेदवार, शिवसेना नेते अंबादास दानवे आणि आमदार मिलिंद नार्वेकर यांनी आज गांधी भवन येथे भेट घेऊन काँग्रेस पक्षाने दिलेल्या पाठिंब्याबद्दल आभार मानले. यावेळी महाविकास आघाडीच्या आगामी काळातील राजकीय वाटचालीबाबत सविस्तर आणि सकारात्मक चर्चा झाली. राज्यातील लोकविरोधी तसेच संविधान आणि लोकशाहीविरोधी भाजप-महायुती सरकारच्या धोरणांविरोधात महाविकास आघाडी एकजुटीने आणि खंबीरपणे संघर्ष करत राहील, असा निर्धार यावेळी व्यक्त करण्यात आला. यावेळी प्रदेश काँग्रेसचे सरचिटणीस अभिजीत सपकाळ उपस्थित होते.
देशात इंधन आणि LPG गॅसचा मोठा तुटवडा निर्माण झाला आहे, महागाईने सर्वसामान्यांचे कंबरडे मोडले आहे, अर्थव्यवस्था डबघाईला आली आहे… आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी अजूनही फक्त इव्हेंटबाजी, फोटोशूट आणि प्रचारसभांमध्ये व्यस्त आहेत !निवडणुका जिंकण्यासाठी देशाच्या अर्थव्यवस्थेची अक्षरशः राख केली आणि आता जनतेलाच उपदेश देत आहेत —• पेट्रोल-डिझेल घेऊ नका • सोने खरेदी करू नका • खत कमी वापरा • खाद्यतेल कमी वापरा म्हणजे सगळा त्याग सामान्य जनतेने करायचा आणि मोदी फक्त कॅमेऱ्यासमोर भाषणं देत फिरणार? जेव्हा जगातील इतर देश संभाव्य संकटासाठी नियोजन आणि तयारी करत होते, तेव्हा मोदी आणि भाजप फक्त निवडणुका, जाहिराती, धर्मांधता आणि द्वेषाचे राजकारण करण्यात मग्न होते. राहुल गांधी सतत इशारे देत होते, पण सत्तेच्या अहंकारात बुडालेल्या मोदी सरकारने देशाला थेट संकटाच्या खाईत ढकलले. कोविड काळात लोक ऑक्सिजनअभावी मरत होते आणि हे टाळ्या-थाळ्या वाजवण्याचे कार्यक्रम करत होते. आज अर्थव्यवस्था कोसळत असताना जनतेला काटकसर शिकवली जात आहे! मोदींच्या निष्काळजीपणाची, अहंकारी कारभाराची आणि फसव्या प्रचारराजकारणाची किंमत आज देशातील प्रत्येक सामान्य नागरिक भरतो आहे.देशाला दूरदृष्टी असलेला नेता हवा होता, पण देशाच्या माथी फक्त एक ‘इव्हेंट मॅनेजर’ मारला गेला!... हर्षवर्धन सपकाळ

0 टिप्पण्या