Top Post Ad

पर्यावरण संवर्धन ही केवळ एक मोहीम नसून भावी पिढ्यांच्या सुरक्षित भविष्यासाठीची सामाजिक जबाबदारी- अशोक एन. जे.

जागतिक पर्यावरण दिनानिमित्त अनेक पर्यावरणवादी संघटनांनी पर्यावरण बचाव कार्यक्रम राबवले. ठाण्यातील इको फ्रेंडली लाईफ केंद्रांमध्ये देखील पर्यावरण दिन उत्साहात साजरा करण्यात आला. इको फ्रेंडली लाईफ संस्थेचे अशोक एन. जे. यांच्या मार्गदर्शनाखाली  पर्यावरण संवर्धन, युवक जागृती आणि सामाजिक परिवर्तन यांचा संगम घडवून आणणाऱया या कार्यक्रमाला विविध स्तरांतील नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला.  ठाणे इको फ्रेंडली लाईफ संस्थेच्या वतीने  आयोजित युवा क्रांती बीज कार्यक्रम विशेष आकर्षणाचा केंद्रबिंदू ठरला. या कार्यक्रमास परिसरातील युवक, महिला व बालमित्र मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे म्हणून  शिवश्री आनंदराव साबळे, अध्यक्ष, मुंबई संभाजी ब्रिगेड, शिवश्री किशोर बनकर  हे उपस्थित होते. त्यांनी पर्यावरण संरक्षण ही काळाची गरज असल्याचे सांगत युवकांनी समाजहिताच्या उपक्रमांमध्ये सक्रिय सहभाग घ्यावा, असे आवाहन केले. 

 कार्यक्रमाचे विशेष आकर्षण ठरले ते शक्तिस्थळ संकल्पनेचे प्रात्यक्षिक सादरीकरण. स्थानिक कृती आणि जागतिक दृष्टीकोन यांचा संगम साधणाऱया या सादरीकरणातून पर्यावरण संरक्षण, स्वावलंबन, कुटुंबव्यवस्था आणि सामाजिक एकात्मतेचे महत्त्व प्रभावीपणे मांडण्यात आले. उपस्थितांनी या संकल्पनेचे स्वागत करत ती व्यापक स्तरावर पोहोचविण्याचा निर्धार व्यक्त केला.  

अशोक एन. जे. यांनी आपल्या छोटेखानी मार्गदर्शनात पर्यावरण संवर्धन ही केवळ एक मोहीम नसून भावी पिढ्यांच्या सुरक्षित भविष्यासाठीची सामाजिक जबाबदारी असल्याचे सांगितले. त्यांनी `एक कुटुंब  एक शक्तिस्थळ' ही संकल्पना देशभर रुजविण्याचे आवाहन करत पर्यावरण, संस्कार आणि सामाजिक एकात्मता यांचा पाया मजबूत करण्याची गरज व्यक्त केली. जागतिक स्तरावरील वृक्ष लागवड आणि संवर्धन साठी शक्तिस्थळ निर्मिती प्रभावी ठरू शकते, असा विश्वास व्यक्त केला. 

यावेळी उपस्थितांना पर्यावरणपूरक जीवनशैलीचा संदेश देत आंब्यांचे वाटप करण्यात आले. तसेच पावसाळ्याच्या पार्श्वभूमीवर छत्र्यांचे वितरण करून सामाजिक बांधिलकीचा आदर्शही जपण्यात आला.  तसेच  दहावीच्या परिक्षेत गुणवत्तायादीत अव्वल आलेल्या प्रज्योत  गायकवाड -92टक्के,  राज बागुल-82 टक्के या विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला. योग्य नियोजन, समन्वय आणि सक्रिय सहभागामुळे कार्यक्रम यशस्वीरीत्या पार पडला. 

---------------------------- 

जल, जमीन, जंगल बचाव मोहीम अंतर्गत स्थानिक पर्यावरणप्रेमी, इको फ्रेंडली लाईफ आणि संभाजी ब्रिगेड या संस्था आणि संघटनांनी विविध एकत्र येत वन विभागाच्या जागेवर बिल्डरांच्या घुसखोरीच्या प्रयत्नांना विरोध दर्शवला. सहभागी संस्था व संघटना  इको फ्रेsढन्डली लाईफ संस्था,  ठाणे जिह्यातील विविध पर्यावरणवादी एनजीओ तसेच नागरिक  चितळसर, मानपाडा, येवूर, संजय गांधी उद्यान आणि नॅशनल पार्क या संवेदनशील भागातील हिरवळ व जंगल वाचवण्यासाठी मोठ्या संख्येने लोक एकत्र आले. या मोहिमेद्वारे वन विभागाच्या भूमीचे संरक्षण करताना, बिल्डरांच्या अनधिकृत घुसखोरीला रोखण्याचा ठाम संदेश देण्यात आला.  इको अॅक्टिविस्ट्स म्हणतात,   आम्ही केवळ विरोध करत नाही, तर पुढील पिढीसाठी हिरवी ठाणे ठेवण्यासाठी लढतो आहोत. ही मोहीम शांततापूर्ण पद्धतीने पार पडली आणि स्थानिक रहिवाशांमध्ये मोठा उत्साह निर्माण झाला. अशा प्रयत्नांमुळे ठाणे आणि मुंबईच्या आसपासच्या जंगलक्षेत्रांना नवीन आशा निर्माण झाली आहे.  



टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

 READ / SHARE  / FORWARD 
JANATA  NEWS  xPRESS

निरंतर सेवेच्या आर्थिक मदतीकरिता 
for Donation
G pay 8108658970 

संपादक: सुबोध शाक्यरत्न  
M : 8108658970

Email- pr.janata@gmail.com