Top Post Ad

मल्लखांब लव च्या संकल्पनेतून मराठी कलावंतांसह आंतरराष्ट्रीय मल्लखांब दिन साजरा होणार

. मल्लखांब लव संघाचे प्रमुख आशिष देवल व संचिता देवल यांच्या संकल्पनेतून व बीमानगर एज्युकेशन सोसायटी, बोरीवली यांच्या संयुक्त विद्यमाने  आणि संजय दळवी यांच्या मार्गदर्शनाखाली यावर्षी नावीन्यपूर्ण पद्धतीने १५ जून  रोजी आंतरराष्ट्रीय मल्लखांब दिन साजरा करण्यात येणार आहे. मल्लखांब या महाराष्ट्राच्या मातीतील अस्सल मराठमोळ्या खेळाला पाठिंबा देण्यासाठी व खेळाचा अनुभव घेण्यासाठी महाराष्ट्राच्या मनावर अधिराज्य गाजवणारे मराठी कलावंत एकत्रित येणार आहेत व मल्लखांब खेळाचा आनंद लुटणार आहेत. 

दिनांक १५ जून रोजी दुपारी ४ ते रात्री ८ या‌ वेळेमध्ये बीमानगर एज्युकेशन सोसायटी, शांती आश्रम बस डेपो समोर, बोरीवली पश्चिम येथे मल्लखांब कार्यशाळा आयोजित करण्यात आली आहे. मल्लखांब या खेळाला राज्य मान्यता मिळावी व राजकीय/ शासकीय पातळीवर सहकार्य मिळावे यासाठी आवाहन या उपक्रमाच्या माध्यमातून करण्यात येणार आहे.

राजकीय, सामाजिक, कला, क्रीडा क्षेत्रातील मान्यवर उपस्थित राहून सहभागी कलाकारांचा सन्मान व राष्ट्रीय खेळाडूंचा गौरव करणार आहेत. यासाठी खास माजी राज्यमंत्री अविनाश महातेकर आणि रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया व सीमा शिंदे नगरसेवीका या प्रसंगी बोलताना मल्लखांब या खेळाला राज्य खेळाचा दर्जा द्या असे त्यानी राज्य सरकारला कडे मागणी केली आहे

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

 READ / SHARE  / FORWARD 
JANATA  NEWS  xPRESS

निरंतर सेवेच्या आर्थिक मदतीकरिता 
for Donation
G pay 8108658970 

संपादक: सुबोध शाक्यरत्न  
M : 8108658970

Email- pr.janata@gmail.com