Top Post Ad

बुद्धभूमी फाउंडेशन प्रकरणी शासकीय अन्यायाविरुद्ध १५ जूनपासून अनिश्चितकालीन धरणे आंदोलन

मागील अनेक दशकांपासून आजतागायत ताबा व कब्जा-वहिवाटीने मालकी असलेल्या मौजे चिकणघर, ता. कल्याण, जि. ठाणे येथील मिळकतीवर बुद्धभूमी फाउंडेशन व विश्वस्त परिवाराचा दीर्घकालीन स्थिरताबा, कब्जा व वहिवाट आहे. तसेच सन १९८०-८१ पासून कागदोपत्री सदर कब्जा वहिवाटीची नोंद बुद्धभूमी फाउंडेशन व विश्वस्तांचा नावे न्यायालयीन आदेश, राज्य मागासवर्गीय आयोगाचे आदेश, भूमी अभिलेख आदेश, महानगरपालिका नोंदी, प्रांत कार्यालयाच्या नोंदी, तहसिलदार नोंदी, मंडळ अधिकारी नोंदी, तलाठी नोंदी, महापूर नोंदी, पोलीस नोंदी, मध्य रेल्वे नोंदी, वृत्तपत्र नोंदी इत्यादी उपलब्ध आहे. परंतु शासन-प्रशासन व लोकप्रतिनिधी यांनी सातत्याने जातीय व धार्मिक द्वेषाने प्रेरित होऊन बुद्धभूमी व बौद्ध समाजावर सातत्याने अन्याय करीत आहे. याचा जाहीर निषेध तसेच बुद्धभूमी फाउंडेशनघ्या न्याय हक्कासाठी दिनांक  १५ जूनपासून अनिश्चितकालीन धरणे आंदोलन करण्यात येणार असल्याचे बुद्धभूमी फाउंडेशनचे मुख्य विश्वस्त भंते गौतम रत्न थेरो यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे कळविले आहे.

३० मे  रोजी बुद्धभूमी फाउंडेशनच्या धार्मिक, सामाजिक बाब विचारात घेऊन सर्व मानवाच्या सर्वांगीण कल्याण व हितासाठी महाराष्ट्र शासन, सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभाग, मंत्रालय यांच्याकडील इतिवृत्त नस्ति क्रमांक: बैठक-२०२६/प्र.क्र.७९/बांधकामे, दिनांक : ११/०६/२०२६ नुसार खालील मागण्या मान्य करून आम्हा बौद्ध व सर्वसाधारण जनतेला न्याय द्यावा-

१) i. दिनांक ३० मे २०२६ रोजी लाठी व बंदुकीच्या धाकावर बौद्ध धम्मगुरू व भिक्खू संघाला मारहाण करून भगवान गौतम बुद्धांच्या मूर्तीची विटंबना व बेकायदेशीररीत्या हटविणे, बौद्ध स्तूप तसेच भीमा कोरेगाव विजयस्तंभाच्या प्रतिकृतीचा बुलडोझरच्या साहाय्याने विध्वंस करणे आणि ४२ झाडांची निर्दयपणे कत्तल करणे या प्रकारांप्रकरणी क.डों.म.पा. आयुक्त अभिनव गोयल, उपायुक्त प्रसाद बोरकर आणि सहाय्यक आयुक्त सविता हिले यांच्याविरुद्ध गुन्हा नोंदवून त्यांना तात्काळ निलंबित करावे.

ii. सदर बेकायदेशीर कारवाईत सहभागी असलेल्या सुमारे ६० ते ७० व्यक्तींना ड्रोन चित्रफीत व इतर छायाचित्रांच्या आधारे ओळख पटवून त्यांच्याविरुद्ध गुन्हा नोंदवावा तसेच संबंधित आरोपींना तात्काळ अटक करावी. 

२) "विठ्ठलवाडी स्मशानभूमी ते प्रेम ऑटो सर्कल दरम्यानचा वालधुनी नदी समांतर उड्डाणपूल प्रकल्प" बुद्धभूमी परिक्षेत्रातून वालधुनी नदीलगत घेण्यात यावा. सदर उड्डाणपूलासाठी बाधित होणारे क्षेत्र व इमल्याबाबत भूसंपादन कायदा, २०१३ अन्वये बुद्धभूमी फाउंडेशनला कायदेशीर व योग्य नुकसानभरपाई देण्यात यावी.

३) सर्व मानवजातीच्या व्यापक हित व कल्याणासाठी सदर क्षेत्राचा सर्वांगीण विकास व्हावा या उद्देशाने वरील सर्व्हे क्रमांकाचे मिळकतीवर नव्याने आरक्षण निर्धारित करून प्रारूप आराखड्यामध्ये सार्वजनिक हितासाठी भव्य महा बुद्धविहार, सुसज्ज विपश्यना केंद्र, डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्कूल व कॉलेज, विद्यार्थी शिक्षण केंद्र व वस्तीगृह, हॉस्पिटल, जागतिक पर्यटनाच्या दृष्टीने ५० मीटर उंचीची भव्य बुद्धमूर्ती, महाबोधि महाविहाराची प्रतिकृती, लोककल्याणकारी विविध उपक्रम राबविण्यासाठी भगवान गौतम बुद्धांच्या बत्तीस महापुरुष लक्षणांना अनुसरून ३२ मजली बहुउद्देशीय “बुद्ध भवन” इत्यादी प्रकल्पांचा समावेश करून “बुद्धभूमी आंतरराष्ट्रीय बौद्ध पर्यटन केंद्र” या शीर्षकांतर्गत विकास आराखडा तयार करून मंजूर करण्यात यावा. 

४) रेल्वेच्या तिसऱ्या मार्गासाठी बाधित झाली असून, सदर ०-२९-८० (हे.आर.) क्षेत्रफळाची जमीन संपादित करताना उपविभागीय अधिकारी कार्यालय, कल्याण यांच्या मार्फत मोबदला रक्कम भारतीय स्टेट बँकेच्या धनादेश क्र. ८२१४५०, दि. ०३/११/२०२३ अन्वये कल्याण-डोंबिवली महानगरपालिकेच्या बँक ऑफ बडोदा येथील खाते क्र. ९९१४०२०००००१३३ मध्ये आर.टी.जी.एस. प्रणालीद्वारे जमा करण्यात आलेली आहे. रेल्वे बोर्डाने तिसऱ्या मार्गासाठी महानगरपालिकेकडे जमा केलेली भूसंपादनाची नुकसानभरपाई व मोबदला रक्कम बुद्धभूमी फाउंडेशनच्या बचत खात्यात जमा करावी.

५) i. सदर उड्डाणपुलाला "बुद्धभूमी उड्डाणपूल" नामकरण करणे. 

ii. वालधुनी ब्रिज जवळ सांची स्तूप प्रमाणे भव्य "धम्म प्रवेशद्वार" बांधून उड्डाणपूलाखालील क्षेत्राच्या वापर बुद्धभूमी फाउंडेशन कडेच वर्ग करणे, कारण पुढे कल्याण-शहाड रेल्वेमार्ग असल्यामुळे सदर ठिकाणी डेड एन्ड स्थिती असून, सार्वजनिक रहदारीचा विषय संपुष्टात येत आहे. 

६) बोगस / अपात्र इसमांना T.D.R. देऊन, त्रयस्थ व्यक्तींकडून बेकायदेशीररीत्या तयार करण्यात आलेल्या सातबारा नोंदींमधून क.डों.मा.पा. व इतर इसमांच्या नावांची असलेली खोटे नोंद कमी करून त्या ऐवजी सदर जमीनीवर बुद्धभूमीची निरन्तरपणे ताबा व वापर असल्याने ७/१२ अभिलेखात बुद्धभूमी फाउंडेशनच्या नावाची नोंद करण्यात यावी. तसेच सदर बेकायदेशीर T.D.R. प्रकरणात शामिल असलेले सर्व महापालिका अधिकारी व भूमाफिया यांच्यावर गुन्हा दाखल करून कायदेशीर कार्यवाही करावे. 

७) राज्याचे समाजकल्याण मंत्री मा. ना. श्री संजय शिरसाट यांच्या अजिंक्यतारा शासकीय निवासस्थानी दिनांक १०/०६/२०२६ रोजी संपन्न झालेल्या बैठकीत बुद्धभूमी फाउंडेशन व शासन यांच्यात झालेल्या प्राथमिक व संयुक्त चर्चेत विषय आल्याप्रमाणे व मा.मंत्री महोदय यांनी आश्वासन दिल्याप्रमाणे "बुद्धभूमी आंतरराष्ट्रीय बौद्ध पर्यटन स्थळ" विकसित करण्यासाठी ₹१,००० कोटी निधीची अधिसूचना पारित करून, बुद्धभूमी व बुद्धभूमीच्या निष्ठावान सदस्यांच्या मान्यतेने पुढील प्रक्रिया करण्यात यावा. 

८) बुद्धभूमीवर होत असलेले सततचे अन्याय, दडपशाही तसेच दिनांक ३० मे २०२६ रोजी तथागत भगवान गौतम बुद्धांच्या मूर्तींचे बेकायदेशीर निष्कासन व विटंबना, बौद्ध स्तूप आणि भीमा कोरेगाव विजयस्तंभाच्या प्रतिकृतीची बुलडोझरने तोडफोड तसेच बेकायदेशीर वृक्षतोड (४२ झाडे) बद्दल खासदार मा. डॉ. श्रीकांत शिंदे यांनी अशा जबाबदार पदावर राहण्याच्या नैतिक अधिकार नसून त्यांनी देशातील तमाम बौद्ध अनुयायांची जाहीर माफी मागून आपल्या खासदारकीचा राजीनामा द्यावा.

९) प्रस्थापित नेते, पुढारी, सरकार, शासन व प्रशासन यांनी यापुढे संपूर्ण महाराष्ट्रात कोणत्याही मानवी वस्तीवर बेकायदेशीररीत्या तसेच कायद्याचा मार्ग अवलंबल्याशिवाय शोषित, पीडित, वंचित व गोरगरीबांवर अशा हुकूमशाही कारवाया करू नयेत. 

वरील मागण्या पूर्ण होत नाही तोपर्यंत भिक्खूसंघ व बौद्ध अनुयायी यांच्या वतीने कल्याण डोंबिवली महानगरपालिका मुख्यालयासमोर दिनांक १५/०६/२०२६ पासून संवैधानिक मार्गाने शांती, मैत्री, प्रेम, समता व न्यायाच्या मध्यम मार्गाने अनिश्चितकालीन धरणा प्रदर्शन करण्यासाठी आपण रीतसर परवानगी देऊन आम्हाला सर्वतोपरी सहकार्य करावे. सदर धरणा प्रदर्शन कार्यक्रमात आपण योग्य पोलीस बंदोबस्त ठेवून व्हिडिओग्राफी, फोटोग्राफी व गुप्त यंत्रणा ठेवावी, जेणेकरून जो कोणी इसम जाणून बुजून उपद्रव करतील त्यांच्यावर कठोर कायदेशीर शिक्षा करता येईल. 

Mob. 9987480392. 


Pudhe pathva...

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

 READ / SHARE  / FORWARD 
JANATA  NEWS  xPRESS

निरंतर सेवेच्या आर्थिक मदतीकरिता 
for Donation
G pay 8108658970 

संपादक: सुबोध शाक्यरत्न  
M : 8108658970

Email- pr.janata@gmail.com