कल्याण डोंबिवली महापालिका व मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाने, उड्डाणपूल बांधण्यासाठी बुद्ध भुमी फाऊंडेशन बुद्ध विहार ला लागून, उड्डाणपूल बांधण्यासाठी घाट घातला आहे, कल्याण डोंबिवली मनपाच्या व पोलिस प्रशासनाने जोर जबरदस्तीने भंते निवास, बुद्ध मुर्ती यांची तोडफोड करून, भंते यांना धक्काबुक्की केली आहे, पोलिसांची ही दादागिरी असंविधानिक व कायद्याला काळिमा फासणारी आहे, तरी पोलिस प्रशासन संबंधित ठेकेदार व मनपा विरोधात गुन्हा दाखल करण्यासाठी टाळाटाळ करत आहे, कल्याण-डोंबिवली महानगरपालिके कडून अशोक नगर, बालधूनी येथे अतिक्रमणाच्या नावावर बुद्धभूमीवरील भीमा कोरेगाव विजयस्तंभ, भगवान बुद्ध यांच्या मूर्तीची तोडफोड आणि शेकडो वृक्षांची कत्तल झाल्याचा आरोप करत बुद्धभूमी फाउंडेशनचे भन्ते गौतमरत्न महाथेरो आणि भीम अनुयायांनी एकत्र येत तीव्र संताप व्यक्त केला. या प्रकरणी बुद्ध भुमी फाऊंडेशन बुद्ध विहार, बचाव समितीच्या वतीने या प्रकरणी कायदेशीर मार्गाने आंदोलन करण्यासाठी शुक्रवार दिनांक ५ जून रोजी संध्याकाळी ६: वाजता, बुद्ध भुमी फाऊंडेशन, वालधुनी कल्याण, या ठिकाणी बैठक आयोजित करण्यात आली आहे. तरी सर्व बौद्ध संस्था, संघटना आणि कार्यकर्त्यांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे असे आवाहन करण्यात आले आहे.
कोणतीही पूर्वसूचना किंवा अधिकृत आदेश नसताना ही तोडफोड झाल्याचा आरोप स्थानिक आणि संघटनांकडून करण्यात येत आहे. या घटनेमुळे स्थानिकांमध्ये आणि बौद्ध अनुयायांमध्ये मोठा संताप व्यक्त केला जात असून, दोषींवर कारवाईची मागणी केली जात आहे या प्रकरणातील दोषींवर अनुसूचित जाती-जमाती अत्याचार प्रतिबंधक कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात यावा, या मागणीसाठी महात्मा फुले चौक पोलिस ठाण्यासमोर ठिय्या आंदोलन करण्यात आले. आंदोलनकर्त्यांनी आरोप केला की, पोलिसांच्या उपस्थितीतच ही कारवाई करण्यात आली असून बुद्धमूर्ती आणि भीमा कोरेगाव विजयस्तंभाचे नुकसान झाले. त्यामुळे हा केवळ तोडफोडीचा विषय नसून बौद्ध समाजाच्या भावना दुखावण्याचा गंभीर प्रकार असल्याचे आंदोलकांनी म्हटले. संबंधित अधिकारी, कर्मचारी आणि जबाबदार व्यक्तींवर तात्काळ अनुसूचित जाती जमाती अत्याचार प्रतिबंध कायद्यानुसार गुन्हा दाखल करून कठोर कारवाई करावी, अशी मागणी करण्यात आली.या आंदोलनाला भारतीय काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष राजाभाऊ पातकर यांनी जाहीर पाठिंबा देत प्रत्यक्ष सहभाग नोंदविला. त्यांनी आंदोलनकर्त्यांच्या मागण्यांना समर्थन देत प्रशासनाने या प्रकरणाची निष्पक्ष चौकशी करून दोषींवर कायदेशीर कारवाई करावी, अशी मागणी केली. तसेच गुन्हा दाखल न झाल्यास राज्यभर तीव्र आंदोलन करण्याचा इशारा दिला. मोठ्या संख्येने भीम अनुयायी, सामाजिक कार्यकर्ते आणि नागरिक आंदोलनात सहभागी झाल्याने पोलिस ठाणे परिसर घोषणांनी दणाणून गेला. बुद्धमूर्तीची तोडफोड सहन केली जाणार नाही, दोषींना अटक करा अशा घोषणांनी परिसर दुमदुमून गेला.
दरम्यान, या प्रकरणात न्याय मिळेपर्यंत आंदोलन सुरू ठेवण्याचा इशारा आंदोलकांनी दिला असून, बुद्धमूर्ती आणि भीमा कोरेगाव विजयस्तंभाच्या कथित तोडफोडीबाबत संपूर्ण चौकशी करून जबाबदारांवर ठेकेदार आणि महापालिका अधिक्रायांवर अॅट्रॉसिटी अंतर्गत कारवाई करण्याची मागणी सहाय्यक पोलीस आयुक्त अशोक होनमाने महात्मा फुले पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक परदेशी यांच्याकडे केली यावेळी पोलिसांनी गुन्हा दाखल करण्यास नकार देतात सर्व आंदोलकांनी पोलीस ठाण्यासमोरच ठिय्या देत जोरदार घोषणाबाजी केली आणि पोलीस प्रशासनाचा निषेध केला.
0 टिप्पण्या