मुंबई प्रदेश भिक्यू संघ, नॅशनल बुद्धिस्ट मायनॉरिटी फोरम ऑल इंडिया बुद्धिस्ट फोरम, ऑल इंडिया पॅथर सेना, पालीभाषा विद्यार्थी संघ, महाबोधी वेलफेअर फाउंडेशन तसेच विविध सामाजिक व धार्मिक संघटनांच्या वतीने बौद्ध समाजाच्या विविध मागण्यांकरिता दिनांक 9 जुलै रोजी आजाद मैदान मुंबई येथे महामोर्चा आयोजित करण्यात आला आहे.
बोधगया बिहार येथील
महाबोधी महाविहाराचा संपूर्ण ताबा बौद्ध समाजाच्या हाती देण्यात यावा. छत्रपती संभाजीनगर येथील बुद्धलेणी विद्यापीठ परिसरातील १०० एकर जागा जागतिक बौद्ध संकुलासाठी देण्यात यावी. वालधुनी, कल्याण येथील ३२ एकर जागेवरील बुद्धभूमी फाउंडेशन प्राधिकरण हे संस्थापक अध्यक्ष भन्ते गौतमरत्न थेरो यांच्या सूचना व आराखड्यानुसार कार्यरत करण्यात यावे. अभिजात भाषेचा दर्जा प्राप्त झालेल्या पाली भाषेसाठी मुंबई विद्यापीठात स्वतंत्र "पाली भाषा भवन" उभारण्यात यावे. मुंबई, बोरीवली येथील संजय गांधी राष्ट्रीय उद्यानाचे कान्हेरी बुद्ध लेणी राष्ट्रीय उद्यान असे नामकरण करण्यात यावे.
बौद्ध समाजावरील अन्याय-अत्याचार थांबवावेव देशभरातील बौद्ध समाजावर होणारे अन्याय, अत्याचार तसेच शैक्षणिक, सामाजिक व वैचारिक भेदभात तात्काळ थांबविण्यात यावेत. महाराष्ट्र अल्पसंख्याक आयोगावर त्वरित बौद्ध सदस्य नियुक्त करण्यात यावा व पीडित बौद्धांच्या प्रश्नांवर तात्काळ कररवाई करण्यात यावी. बौद्ध समाजाच्या तक्रारी, अन्याय-अत्याचार व विविध प्रशासकीय प्रश्ननांच्या निवारणासाठी आयोगामध्ये स्वतंत्र बौद्ध मदत कक्ष Help desk स्थापना करण्यात यावा. आदी मागण्यांकरिता हे आंदोलन असून सर्व भिक्खू, उपासक-उपासिका, धममप्रेमी, सामाजिक व धार्मिक संघटनांचे पदाधिकारी, कार्यकर्ते व बौद्ध बांधवांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून हा महामोर्चा यशस्वी करावा,
अधिक माहितीकरिता 98929 42727, 93244 42126, 79777 80981, 98337 40377 या क्रमांकावर संपर्क साधावा
0 टिप्पण्या