Top Post Ad

नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाचे दि.बा पाटील नामकरणासाठी भर पावसात एल्गार

पनवेल तालुक्यात वहाळ गावा नजदीक असलेले स्थानिक भूमीपुत्र असलेल्या आगरी कोळी कराडी समाजाच्या जमीन शासनाने नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ साठी मोठ्या प्रमाणात भूसंपादित केले. येथे सध्या आंतरराष्ट्रीय विमानतळ कार्यरत असून सुरुवातीपासूनच म्हणजे भूसंपादन प्रक्रियेपासूनच नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला लोकनेते दि बा पाटील साहेब यांचे नाव देण्याची आग्रही मागणी स्थानिक भूमिपुत्र असलेल्या आगरी कोळी कराडी समाजाने केली होती. आजपर्यंत अनेक आंदोलने निदर्शने झाले परंतु आजतागायत नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळला स्थानिक प्रकल्पग्रस्त,शेतकऱ्यांचे, कामगारांचे नेते स्वर्गीय लोकनेते दिबा पाटील यांचे नाव लागले नाही किंवा शासनाकडून हे नाव विमानतळात देण्यात आलेले नाही. सरकार या मागणीला कोणतेही दाद देत नसल्याने शेवटी सर्व पक्षीय मोर्चा काढण्याचे ठरले. 

पनवेल शहरातील छत्रपती शिवाजी महाराज चौकातून मुंबईतील मंत्रालय येथे मोर्चा काढण्याचे ठरले. बुधवार दिनांक ८ जुलै २०२६ रोजी सकाळी १० वाजता सर्व पक्षीय मोर्चाचे पदाधिकारी कार्यकर्ते मोर्चासाठी छत्रपती शिवाजी महाराज चौकात एकत्र आले असता पोलीस प्रशासनाने जमाव बंदीचे आदेश दाखवत तसेच अति वृष्टी चालू असल्याने तसेच आमदाराचे अधिवेशन चालू असल्याचे सांगत त्यांना अटक केली. या सर्व पक्षीय आंदोलनामध्ये / मोर्चामध्ये भारतीय जनता पार्टी,शिवसेना शिंदे गट,राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी (अजितदादा पवार गट )या पक्षाचे पदाधिकारी कार्यकर्ते सामील झाले नव्हते. या आंदोलन पासून ते सुरुवातीपासूनच दूर होते. महाराष्ट्र राज्यात व केंद्र सरकारमध्ये भाजप व भाजपच्या मित्र पक्षाचे सत्ता असताना मात्र महाराष्ट्र शासन व केंद्र सरकार नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला लोकनेते दि बा पाटील आंतरराष्ट्रीय विमानतळ असे नाव देण्यास टाळाटाळ करीत आहे असा आरोप यावेळी आंदोलनकर्त्यांनी  केला आहे. 

यावेळी पोलीस प्रशासनावर सुद्धा दडपशाहीचा आरोप आंदोलन कर्त्यांनी केला आहे.आंदोलन स्थळी उपस्थित असलेले माजी आमदार बाळाराम पाटील, उरणच्या नगराध्यक्ष भावना घाणेकर, २७ गाव समितीचे सचिन केणी,२७  गाव संघटनेचे पदाधिकारी, बैलगाडा संघटना, आगरी कोळी कराडी समाज संघटनेचे पदाधिकारी कार्यकर्त्यांना अटक करून कळंबोली येथील पोलीस प्रशासनाच्या मुख्यालयात नेण्यात आले आहे. नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला प्रकल्पग्रस्तांचे लाडके नेते दिवंगत दिबा पाटील यांचे नाव देण्यासाठी काढण्यात येणाऱ्या विधिमंडळावरील पायी मोर्चा पोलिसांनी सुरुवातीलाच पनवेल मध्येच रोकल्याने स्थानिक भूमीपुत्र, दिबा पाटील प्रेमी नामकरण समिती, महाविकास आघाडीतील घटक पक्ष, स्थानिक भूमीपुत्रांचे विविध संस्था संघटना, आगरी कोळी कराडी समाजाच्या विविध सामाजिक संस्था संघटना यांनी सरकारच्या भूमिकेवर तीव्र आक्षेप घेत नाराजी व्यक्त केली. 

राज्य शासन व केंद्रशासन नेहमी नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला लोकनेते दिबा पाटील यांचे नाव देण्यास टाळाटाळ व जाणून बुजून दुर्लक्ष,विलंब करीत असल्याने आंदोलन कर्त्यांनी केंद्र व राज्य सरकारचा निषेध केला. भर मुसळधार पावसातही जनजीवन विस्कळीत झाले असतानाही या मोर्चात हजारो आंदोलक सहभागी झाले होते.या प्रसंगी आंदोलन याहून अधिक तीव्र करण्याचा इशारा आंदोलनकर्त्यांनी प्रशासनाला दिला आहे.


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

 READ / SHARE  / FORWARD 
JANATA  NEWS  xPRESS

निरंतर सेवेच्या आर्थिक मदतीकरिता 
for Donation
G pay 8108658970 

संपादक: सुबोध शाक्यरत्न  
M : 8108658970

Email- pr.janata@gmail.com