Top Post Ad

Indian medical Association शास्त्रीनगर रुग्णालय मारहाण प्रकरण... २० जुलै... राज्यातील आरोग्य सेवा पूर्णपणे बंद ?

 डोंबिवली शास्त्रीनगर रुग्णालयातील स्त्रीरोग तज्ज्ञ डाॅ. सृष्टी बाविस्कर, डाॅ. वैभव साळुंके आणि परिचारिकांना शिवसेना शिंदेगटाचे कोपर प्रभागाचे नगरसेवक रमेश म्हात्रे यांनी दहा दिवसापूर्वी रात्रीच्या वेळेत रुग्णालयात बेदम मारहाण, अर्वाच्च भाषेत शिवीगाळ केली होती. या घटनेचे देशभर पडसाद उमटले. म्हात्रे आणि त्यांचे साथीदार अक्षय कारंडे, रमेश पवार, प्रमोद निकम यांच्यावर कठोर कारवाईची भूमिका शासन, खासगी सेवेतील डाॅक्टर, परिचारिका आणि इतर वैद्यकीय सेवा कर्मचाऱ्यांनी घेतली आहे. म्हात्रे यांचा गुन्हा अजामिनपात्र असुनही त्यांना जामीन मिळाल्याने राज्यभरातील डाॅक्टर, नागरिकांमध्ये संताप व्यक्त करण्यात येत आहे. अशा हिंसाग्रस्त वातावरणात रुग्ण सेवा देणे कठीण असल्याने डॉक्टरांवर हल्ले करणाऱ्यांवर शासनाने कठोर कारवाई करावी. अशी प्रकरणे जलदगती न्यायालयात चालवून त्यांना कठोरात कठोर शिक्षा होईल यादृष्टीने तातडीने प्रयत्न व्हावेत. या प्रकरणातील राजकीय हस्तक्षेप दूर करण्यात यावा, यासाठी ‘इंडियन मेडिकल असोसिएशन’च्या (आयएमए) महाराष्ट्र शाखेने २० जुलै रोजी संध्याकाळी ६ ते २१ जुलै संध्याकाळी ६ या वेळेत राज्यातील आरोग्य सेवा पूर्णपणे बंद ठेवण्याचा निर्णय घेतला आहे.

आयएमए महाराष्ट्र शाखेची गुरुवारी रात्री झालेल्या बैठकीत महाराष्ट्रासह देशभरातील ५०० हून अधिक डाॅक्टर, परिचारिका सहभागी झाले होते. म्हात्रेंनी डाॅक्टरांना केलेल्या मारहाणीविषयी ५० हून अधिक प्रमुख डाॅक्टरांनी आपल्या तीव्र भावना व्यक्त करून शासनाने याप्रकरणात ठोस भूमिका घेण्याची आणि शास्त्रीनगर रुग्णालय मारहाण प्रकरणातील आरोपींना कठोर शिक्षा होईल यादृष्टीने कारवाईची करण्याची मागणी केली. रमेश म्हात्रेंची कृती संपूर्ण आरोग्य व्यवस्थेवरील हल्ला असल्याने त्या दंडशक्तीचा निषेध करण्यासाठी ‘आयएमए’ने सोमवारी संध्याकाळी ६ ते मंगळवारी संध्याकाळी ६ वेळेत राज्यभरातील आपली वैद्यकीय सेवा पूर्ण बंद ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. 

या निषेध आंदोलनादरम्यान सर्व बाह्य रुग्ण सेवा बंद राहतील. नियोजित शस्त्रक्रिया, वैद्यकीय सेवा बंद राहतील. आपत्कालीन कक्ष, अतिदक्षता विभाग, प्रसूती सेवा,जीवनावश्यक यावेळी सुरू राहतील. या आंदोलनात ॲलोपॅथी, आयुर्वेद, होमिओपॅथी डाॅक्टर, परिचारिका, इतर संलग्नित वैद्यकीय संघटना सहभागी असणार आहेत. ‘आयएमए’च्या या हल्ल्याप्रकरणीच्या विविध मागण्यांवर शासनाने तातडीने ठोस निर्णय घेतले नाहीतर महाराष्ट्रातील ‘आयएमए’सह विविध संघटनांचे डाॅक्टर ९ ऑगस्टपासून बेमुदत संपावर जातील, असा इशारा ‘आयएमए’चे राज्य अध्यक्ष डाॅ. संतोष कुलकर्णी, राज्य सचिव डाॅ. विक्रांत देसाई, राज्य खजिनदार डाॅ. अमोल गिते यांनी दिला आहे.

दरम्यान याप्रकरणी डॉक्टरांनी जाहिर केलेला संप व म्हात्रेला मंजूर झालेल्या जामीनाची स्वतःहून दखल घेत न्यायालयाने याची स्युमोटो याचिका दाखल करून घेतली. शनिवारी सुट्टीच्या दिवशी खंडपीठाने यावर सविस्तर सुनावणी घेतली. हे प्रकरण अत्यंत गंभीर असून त्याची संवेदनशीलता लक्षात घेता  म्हात्रेसह अन्य तीन आरोपींना महानगर दंडाधिकारी न्यायालयाने मंजूर केलेला जामीन स्थगित करत आहोत, असे खंडपीठाने स्पष्ट केले. म्हात्रेची 18 पैकी 17 गुह्यांत निर्दोष सुटका झाली आहे. या सर्व गोष्टींचा दंडाधिकारी न्यायालयाने जामीन मंजूर करताना विचार केला नाही, असा ठपका खंडपीठाने ठेवला. डॉक्टरांना मारहाण करणारा शिंदे गटाचा नगरसेवक रमेश म्हात्रेचा जामीन स्थगित करत त्याला उद्या, रविवारी संध्याकाळी 5 वाजेपर्यत पोलिसांना शरण येण्याचे स्पष्ट आदेश उच्च न्यायालयाने दिले आहेत. म्हात्रे डोंबिवलीतील विष्णूनगर पोलिसांना शरण आला नाही किंवा फरार झाला तर त्याची मालमत्ता जप्त करा, असे न्यायालयाने प्रशासनाला खडसावले आहे. हंगामी मुख्य न्यायमूर्ती रवींद्र घुगे यांच्या खंडपीठाने म्हात्रेला हा दणका दिला आहे. म्हात्रेसह अन्य तीन आरोपांचा जामीन स्थगित केला जात आहे. तेव्हा डॉक्टरांनी किंमान जनहितासाठी सोमवारी संप करू नये, असे आवाहन न्यायालयाने केले. पुढील आठवड्यात यावर सविस्तर सुनावणी होईल.





टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

 READ / SHARE  / FORWARD 
JANATA  NEWS  xPRESS

निरंतर सेवेच्या आर्थिक मदतीकरिता 
for Donation
G pay 8108658970 

संपादक: सुबोध शाक्यरत्न  
M : 8108658970

Email- pr.janata@gmail.com