Top Post Ad

जेनझीच्या आंदोलनादरम्यान पॅलेट गनमधून झालेल्या गोळीबार प्रकरणी FIR दाखल करण्यासाठी राहूल गांधी आक्रमक

 जंतरमंतर वरील जेनझीच्या आंदोलनादरम्यान पोलिसांनी पॅलेट गनमधून गोळीबार केल्याचा आरोप होत आहे. याचे स्पष्टीकरण द्यावे तसेच  साहिल लोचव या युवकावर कनॉट प्लेस येथे पेलेट गन वापरण्यात आली असून एम्सच्या अहवालात स्पष्टपणे म्हटले आहे की, त्याच्या शरीरात 200 हून अधिक छर्रे आहेत आणि 3 छर्रे त्याच्या डोळ्यात आहेत. त्या डोळ्याची दृष्टी त्याने गमावली आहे. त्याच्या हृदयाजवळही काही छर्रे आहेत ज्यांना स्पर्श करता येऊ शकत नाही. पेलेट गन चालवली नाही असे दिल्ली पोलिसांचे म्हणणे असेल तर मग,येथे फक्त एकच प्रश्न उपस्थित होतो: कोणीतरी तर हे केलेच असेल. गुन्हासुद्धा घडला आहे. याबाबत दिल्ली पोलिसांनी स्पष्टीकरण द्यावे. यासाठी खासदार राहूल गांधी आज पिडातासोबत आंदोलनाला बसले आहेत. 

 काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी पोलीस ठाण्याबाहेर ठिय्या मांडला आहे. सीजेपीच्या संसद मार्चमध्ये पॅलेट गन चालवल्याचा राहुल गांधी यांचा आरोप आहे. जंतरमंतरवरील जखमी आंदोलक विद्यार्थी राहुल गांधींसोबत आहेत. पोलिसांनी याप्रकरणी गुन्हा दाखल करावा, अशी मागणी राहुल गांधी केली आहे. राहूल गांधी यांनी दिल्ली पोलिसांना बजावलं आहे की, अधिकाऱ्याचं नाव आम्हाला सांगा, आम्ही इथून निघून जाऊ. या कुटुंबासाठी न्याय मागत आहोत. आज सकाळी एका पोलीस स्टेशनमध्ये गेलो, तिथे दखल घेण्यात आली नाही म्हणून दुसऱ्या पोलीस स्टेशनमध्ये जायला सांगितलं मात्र तिथेही तोच अनूभव आला असल्याने आता  FIR दाखल करा एवढचं आम्ही पोलिसांना सांगत आहोत. 

वरुन ऑर्डर आलीय एफआयआर दाखल करता येऊ शकत नाही. असे असेल तर एफआयआर दाखल होणार नाही तो पर्यंत आम्ही इथून हलणार नाही. एफआयआर दाखल करावाच लागेल. लाखो महिलांवर अन्याय होतो, गरीबांवर अन्याय होतो   आम्हाला सांगितल जातय, हिंदुस्थानात युवावर गोळी चालवली जाऊ शकते. पण या देशात केंद्रीय गृहमंत्री अमित शाह, दिल्ली पोलीस न्याय देणार नाहीत. तेव्हा प्लीज एफआयआर दाखल करा.  असं राहुल गांधी म्हणाले. पेलेट गन प्रकरणी दिल्ली पोलीस गुन्हा दाखल करुन घेत नसल्याचे साहिलच्या वकिलांनी मीडियाला सांगितले. 


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

 READ / SHARE  / FORWARD 
JANATA  NEWS  xPRESS

निरंतर सेवेच्या आर्थिक मदतीकरिता 
for Donation
G pay 8108658970 

संपादक: सुबोध शाक्यरत्न  
M : 8108658970

Email- pr.janata@gmail.com