Top Post Ad

jantarmantar protest शिक्षणमंत्र्यांचा राजीनामा झाला असला तरी आंदोलनाच्या इतर २ प्रमुख मागण्या अद्याप बाकी आहेत

 अखेर केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी आज आपल्या पदाचा राजीनामा दिला. मे महिन्यात नीटचा फुटलेला पेपर, त्यानंतर सर्वोच्च न्यायालयाच्या न्यायमूर्तींनी केलेल्या कॉक्रोज या उल्लेखातून अभिजित दिपकेंनी उपरोधिकरीत्या सुरू केलेली कॉकरोच जनता पार्टीने सुरु केलेल्या  आंदोलनाला देशभरातून मिळालेला प्रतिसाद. याची परिणती  याचा परिणाम  धर्मेंद्र प्रधान यांना राजीनामा देण्यास भाग पडले.  या आंदोलनाला प्रशासनाने अनेक मार्गाने दडपण्याचा प्रयत्न केला. सोनम वांगचूक यांना आंदोलन स्थळावरून सकाळीच उचलून नेले. त्यानंतर संसदेकडे कूच करत असलेल्या विद्यार्थ्यांवर लाठीहल्ला, अश्रूधुर, अशा नाना प्रकारे क्लुप्त्या करून त्यांना अडवण्याचा प्रकार करण्यात आला. मात्र त्यालाही विद्यार्थी दाद न देता संसदेवर चालून गेले. अखेर प्रधानमंत्र्याना संसदेच्या मागच्या दारातून पळ काढावा लागला. पण आंदोलक काही मागे हटेनात शेवटी प्रधान यांनी राजीनामा दिला. सोशल मीडियावरून राजीनाम्याची माहिती देताना त्यांनी गेल्या 10 दिवसांत घडलेल्या दुर्दैवी घटनांबद्दल खेद व्यक्त केला असून, आपले दोन पानी राजीनामा पत्र पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडे सुपूर्द केले आहे.   यानंतर  राजकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली आहे. '

जेनझीने सरकारच्या झिंज्या उपटल्या व त्यांना जमिनीवर आणले' - राज ठाकरे 

धर्मेंद्र प्रधान हे शिक्षण क्षेत्रातील भ्रष्टाचाराचे केंद्रबिंदू बनले होते, त्यामुळे त्यांना पद सोडावेच लागले,  गेल्या अनेक वर्षांपासून RSSने शिक्षण व्यवस्थेत हस्तक्षेप करून ती पोकळ केली आहे,  शिक्षणमंत्र्यांचा राजीनामा हे देशातील ढासळलेली शिक्षण व्यवस्था पूर्वपदावर आणण्याच्या दिशेने पडलेले अत्यंत महत्त्वाचे पाऊल आहे.  आपल्या भविष्यासाठी, संविधानासाठी आणि हक्कांच्या रक्षणासाठी रस्त्यावर उतरून लढा देणाऱ्या प्रत्येक तरुणाचे कौतुक आहे. स्वतःच्या स्वाभिमानासाठी आणि घटनात्मक मार्गाने अन्यायाविरोधात ठामपणे उभे राहणे हेच खरे धैर्य आहे. विद्यार्थ्यांच्या या लढाऊ वृत्तीचा मला अत्यंत अभिमान वाटतो, शेतकरी, मजूर आणि शोषित घटकांनीही याच धैर्याने सरकारच्या अन्यायाविरोधात आवाज उठवला पाहिजे,  शिक्षणमंत्र्यांचा राजीनामा झाला असला तरी आंदोलनाच्या इतर २ प्रमुख मागण्या अद्याप बाकी आहेत. देशातील तरुणांचे भविष्य धोक्यात आणल्याबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जाहीर माफी मागितली पाहिजे आणि आंदोलक विद्यार्थ्यांवर अमानुष लाठीचार्ज करणाऱ्या दोषी अधिकाऱ्यांवर कडक कारवाई झालीच पाहिजे,  - विरोधी पक्षनेते राहूल गांधी

कॉक्रोच जनता पार्टीचे सीजेपी संस्थापक अभिजीत दिपके, देशातील तरुण आणि त्यांना न घाबरता समर्थन देणाऱ्या पालकांचे मनापासून अभिनंदन  हा विषय केवळ एका राजीनाम्यापुरता मर्यादित नव्हता, तर या तरुणांनी देशाला भयाच्या छायेतून बाहेर काढले. गेल्या १२ वर्षांपासून रोज काही ना काही दबाव जनतेवर टाकला जात होता. जणू काही या देशात आता लोक शिल्लक राहिलेलीच नाहीत आणि विरोधकांना किंवा जनतेला 'झुरळ' समजून सत्तेतील मंडळी वागत होती. एका लहानशा संघर्षाने किंवा 'झुरळाने' हुकूमशहाला झुकवल्याचे दाखवून दिले आहे. देशातील युवाशक्ती एकत्र आली तर काय करू शकते, याची ही एक झलक आहे केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी राजीनामा दिला असला, तरी या आंदोलनादरम्यान समोर आलेल्या भीषण गुन्हेगारी प्रवृत्तीचे काय. आंदोलक तरुणांवर आणि युवतींवर झालेला लाठीचार्ज, तसेच साध्या वेषात गुंड घुसडल्याचा आरोप करत या पोलिसांवर गुन्हे दाखल करून कारवाई करणार का, तरुणांवर दाखल झालेले गुन्हे मागे घेतले नाही आणि पोलिसांच्या दंडुकशाहीवर कारवाई झाली नाही, तर हा तरुण वर्ग आपला मोर्चा अमित शहांकडे वळवल्याशिवाय राहणार नाही," - उद्धव ठाकरे

केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांना अखेर राजीनामा दयावा लागला पण त्यांच्या राजीनाम्याने हा प्रश्न संपत नाही.  शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा घेतला असला तरी या आंदोलनादरम्यान विद्यार्थ्यांना अमानुषपणे मारहाण करण्यात आली, त्यांच्यावर कारवाई झाली पाहिजे. नीट पेपरफुटीमुळे २५ विद्यार्थ्यांनी आत्महत्या केल्या, त्यांच्या कुटुंबातील लोकांना भरीव आर्थिक मदत करावी, त्यांचे पुनर्वसन करावे,  देशातील तरुणांनी लढा पुकारला की एक नवा इतिहास निर्माण होतो, आज तेच घडले असून कोट्यवधी तरुणांच्या दबावापुढे अहंकारी हुकूमशाहला झुकावे लागले आहे, धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा हा अहंकाराचा पराभव आणि सत्य व संविधानाचा विजय आहे,   मोदी सरकारच्य १२ वर्षांच्या काळात तब्बल १५२ वेळा पेपरफुटीच्या घटना उघड झाल्या, पण सरकारने काहीही कारवाई केली नाही. सरकार विद्यार्थ्यांच्या भवितव्याशी खेळ करत आहे. ही लढाई मोठी आहे आणि थांबणारही नाही. काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी विद्यार्थ्यांचे प्रश्न हाती घेऊन देशभर आंदोलन छेडले. छात्रों की गुंज हे अभियान कोटा व डेहराडून येथे घेऊन मोदी सरकारला आव्हान दिले, संसदेत आवाज उठवला, पंतप्रधानांच्या निवासस्थानासमोर आंदोलन करून सरकारला जाब विचारला, अखेर शिक्षण मंत्र्याचा राजीनामा झाला आहे. या अहंकारी सरकारविरोधात काँग्रेस यापुढेही संघर्ष करत राहिल, - खासदार वर्षा गायकवाड 


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

 READ / SHARE  / FORWARD 
JANATA  NEWS  xPRESS

निरंतर सेवेच्या आर्थिक मदतीकरिता 
for Donation
G pay 8108658970 

संपादक: सुबोध शाक्यरत्न  
M : 8108658970

Email- pr.janata@gmail.com